Mahabhumi Stack system Maharashtra property ownership saam tv
महाराष्ट्र

फ्लॅटच्या 7/12 साठी लवकरच कायदा, फ्लॅटधारकांना आता डिजिटल प्रॉपर्टी कार्ड

New Property Ownership Law in Maharashtra: राज्यात जमीन आणि घरावरील मालकी हक्कावरून अनेक कुटुंबात वाद निर्माण होतात. मात्र, आता हे तंटे दूर करण्यासाठी मालमत्ताधारकांसाठी नवा कायदा येणार आहे. हा कायदा काय आहे?... त्याचं स्वरुप नेमकं कसं आहे?... पाहूयात या रिपोर्टमधून...

Rohit Kadam

राज्यातील नागरिकांना आता फ्लॅट, घर, जमिनीच्या अधिकृत मालकीची सरकारी हमी लवकरच मिळणार आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जमीन मालकी हक्क कायदा करण्यात येणार आहे. एव्हंढच नव्हे तर प्रत्येक मालमत्ता आणि फ्लॅटधारकाला सरकारमान्य प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावित जमीन मालकी हक्क कायद्यात नेमक्या काय तरतुदीत आहेत ते पाहूयात....

देशात प्रथमच नागरिकांना मालमत्तेची कायदेशीर सरकारमान्य मालकी देण्यासाठी जमीन मालकी हक्क कायदा लागू करण्यात येणार आहे.

जमीन, राहत्या घराची सर्व माहिती, रेडी रेकनरप्रमाणे होणारी किंमत, मालमत्तेशी संबंधित कोणता वाद आहे का, याची सर्व माहिती डिजिटल कार्डद्वारे मिळणार आहे.

तसंच, QR कोडच्या आधारेही नागरिकांना माहिती पाहता येणार आहे

राज्यभरात आता जमिनीची मोजणी केल्यावरच त्याची नोंदणी होणार असून किमान 15 दिवसांत मोजणीची व्यवस्था उभारली जाणार आहे

तर दुसरीकडे, युपीआय प्रणालीच्या धर्तीवर महसूल विभागानं महाभूमी स्टॅक प्रणाली विकसित केलीये... सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात अनेकदा एकाच फ्लॅटची डमी कागदपत्रे बनवून फसवणूक करण्याचे प्रकार घडलेत. मात्र, आता डिजिटल प्रॉपर्टी कार्ड आणि सरकारी हमीमुळे मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पूर्णपणे सुरक्षितता येण्याची शक्यता aआहे. त्यामुळे मालकी हक्काबाबतची फरपट संपून नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT