महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक निकाल आज लागणार
विधान परिषदेच्या पाच जागांच्या मतमोजणीला सुरूवात
कोण विधापरिषदेचे आमदार होणार हे काही तासांच स्पष्ट होणार
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ५ जागांचा निकाल आज जाहीर होणार आहे. पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीमध्ये ५ जागांसाठी १८२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आज या निवडणुकीचा निकाल लागणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अनेक महायुती, महाविकास आघाडीसह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काही तासांत या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीमध्ये कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले होते आणि या मतदरासंघांमध्ये कुणाविरोधात कोण उभं होतं हे आपण जाणून घेणार आहोत...
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ६४.७६ टक्के मतदान झाले. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ९१.०८ टक्के मतदान झाले. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ६२.७८ टक्के मतदान झाले. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ८५.८७ टक्के मतदान झाले. तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ५८.६७ टक्के मतदान झाले.
नागपूर पदवीधर मतदारसंघ- मानकापूर क्रीडा संकुल, नागपूर
अमरावती शिक्षक मतदारसंघ - लोकशाही भवन, अमरावती
पुणे पदवीधर मतदारसंघ - श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
पुणे शिक्षक मतदारसंघ - श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
छत्रपती संभाजीगर पदवीधर मतदारसंघ - एमआयडीसी, चिकलठाणा
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी आणि महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यात मुख्य लढत झाली. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा जाधव यांच्यात लढत झाली. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण, दिलीप घुगे आणि प्रतापसिंह पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली. अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक, अदिती पोहरे, संगिता शिंदे आणि दत्तात्रय लहाने यांच्यामध्ये लढत झाली. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, शिवसेना शिंदेसेनेचे सचिन सानप, काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि राष्ट्रीय समाजपक्षाचे दत्तात्रय सावंत यांच्यात चौरंगी लढत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.