IMD WARNS OF WEAK MONSOON AS EL NINO IMPACT MAY REDUCE RAINFALL ACROSS INDIA Saam Tv
महाराष्ट्र

Monsoon Rain Update : राज्यात किती टक्के पाऊस पडणार? IMD च्या अंदाजाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

Monsoon El Nino Impact Maharashtra Rain Update : भारतीय हवामान विभागाने एल निनोच्या प्रभावामुळे यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याचा परिणाम शेती आणि पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो.

Alisha Khedekar

  • एल निनोच्या प्रभावामुळे यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

  • महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस कमी

  • कमी पावसामुळे शेती, पाणीपुरवठा आणि वीज निर्मितीवर गंभीर परिणाम

  • जुलै ते सप्टेंबरदरम्यान एल निनोचा प्रभाव अधिक तीव्र राहण्याचा अंदाज

Maharashtra Monsoon Update News संपूर्ण देशात यंदाच्या मान्सून हंगामात एल निनोचा प्रभाव राहणार असल्याने सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हवामान खात्याने मान्सूनचा सुधारित अंदाज जाहीर करत देशात यंदा सरासरीच्या ९० टक्के पावसाची शक्यता वर्तवली. यापूर्वी एप्रिल महिन्यात ९२ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे आता हा अंदाज कमी करण्यात आला आहे. दरम्यान यामुळे यंदा बळीराजावर मोठं संकट येण्याचा अंदाज आहे.

हवामान तज्ज्ञांनी महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, जून महिन्यात एल निनोचा प्रभाव तुलनेने कमी राहील. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात त्याचा प्रभाव अधिक जाणवेल, तर सप्टेंबरमध्ये तो सर्वाधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या पावसावर परिणाम होणार असून अनेक भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात घट होऊ शकते. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची मोठी घटजाणवण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

मान्सून काळात कमी पाऊस झाल्यास शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वीज निर्मिती आणि आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. याचे परिणाम पुढील वर्षभर जाणवण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याशिवाय जून महिन्यात काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटा जाणवू शकतात. मान्सून केरळमध्ये (Kerala Monsoon Update) दाखल झाल्यानंतर साधारण काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत पोचतो. मात्र, यंदा मान्सूनच्या प्रगतीला उशीर झाल्याने उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेचा प्रभाव वाढू शकतो, असेही हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

दरम्यान, हवामान तज्ज्ञांनी यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे म्हटले आहे. हवामान खात्याने ९० टक्के पावसाचा अंदाज दिला असला तरी, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता तब्बल ६० टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये यंदाचा मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT