Waiting Ends for Ladki Bahin Beneficiaries; Check Your Bank Account Now Ladki Bahin Yojana Update  saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना खुशखबर! बँक खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात आले का पैसे? लगेच करा चेक

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाभार्थी आपल्या बँक खात्याचा बॅलन्स किंवा DBT संदेश तपासून माहिती मिळवू शकतात.

Bharat Jadhav

  • लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात.

  • ४५०० रुपयांच्या चर्चेला पूर्णविराम.

  • महिलांना बँक खाते तपासण्याचे आवाहन.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक खात्यात एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे कधी येणार याची प्रतिक्षा अनेकांना होती. आज मात्र महिलांची प्रतिक्षा संपली असून योजेच्या पात्र लाभार्थीच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात एका मराठी वृत्तसंस्थेने वृत्त प्रसारित केले आहे.

दरम्यान मे महिना सुरू होऊन दोन आठवड्यांचा कालावधी लोटला गेला.तरीही एप्रिल महिन्याचे पैसे खात्यात आले नव्हते. बरेच दिवस झाल्यानंतरही पैसे येत नसल्याने मार्च-एप्रिल आणि आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ४५०० रुपये जमा होतील असा अंदाज वर्तवला जात होता, परंतु हा अंदाज आता फोल ठरला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींना १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मे महिना उजडलेला असूनही मार्च आणि एप्रिल अशा दोन महिन्यांचे पैसे खात्यात जमा न झाल्याने लाडक्या बहिणींना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

दोन्ही महिन्यांचे पैसे एकदाच मिळतील, असा दावा केला जात होता. म्हणजेच लाडक्या बहिणींना एकदाच थेट ३००० रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र एकाच महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाली आहेत. आज अनेक महिलांना त्यांच्या बँक खात्यात १५०० रुपये आल्याचा संदेश आला आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी महिलांनी बँक खाते तपासावे असे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे एका प्रकारे लाभार्थी महिलांचाही आकडा कमी झाला आहे.

पडताळणी मोहिमेनंतर ६९ लाख महिलांना ठरल्या अपात्र

मोठ्या प्रमाणावर केलेल्या पडताळणी मोहिमेनंतर महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री माझी लडकी बहिण योजने'अंतर्गत ६९ लाख महिला लाभार्थ्यांना अपात्र ठरवले आहे. त्यांच्या बँक खात्यात पुढील हप्त्याचे पैसे पाठवण्यात आले नाहीये. केवळ सर्व पात्रतेच्या अटी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच या योजनेअंतर्गत लाभ मिळत राहतील, असं महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT