Maharashtra New CM Maharashtra New CM
महाराष्ट्र

Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम, अधिकृत घोषणा कधी होणार?

Maharashtra New CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? राज्याच्या चाव्या कुणाकडे जाणार? भाजपचाच मुख्यमंत्री होणार की एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी मिळणार? याबाबतचा सपन्सेन आज संपण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra CM : महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही. गुरुवारी दिल्लीमध्ये अडीच तास खलबते झाली, पण मुख्यमंत्रि‍पदाचे नाव अद्याप जाहीर झधालेले नाही. तिन्ही गटक पक्षांच्या नेत्यांनी अमित शाह यांच्यासोबत अडीच तास चर्चा झाली, त्यामध्ये कोणाला किती मंत्रि‍पदे, कोणती मंत्रि‍पदे मिळाली याची चर्चा झाल्याचं समजतेय.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या नेत्यांनी गुरुवारी अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत चर्चा केली. रात्री साडे नऊ वाजता सुरु झालेली बैठक रात्री १२ वाजेपर्यंत सुरु होती. बैठकीमध्ये मंत्रिपदे, पालकमंत्रिपदे यावर चर्चा झाल्याचे समोर आलेय.

मुख्यमंत्री कोण?

दिल्लीमध्ये महायुतीमधील तिन्ही घटकपक्षाच्या दिग्गज नेत्यांची केंद्रीय नेतृत्वासोबत बैठक झाली. मुख्यमंत्रिपद भाजपलाच जाणार, हे निश्चित मानले जातेय. पण उदय सामंत यांनी शिंदेंनी मुख्यमंत्रि‍पदाचा दावा सोडलाय, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जे निर्णय घेतील, तो मान्य असल्याचे म्हटले. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली. भाजपा नेतृत्व पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणार का? की देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार? भाजप राजस्थान आणि हरियाणासारखं धक्कातंत्र वापरणार? याची चर्चा सुरू आहे.

मुंबईमध्ये आज पुन्हा खलबतं ?

केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा झाल्यानंतर आज राज्यात भाजपची बैठक होणार असल्याचे समजतेय. भाजपचे निरीक्षक लवकरच मुंबईत दाखल होणार आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, गटनेता ठरवण्यासाठी भाजपकडून ३ निरीक्षकांची निवड करण्यात येणार आहे. निरीक्षक महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन गटनेता निवड करतील, असे समजतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT