Scorching heat grips Maharashtra as delayed monsoon raises concerns among farmers. saam tv
महाराष्ट्र

अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, राज्यात मान्सूनचं आगमन लांबणीवर?

Maharashtra Monsoon Delay El Nino Farmers Warning: उन्हाचा कडाका प्रचंड वाढल्यानं अंगाची अक्षरशः लाही-लाही होतेय. अशातच आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मान्सूनबाबत एक महत्त्वाची आणि तितकीच चिंता वाढवणारी बातमी समोर आलीये. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट...

Saam Tv

महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेनं नागरिकांची अक्षरशः लाही लाही होतेय. त्यामुळे मान्सूनची प्रतिक्षा असतानाच , हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे राज्यात मान्सूनचं आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सूनचं आगमन 30मेपर्यंत लांबण्याचा अंदाज आहे. प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय झाल्यामुळे श्रीलंकेत दाखल झालेल्या मान्सूनचा पुढचा प्रवास थांबलाय. त्यामुळे राज्यात देखील मान्सूनसाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय...

दरम्यान, राज्यात पुढील 5 दिवस विदर्भासह काही भागांत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. इतकंच नव्हे तर यंदाचा मे महिना गेल्या 114 वर्षांतील दुसरा उष्ण महिना ठरलाय. राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी चंद्रपूरचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश इतके नोंदवले गेले. त्यानंतर यंदा दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी तापमान ब्रह्मपुरीत 47.6 अंश इतके नोंदवलेय गेलेय. हा तापमानाचा उच्चांक सुमारे 114 वर्षांनी दुसऱ्यांदा नोंदवला गेलाय.

मान्सून लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन मात्र वाढलंय. राज्यात यंदा अल नीनोचा प्रभाव असल्यानं शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असे निर्देशच आता कृषी अधिकाऱ्यांनी दिलेत. कृषी अधिकाऱ्यांच्या या सूचनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर नवं आव्हान उभ राहिलंय. एकीकडे, इंधन तुटवड्याचा फटका बसत असतानाच आता मान्सूनच्या हुलकावणीनं बळीराजावर दुहेरी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झालीय.. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता लागले आहेत ते मान्सूनच्या आगमनाकडे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजितदादांच्या राष्ट्रवादीत धूसफूस? राष्ट्रवादीच्या बैठकीला पटेलांची दांडी

Maharashtra News Live Update: हिंगोलीच्या गोरेगाव परिसरातील ओढ्याला अवकाळी पावसामुळे पूर

Pune Crime: पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; ४ परदेशी तरुणींनी नको त्या अवस्थेत पकडलं

निवडणुकीआधी पेटलं 'हलाल' राजकारण? गोकुळचा हलाल सर्टिफिकेटचा वाद कशाला?

3 महिन्यात गेल्या दीड लाख नोकऱ्या, आयटी कंपन्यांकडून नोकरकपात

SCROLL FOR NEXT