Amit Thackeray Meet Udaynraje Bhosale In Satara Saamtv
महाराष्ट्र

Amit Thackeray: हम भी कुछ कम नहीं.! अमित ठाकरेंच्या भेटीनंतर उदयनराजेंची फटकेबाजी; 'ही' खास वस्तू दिली भेट

अमित घरी आल्यावर मला माझा मुलगा घरी आल्यासारखं वाटलं, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

Gangappa Pujari

ओंकार कदम, सातारा...

Satara: महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. साताऱ्यातील जलमंदिर या निवासस्थानी ही भेट झाली.

बराच वेळ चाललेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्याचबरोबर यावेळी अमित ठाकरेंनी दिलेल्या खास भेटवस्तूचीही चर्चा होत आहे. (Udayanraje Bhosale)

अमित ठाकरे साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. पक्ष बांधणीसाठी ते साताऱ्यात आले आहेत. यावेळी त्यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. यावेळी उदयनराजे यांनी अमित ठाकरे यांचं दिलखुलास स्वागत केलं.

हम भी कुछ कम नही...

या भेटीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी बोलताना अमित हा माझ्या खास मित्राचा मुलगा आहे. अमित घरी आल्यावर मला माझा मुलगा घरी आल्यासारखं वाटलं, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. तसेच "अमित हँडसम असला तरी हम भी कुछ कम नही," अशी टोलेबाजीही उदयनराजेंनी केली.

दिली ही खास भेट..

पुढे बोलताना उदयनराजेंनी "अमित ठाकरे यांना मी परफ्यूम दिलं आहे. बल्गारिचं आहे. मॅन असं या परफ्यूमचं नाव आहे. अमितला म्हटलं आता तू लहान मुलगा नाहीस. तू माणूस आहे. तू आता सर्वांची काळजी घेतली पाहिजे. यू नो लाँगर स्मॉल बॉय, यू आर मॅन, अशा शब्दात अमित ठाकरेंची फिरकीही घेतली.

ही सदिच्छा भेट...

छत्रपती उदयनराजे यांच्या भेटीनंतर बोलताना अमित ठाकरेंनी (Amit Theckeray) "साताऱ्यात आलो आणि राजेंना भेटलो नाही असे होऊ शकत नाही. त्यामुळे राजे आहेत का विचारले आणि भेटलो. ही राजकीय भेट नव्हती. ही सदिच्छा भेट होती. आमच्या कुटुंबाचे राजेंशी खूप जुने संबंध आहेत म्हणून भेटीला आलो," अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health Tips : जीमनंतर प्रोटीन पावडर खाल्ल्याने किडनीवर होऊ शकतो परिणाम, वेळेआधीच जाणून घ्या 'या' ६ गोष्टी नाहीतर....

Maharashtra News Live Update : चंद्रपुरात शिवसेनेची ताकद वाढवण्याचा निर्धार; उदय सामंतांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Ind vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्टला धावणार, रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Face Care: फक्त ३ दिवसांत स्किन होईल सॉफ्ट आणि ग्लोईंग; आजच ट्राय करा 'हा' घरगुती फेसपॅक

SCROLL FOR NEXT