Monsoon Weather Report Saam Tv
महाराष्ट्र

Monsoon: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा १०५ टक्के पाऊस, मुंबईत कधी होणार मान्सूनचं आगमन? जाणून घ्या IMDचा अंदाज

Monsoon Weather Report: मान्सूनवर अल निनोचा कोणताही धोका नसल्याने यंदा चांगल्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.

Bharat Jadhav

हवामान विभागाने यंदाच्या मान्सून बाबत पहिला अंदाज वर्तवलाय. देशात सरासरीच्या 105 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. यंदा मान्सूनवर अल निनोचा धोका नसल्याने देशात चांगला पाऊस पडणार आहे, असं हवामान खात्याने सांगितलंय.

भारत हा कृषीप्रधान देश आहे, यासाठी मान्सून खूप महत्त्वाचा आहे. कारण बहुतेक सिंचन मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते. त्यामुळे पाऊस चांगला झाला तर शेतातील उत्पादन वाढते. देशाच्या सुमारे ४२.३ टक्के लोकसंख्येसाठी शेती हा उपजीविकेचा मुख्य स्रोत आहे. तर देशाच्या जीडीपीमध्ये कृषीचा वाटा १८.२ टक्के आहे.

यंदा मान्सून १ जून रोजीच केरळमध्ये दाखल होणार आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधरण सात ते आठ दिवसात मान्सून मुंबईच्या किनाऱ्यावर धडकतो. यंदाही सरासरीच्या जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. मान्सून त्याच्या नियमित वेळेत भारतात येण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

स्कायमेटनेही या आधी मान्सूनबाबत अंदाज वर्तवलाय. त्यानुसार, ला निना या हंगामात कमकुवत आणि संक्षिप्त असणार आहे. ला निनाचे चिन्ह आता धुसर होत आहे. मान्सूनवर विपरीत परिणाम करणाऱ्या एलनिनोची शक्यता नाहीये. एलनिनो दक्षिणी दोलन फार न्यू्ट्रल राहणार असल्यानं भारतात मान्सूनच्या पावसावेळी तो प्रभावी घटक ठरणार आहे. हिंदी महासागरातील स्थिती एलनिनो प्रभावी न होण्यासाठी उपयोगी ठरू शकते. त्यामुळे मान्सूनचा पाऊस चांगला राहू शकतो, असा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT