Bharat Gogavale/Bachchu Kadu Saam Tv
महाराष्ट्र

सत्ता स्थापनेच्या जोरदार हालचाली; शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी भरत गोगावले, बच्चू कडू

एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) नाराजीनाट्य सुरु झालं. राज्यात सुरू राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही नवी घडामोड समोर आली आहे. त्यातच आता शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि बच्चू कडू (Bachchu Kadu)यांची नियुक्ती झाल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी शिंदे गटाचं चर्चेसाठी एक शिष्टमंडळ तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या शिष्टमंडळात शंभूराज देसाई, दादा भुसे, भरत गोगावले, बच्चु कडू यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिष्टमंडळात प्रवक्ते देखील असणार आहेत.

हे देखील पाहा -

एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामिल असलेले आमदारा आसाममधील गुवाहाटीमध्ये आहेत. गेल्या ५ दिवसांपासून राज्यात अनेक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सुरुवातीला 12 आमदार शिंदे यांच्यासोबत होते. त्यानंतर आता ही संख्या 38 हून अधिक झाली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

२० जूनला विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाले. यानंतर शिवसेनेचे अनेक आमदारही नॉट रिचेबल झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि शिवसेनेह महाविकास आघाडी अक्षरशः हादरली. सुरुवातीला एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांसह सुरतमधील एका हॉटेला थांबले होते. त्यानंतर केंद्राच्या सुरक्षेत ते बंडखोर आमदारांसह २२ जूनला आसाम राज्यातील गुवाहाटीत पोहोचले. गुवाहाटीतील रेडिसन ब्ल्यू या हॉटेलात ते बंडखोर आमदारांसह थांबले आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे ४० तर अपक्ष आणि इतर १० असे एकूण ५० आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकजून करण्यात आला आहे. आज बंडाचा पाचवा दिवस असून रोज नवनवीन घटना घडतायत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खुशखबर! ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा; तुम्हाला मिळाले का?

Maharashtra Live News Update: गॅस टंचाईच्या मुद्द्यावर ठाकरेसेनेचे नाशिकमध्ये आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

Saturday Horoscope: जवळच्या व्यक्तीकडून होणार फायदा, ५ राशींना पैशाची तंगी; वाचा शनिवारचे राशी

पोटाची खळगी भरण्यासाठी रिक्षा चालवणारी 'हिरकणी' आई; ३ वर्षांच्या मुलीसोबत कष्टमय झुंज

Pak vs Ban : रन आऊटवरून 'रणकंदन'! पाकिस्तान-बांगलादेशी खेळाडूंमध्ये मैदानातच राडा, सलमान आगा भडकला, ग्लोव्ह्ज आपटले, हेल्मेट फेकला

SCROLL FOR NEXT