Jitendra Awhad, Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Jitendra Awhad News: 'फक्त राजकीय लढाई जिंकण्यासाठी शरद पवारांकडे बोट...' सुनावणीबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड भावुक

Jintendra Awhad On Ajit Pawar: निवडणूक आयोगासमोर अजित पवार गटाने शरद पवार पक्षात मनमानी करत होते, त्यांनी केलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचा दावा केला.

Gangappa Pujari

Maharashtra NCP Crisis:

राष्ट्रवादीमधील संघर्षाचा वाद आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला आहे. काल झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगासमोर अजित पवार गटाने शरद पवार पक्षात मनमानी करत होते, त्यांनी केलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचा दावा केला. या सुनावणीवर बोलताना शरद पवार गटाचे नेते जिंतेंद्र आव्हाड भावूक झाले.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

निवडणूक आयोगात (Election Commission) सुरू असलेल्या सुनावणीत अजित पवार गटाने शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. याच मुद्द्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. "काल निवडणुक आयोगासमोरील युक्तिवादात असा एक मुद्दा असा होता की डोळ्यात पाणी आले. स्वतःची राजकीय लढाई जिंकण्यासाठी शरद पवारांकडे बोट दाखवले, असे म्हणत सोडून जायचं होतं तर सांगून जायचं होते असे जिंतेद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

तसेच ज्यांनी पक्षाला मोठे केले. बोट धरुन राजकारणात आणले, त्यांनाच बाहेर काढत आहेत. असे म्हणत ज्या माणसाने हे झाड लावलं, मोठं केलं; त्या माणसाला आज हे भोगावं लागत आहे..असे आव्हाड म्हणाले.

अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे मुद्दे नसल्यामुळे ते आमदारांच्या मतावर युक्तिवाद करत आहेत. पक्ष संघटनेबाबत ते काहीही बोलत नाहीत. परंतु आमदारांना झालेले मतदान हे पक्षाचे असते. जर तेउमेदवाराचे असेल तर मला माझ्या नावावर मतदान पडते.. असेही जिंतेंद्र आव्हाड म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT