Eknath Shinde meets Raj Thackeray saam Tv
महाराष्ट्र

प्रबोधनकार ते बाळासाहेब ते राजसाहेब, ....आणि 'एक'नाथ साहेब, आमदार राजू पाटील यांचं ट्विट चर्चेत

मनसे आमदार राजू पाटील यांच्या ट्विटमुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली : मनसे आमदार राजू पाटील यांच्या ट्विटमुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशातच आता पाटील यांनी एक ट्विट केल्यानं खळबळ उडाली आहे. प्रबोधनकार ते बाळासाहेब ते राजसाहेब. विचारांचा वारसा परफेक्ट 'क्लिक' झालाय.'एक'साहेब आणि 'एक'नाथ साहेब, असा संदेश पाटील (Raju Patil) यांनी ट्विटरवर दिल्याने मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरे यांच्या घरी आलो- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि ठाकरे यांच्याशी जवळपास ४० मिनिटे चर्चा केली.याच भेटीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, सगळीकडे गणरायाचं आगमन झालं आहे. राज्यात उत्सावाचं आनंदाचं वातावरण आहे.त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त आज मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या घरी आलो. गणरायाचं दर्शन घेतलं, कोणतीही चर्चा झाली नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

आजची भेटीची चर्चा रंगली.

यापूर्वी कधीही एकनाथ शिंदे गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाताना फारसे दिसले नाहीत किंवा याबाबत चर्चाही झाली नाही. दुसरीकडे राज ठाकरे ठाण्यात नवरात्री उत्सवात जायचे. परंतु त्यावेळी शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात अशाप्रकारची भेट झाली नव्हती. त्यामुळे शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात झालेली आजची भेट राजकीय चर्चांना उधाण आणणारी आहे.

राजू पाटील यांची भूमिका

मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आणि ठाणे जिल्ह्यातील विविध विषयावर नेहमीच शिंदे पितापुत्रांना विरोध दर्शवला आहे. पाटील यांनी शिंदे यांच्या विरोधात सुद्धा आपल्या भूमिका मांडल्या आहेत, तसेच नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे.त्यामुळे आजचे ट्विट पाहता मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार का,हे पाहावे लागेल.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सौरभ दास, आशुतोष रांका यांना जामीन मंजूर

Satara District Bank Election: महायुतीचा जागावाटपाच फॉर्म्युला ठरला, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मोठी घडामोड

Diwali Horoscope : दिवाळीत 'या' ३ राशींची चांदीच चांदी! पैसा, प्रगती अन् धनलाभाचे संकेत

Dhasal Movie: 'प्रहार'नंतर ललित प्रभाकरचा नवा अंदाज; 'ढसाळ'चा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Vasai-Virar:महानगरपालिकेच्या द्वारावर झेन-जी आंदोलकांना रोखलं; सुरक्षारक्षकांसोबत तरुणांची धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT