Sanjay Gaikwad Allegation On Maharashtra Police 
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad: महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट कुठेच नाही; पकडतात 50 लाख आणि दाखवतात 50 हजार, शिवसेना आमदाराचा आरोप

Sanjay Gaikwad Allegation On Maharashtra Police: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Bharat Jadhav

महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही, पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात, असा आरोप शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलाय. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते, त्यावेळी आमदार गायकवाड यांनी हे आक्षेपार्ह विधान केलंय. दरम्यान यावेळी त्यांनी पोलीस खात्यातील भ्रष्टाचारावर भाष्य केलंय. सरकारने एक कोणता कायदा केला की, पोलिसांचा एक हप्ता वाढत असतो,असेही ते म्हणालेत.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय गायकवाड यांनी पोलीस खात्यात भ्रष्टाचार चालत असल्याचा आरोप केलाय. जर सरकारने कायदा केला तर पोलिसांचा एका हप्ता वाढतो. जर गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो. दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढत असतो. पण जर पोलिसांनी ठरवलं की, एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही. तर सगळं सुतासारखं सरळ होईल, असं गायकवाड म्हणालेत.

दरम्यान संजय गायकवाड यांच्या मुलाला निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती. त्यावरून बोलताना आमदार गायकवाड म्हणाले, मुलापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संजय गायकवाड नावाचा पहाडाला पार करावं लागेल. त्यावरून त्यांनी पोलिसांवर तोफ डागली आणि पोलीस अकार्यक्षम असल्याची टीका केली.

गायकवाड म्हणाले की, माझ्या घरासमोर माझी गाडी जळाली त्याचा तपास झाला नाही. त्यामुळे पोलीस अकार्यक्षम असून ते काहीच करू शकत नाहीत. बुलढाण्यातील दोन पोलीस हे चोरांचे सरदार आहेत. चोरीचा माल पोलिसांच्या घरात आढळतोच कसा? असाही सवाल संजय गायकवाड यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT