Ashok Chavan saam tv
महाराष्ट्र

Ashok Chavan: प्रामणिकपणे काम केलं; भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही... राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया!

Ashok Chavan Resign: अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

Gangappa Pujari

Ashok Chavan Press Conference:

लोकसभा निवडणुकांच्या आधीच राज्याच्या राजकारणात मोठ्या भूकंपाचे संकेत आजच्या घडामोडींने दिले आहेत. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यावर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून पक्षामध्ये मी कोणावरही नाराज नाही, माझे कोणाशीही मतभेद नाहीत, तसेच भाजपमध्ये प्रवेशाबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले अशोक चव्हाण?

"मी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिला. आत्तापर्यंत काँग्रेस पक्षामध्ये प्रामणिकपणे काम केले. मला पक्षातील कोणाचीही तक्रार करायची नाही. पक्षाने मला काही दिले, मी सुद्धा पक्षाला खूप दिले, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच अद्यापही भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन दिवसांत याबद्दलची भूमिका स्पष्ट करेन," असे महत्वाचे विधानही अशोक चव्हाण यांनी केले आहे.

यावेळी बोलताना अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांबाबत महत्वाचे विधान केले आहे. "मी घेतलेली भूमिका एकट्याची आहे. मी अद्याप कोणत्याही आमदाराला संपर्क केला नाही, मात्र कोण काय करतील हे मी सांगू शकत नाही," असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया...

'काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे'.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT