MHT CET Result 2023  Saam Tv
महाराष्ट्र

MHT CET Result 2023 : महाराष्ट्रात एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल कधी ? कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

कोमल दामुद्रे

MHT CET Results : बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना नजर एमएचटी सीईटी परीक्षेकडे लागले होते. महाराष्ट्र बोर्डाने आता सीईटी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. अशातच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

शिक्षण (Education) विभागाकडून एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल १२ जून रोजी सकाळी ११ वाजता लागणार आहे असे सांगण्यात आले. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी cetcell.mahacet.org या वेबसाइटवर पाहू शकता.

1. महाराष्ट्र CET निकाल 2023 कधी येईल?

ऑनलाइन (Online) न्यूज वेबसाइट इंडियन एक्सप्रेसनुसार, महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने आज महाराष्ट्र आरोग्य आणि तांत्रिक सामायिक प्रवेश परीक्षेच्या (MHT CET) निकालाची तारीख आणि वेळ (Time) जाहीर केली. महाराष्ट्र सीईटीचा निकाल १२ जून रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. MHT CET PCM गटासाठी 9 मे ते 14 मे आणि PCB गटासाठी 15 मे ते 20 मे दरम्यान घेण्यात आली. २६ मे रोजी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. उमेदवारांना 28 मे पर्यंत हरकती नोंदवण्याची संधी देण्यात आली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार नमूद केल्यानुसार त्यांचा निकाल पाहू शकतात.

2. कसा तपासाल निकाल ?

  • निकाल जाहीर झाल्यानंतर, सर्वप्रथम cetcell.mahacet.org च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

  • होम पेजवर 'MHT CET Result 2023' लिंक सक्रिय होईल, त्यावर क्लिक करा.

  • लॉगिन क्रेडेन्शियल्स येथे प्रविष्ट करा .

  • तुमचा महाराष्ट्र CET निकाल 2023 स्क्रीनवर ओपन होईल तो तपासा.

  • निकाल डाउनलोड करुन प्रिंटआउट घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajinkya Rahane: रेडी टू स्ट्राइक...! अजिंक्य रहाणेने टीम इंडियाला खिजवलं; खेळाडू फ्लॉप ठरताच केली 'अशी' पोस्ट

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

Indian Army Job: बक्कळ पगार अन् इंडियन आर्मीत नोकरी करण्याची संधी; अशी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT