Maharashtra Nursing Paper Leak Saam tv
महाराष्ट्र

NEET, TET नंतर महाराष्ट्रात आणखी एक पेपर फुटला, बहिणीसाठी शिक्षिकेनेच रचला कट

Maharashtra nursing exam paper leak in Parbhani : NEET आणि TETनंतर महाराष्ट्रात परभणीतील नर्सिंग परीक्षेच्या पेपरफुटीचा आरोप समोर आला आहे. बहिणीला मदत करण्यासाठी परीक्षा पर्यवेक्षिकेनेच पेपर फोडल्याचा आरोप आहे.

Namdeo Kumbhar

विशाल शिंदे, पऱभणी प्रतिनिधी

Maharashtra Nursing Paper Leak : राज्यात नीट (NEET) आणि टीईटी (TET) परीक्षांमधील घोटाळ्यांची शाई वाळते न वाळते तोच, आता परभणीमध्ये आणखी एक पेपर फुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. परभणीत नर्सिंग परीक्षेचा पेपर फुटल्याचं वृत्त समोर आले अन् शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. बहिणीसाठी शिक्षेकेनेच पेपर फोडल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

स्थानिक प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेदरम्यान स्वतःच्या सख्ख्या बहिणीला मदत करण्यासाठी एका परीक्षा पर्यवेक्षिकेनेच हा पेपर फोडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. केंद्र निरीक्षक विश्वजीत मठपती यांनी अचानक घेतलेल्या झाडाझडतीमध्ये हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पर्यवेक्षिकेसह एकूण ५ जणांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

परभणी शहरात नर्सिंगची परीक्षा सुरू असतानाच प्रश्नपत्रिकेचा फोटो व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरित झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच मोबाईलद्वारे तिचे फोटो काढून व्हॉट्सॲपवर पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र निरीक्षकांच्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे परीक्षेच्या गोपनीयतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बहिणीला मदत करण्यासाठी पर्यवेक्षिकेनेच काढला फोटो

मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षा सुरू झाल्यानंतर वर्गखोलीत प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात आले. याच दरम्यान तेथे कार्यरत असलेल्या महिला पर्यवेक्षिकेने आपल्या मोबाईलद्वारे प्रश्नपत्रिकेचा फोटो काढला आणि तो व्हॉट्सॲपवरून स्वतःच्या बहिणीला पाठवल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. परीक्षा सुरू असतानाच प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर गेल्याने शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी केंद्र निरीक्षकांच्या तक्रारीवरून महिला पर्यवेक्षिका राखी राजेश चव्हाण, तिची बहीण राणी राजेश चव्हाण यांच्यासह त्यांची ओळख असलेल्या प्रतीक्षा किरण खिल्लारे, ईश्वर बाराबोईना आणि दिलीप बोरकर या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हा फोटो नक्की कोणाकोणाला पाठवण्यात आला? तो पुढे इतर किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला? तसेच यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व बाबींचा शोध पोलीस घेत आहेत. यासंदर्भात पोलीस आणि संबंधित नर्सिंग कॉलेजच्या प्राध्यापकांची प्रतिक्रिया (बाईट) घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सध्या तरी माध्यमांना अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

सांगलीत सापडली पेट्रोलची विहीर? राज्यात आता पेट्रोल स्वस्त होणार?

Cricket Rule : नवख्यांपासून दिग्गज खेळाडूंपर्यंत...सगळ्याच क्रिकेटपटूंचं टेन्शन वाढणार; BCCI लागू करणार नवा नियम

Healthy Breakfast : रोज एकच नाश्ता खाणाऱ्यांनो सावधान! या 6 गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

यंदाही गणेशोत्सवात कोकणवासीयांचे हाल, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT