NCP Crisis Sharad Pawar vs Ajit Pawar  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra NCP Crisis: शरद पवारांनी घेतलेली बैठक अनधिकृत; खरी राष्ट्रवादी आमचीच.. प्रफुल्ल पटेलांचा पुनरुच्चार

Maharashtra Political Crisis Live Update: अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठी फुट पडली असून दोन्ही गटांकडून पक्षांवर दावा केला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Political NCP Crisis: अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठी फुट पडली असून दोन्ही गटांकडून पक्षांवर दावा केला जात आहे. अजित पवार गटाकडून मुळ राष्ट्रवादी पक्ष हा आमचाच असून शरद पवार यांची दिल्लीतील बैठक अधिकृत नसल्याचे सांगितले होते.

तर शरद पवार यांनी कालच्या बैठकीत पक्ष आणि चिन्ह जाणार नसल्याचे सांगत मीच पक्षाचा अध्यक्ष असल्याचे ठणकावून सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा पक्षावर दावा केला असून कायदेशीर बाबीही मांडल्या आहेत.

काय म्हणाले प्रफुल पटेल...

प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी पक्षाच्या कायदेशीर बाबी मांडत पक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांचाच असल्याचे सांगितले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, "३० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार, आणि कार्यकर्ते देखील होते. या बैठकीत सर्वांनी अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली आहे"

तसेच याबाबत पुढे बोलताना "३० तारखेपासून निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या दारात हा विषय गेला आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत. त्यामुळे पक्ष चिन्ह आम्हाला मिळाले पाहिजे, अशी मागणी आम्ही आयोगाकडे केली. कारण बहुमत अजित पवार यांच्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

यावेळी बोलताना प्रफुल पटेल यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वावरही थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "पक्षामध्ये कोणतीही नियुक्ती ही निवडणुकीच्या माध्यमातून व्हावी लागते, पण आमच्याकडे कधीच तसं झालं नाही. महाराष्ट्रातच कधीच निवडणुका झाल्या नाहीत तर इतर ठिकाणचा विषयच येत नाही, असे सांगत माझ्या सहीने झालेल्या सर्व नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचे" त्यांनी म्हणले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

LPG Crisis : 'गॅस' भडका शमवण्यासाठी ओतणार 'रॉकेल'; टंचाईवर काढला तोडगा, सरकारनं घेतले २ महत्वाचे निर्णय

मुंबईत 12 मार्च 1993 ची पुनरावृत्तीचा डाव? मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांची धमकी?

SCROLL FOR NEXT