Nana Patole News Saam TV
महाराष्ट्र

Nana Patole: त्यांनी कुठलंही पत्र लिहिलं नसेल असं मला वाटतं ..., बाळासाहेब थोरातांच्या त्या पत्राविषयी नाना पटोले स्पष्टचं बोलले

पत्राची कॉपी दिली असेल? तर काय त्यात मजकूर आहे ते मला कळेल.

Ruchika Jadhav

Nana Patole: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात या दोघांमधील वाद वाढण्याची शक्यता दिसत असतानाच एक नवी माहिती समोर आली आहे. नाना पटोले यांनी थोरातांनी काय पत्र दिलं आहे हे माहीतचं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच त्यांनी कोणतंही पत्र दिलं नसेल असं त्यांनी म्हटलं आहे. (Latest Nana Patole News)

नाशिक पदविधर निवडणुकीत तांबे कुटुंबियांनी चांगलाच गोंधळ घातला होता. उमेदवारीवरून झालेल्या गोंधळानंतर आता बाळासाहेब थोरातांनी पक्षश्रेष्ठींना एक पत्र दिले यामध्ये त्यांनी नाना पटोले यांच्याबरोबर काम करणं अशक्य असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तृळात याविषयी चर्चेला उधाण आलं आहे.

अशात आता नाना पटोले यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात माध्यामांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी सदर पत्राबद्दल काहीही माहीत नसल्याचं म्हटलं आहे. " बाळासाहेब थोरातांनी काय पत्र दिले त्याची मला माहिती नाही. काँग्रेस बद्दलचा मीडिया बाजार जो आहे तो जास्त आहे. आम्ही सातत्याने हेच सांगतोय की, काँग्रेसची भूमिका महागाई विरोधातली आहे, असं नाना पटोले म्हणाले.

तसेच पुढे त्यांनी म्हटलं की, "आज आम्ही आंदोलनही करणार आहोत. बँका एलआयसी या सगळ्यांना लुटण्यात आलंय. यामध्ये सामान्य लोकांचा पैसा आहे. लोकांमध्ये देखील भीती आहे. आमच्या पैशाचं काय होणार? असं लोकांना वाटत आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी काय पत्र लिहिलं ते मला माहिती नाही. काँग्रेस जनतेची लढाई लढते माझं काहीच बोलणं झालं नाही तुम्ही त्यांच्याशी बोललात तर जास्त खुलासा होईल, असं पटोले म्हणाले.

"मी बातम्या पाहतोय माझा तुम्हाला सवाल आहे त्यांनी तुम्हाला पत्र दाखवले असेल? पत्राची कॉपी दिली असेल? तर काय त्यात मजकूर आहे ते मला कळेल. तुमच्याकडे पत्र असेल तर त्याच्यावर प्रतिक्रिया देता येईल थोरातांनी कुठलंही पत्र लिहिलं नसेल असं मला वाटतं. बाळासाहेब थोरात हे आमचे नेते आहेत. आता उमेदवाराचा फॉर्म भरणार आहोत रवींद्र धंगेकर यांना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून फॉर्म भरतोय,असं मत पटोलींनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी कसे साजरी करायचे? पाहा हे दुर्मिळ ७ फोटो

रक्तप्रवाहात अडथळा, नसा बंद पडण्याची भीती? खा १ फळ, हार्ट अटॅकचा धोका टळेल

SCROLL FOR NEXT