Devendra Fadnavis Answer to Abu Azmi''s Question saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Monsoon Session Updates: 'वंदे मातरम्'वरून विधानसभेत गदारोळ, अबु आझमींच्या आक्षेपावर देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट उत्तर

Devendra Fadnavis Answer to Abu Azmi''s Question: विधानसभेत अबु आझमी यांच्या वक्तव्यानंतर प्रचंड गदारोळ झाला. सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब देखील करण्यात आलं.

Chandrakant Jagtap

Maharashtra Pavsali Adhivation 2023 Updates: विधानसभेत अबु आझमी यांनी आम्ही अल्लाहला मानतो त्यामुळे आम्ही 'वंदे मातरम्' म्हणू शकत नाही, असं वक्तव्य केलं. तसेच औरंगाबाद येथील दंगलीतही यावरून वाद झाला असा दावा त्यांनी केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तर दिलं. 'वंदे मातरम्' हे आपलं राष्ट्रगान आहे, सभागृहाचं कामकाज देखील आपण त्या गिताने करतो, त्यामुळे त्यातून चुकीचा अर्थ काढू नका असे फडणवीस म्हणाले. तसेच संभाजीनगरमधील दंगलीत नेमकं काय झालं हेही फडणवीस यांनी सांगितले.

सभागृहात नेमकं काय घडलं?

अबू आझमी म्हाणाले "आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर मी लक्ष वेधत आहे. एक आफताब पुणवला होता, त्याने मुलीची हत्या केली आणि तिच्या धडाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. यानंतर संपूर्ण देशभरात मुसलमानांविरुद्ध कारवाई सुरू झाली. माझ्या मराहाष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये सकल हिंदू समाज आक्रोश रॅली निघू लागल्या. त्या रॅलिंमध्य मुसलमानांना एवढं अपमानित केलं की मुसलमानांपेक्षा मोठी देशद्रोही दुसरा कुणीच नाही".

आम्ही आईसमोरही आम्ही डोकं टेकत नाही - अबु आझमी

पुढे बोलताना अबु आझमी म्हणाले, "'जब गुलिस्तां को जरुरत पडी, सबसे पहले गर्दन हमारी कटी, अब ये हमसे कहते थे अहले चमन, ये चमन हमारा है तुम्हारा नही'. 29 मार्चच्या सायंकाळी 5 वाजता औरंगाबादमध्ये तीन लोक राममंदीराजवल मोटरसायकलवरून आले. त्यांनी 'इस देश मे रहेना है, तो वंदे मातरम कहना होगा' अशा घोषमा दिल्या.

ते म्हणाले, "अध्यक्ष महोदय आम्ही वंदे मातरम म्हणू शकत नाही कारण आम्ही फक्त अल्लाहला मानतो, जगात कोणासमोरही आम्ही डोकं टेकवू शकत नाही. आईसमोरही आम्ही डोकं टेकत नाही. आमचा धर्म याची अनुमती देत नाही. तिथे तरुणांनी या घोषणा दिल्यानंतर परिस्थिती बिघडली. पोलिस आले आणि त्यांनी दोन्ही गटांना पांगवलं, पण रात्री पुन्हा 15 ते 20 लोक आले आणि घोषणाबाजी सुरू केली. यानंतर दोन्हीकडचे लोक जमा झाले."

सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब

अबू आझमी बोलत असतानाच भाजप आमदार आक्रमक झाले आणि त्यांनी सभागृहात घोषणाबाजी केली. विधानसभेत वेलमध्ये येऊन आमदारांनी घोणाबाजी केली. यानंतर सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब झाले. यानतंर सभागृहाचं कामकाज सुरु झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिले.

वंदे मातरम् हे राष्ट्रगान आहे, चुकीचे अर्थ काढू नका - देवेंद्र फडणवीस

फडणवीस म्हणाले, माझी अबू आझमी यांना माझी विनंती आहे की या देशात करोडो लोकांची वंदे मातरम् बाबत श्रद्धा आहे. त्यांनी केलेले वक्तव्य योग्य नाही. असा कोणता धर्म सांगेल आपल्या आई समोर डोकं टेकवू नका. हे धर्म गीत नाही. वंदे मातरम् हे राष्ट्रगान आहे, चुकीचे अर्थ काढू नका. आपण संविधान मानतो म्हणून आपण इथे आलो. सभागृहाला देखील सुरुवात होत नाही. या सभागृहातही आपण वंदे मातरम् आणि जन गण मनं म्हणतो. त्यामुळे मला वाटतं ही भावना योग्य नाही, बाकी आपले मुद्दे आपण इथे मांडा.

चुकीचा एफआयआर दाखल करण्यात आला - अबु आझमी

यानंतर अबू आझमी यांनी पुन्हा संभाजीनगर येथील दंगलीबाबत बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, "त्या रात्री पुन्हा 30 लोक आले आणि त्यानंतर दंगल सुरू झाली. ज्या अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केला. त्याने लिहिले की 250-250 लोक दोन्ही बाजूने होती. मला मान्य आहे की प्रतिक्रियेत ज्या लोकांनी वाहनं जाळली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु 250-250 लोक दोन्हीकडे असताना अटक फक्त एकीकडच्याच लोकांना झाली. त्यावेळी अधिकाऱ्याने सांगितले की गुडघ्याच्या दिशने गोळी झाडली, पण ते खोटं आहे."

ज्याला गोळी ती व्यक्ती घराच्या गेटमध्ये होती - अबु आझमी

आझमी म्हणाले, "गुडघ्यावर गोळी झाडली असती तर डिव्हायडरला लागली असती. कारण तिथे उंच डिव्हायडर आहे. त्याला वर गोळी लागली. तेव्हा लाईट देखील नव्हती आणि अधिकाऱ्याने सांगितले की मी त्यातील 25 लोकांना ओळखले आणि त्यात गोळी लागलेला तरुण देखील होता. तो तर त्याच्या घराच्या कम्पाउंडमध्ये होता. मी क्लिप देखील आणली आहे. अधिकाऱ्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. ती व्यक्ती त्याचं घर चालवणारी एकमेव होती. त्यानतंर हे जे काही रोज होतंय, त्यासाठी हेट स्पीचवर बंदी घातली गेली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने देखील हेच म्हटलं आहे. तसेच ज्या अधिकाऱ्याने गोळी झाडली आणि ज्या व्यक्तीने खोटी एफआयआर घेतली, त्याच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी देखील अबु आझमी यांनी यावेळी केली."

अफवा पसरल्याने जमाव जमा झाला - फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, अबु आजमी यांनी मांडली ती वस्तुस्थिती नाही. जिथे ही घटना घडली त्या परिसरात मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक लोकं राहतात. तिथे राम मंदीर आहे. त्याठिकाणी आधी तिथे तीन लोकं गेली, ते परतत असताना बाचाबाची झाली. त्यानंतर आणखी सहा लोकं गेली. त्यांना सांगण्यात आलं की मंदिर बंद आहे. त्यानतंर ते सहा लोक परतत असताना तिथे अफवा अशी पसरवण्यात आली की, मंदिरात 200-250 लोकं लपून बसली आहेत आणि ते आपल्यावर हल्ला करणार आहेत. त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला. (Tajya Marathi Batmya)

त्यावेळी मंदिरात कोणीच नव्हतं - फडणवीस

फडणवीस यांनी सांगितलं की, " त्यावेळी मंदिरात कोणी नव्हतं. पोलिस हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की आता येथे कोणी नाहीये, कोणीही लपून बसलेलं नाही. कुठलाही हल्ला होणार नाही. पण या अफवेतून परत तिथे मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले. तिथे विटांचे ढिग होते. विटा घेण्यात आल्या. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. दोन्हीकडून पोलिसांवर दबाव होता. त्यात पोलिसच जास्त जखमी झालेत, पोलिसांनाच मार खावा लागला. पोलिसांवरच विटा आल्या." (Latest Political News)

निष्पाप व्यक्तीवर पोलिसांनी गोळी चालवली नाही - फडणवीस

फडणवीस म्हणाले, जेव्हा हे अनियंत्रित होतंय आणि मोठा विषय होतोय असं लक्षात आलं तेव्हा त्यावेळी रबर बुलेट चालवल्या आहेत. माझ्याकडेही सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तो त्या जमावात होता, तो जमाव तिथे दंगा घालताना दिसत आहे. तो कुठल्याही गेटच्या आत नव्हता. त्या जमावाला पांगवण्यासाठी या रबर बुलेट चालवल्या, त्यात त्याला ती रबर बुलेट लागली. त्यामुळे कुठल्यातरी निष्पाप व्यक्तीला पोलिसांनी मारलं हे खरं नाही. मुळात दंगल करणाऱ्यांवर ही कारवाई झाली आहे. त्यामुळे पोलिसांवर यात कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. सीसीटीव्ही फुटेज चेक करूनच जे लोक दंगल करताना दिसत आहेत, त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कोणी निर्दोष आणि निष्पाप आहे आणि त्याच्यावर केस लावली आहे असं नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT