Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: नागपूरमध्ये युवक काँग्रेसचं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात आंदोलन

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 18 September: आज बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, गणेश विसर्जन, मनोरंजन, क्रीडा, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स, बिझनेस क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

नागपूरमध्ये युवक काँग्रेसचं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात आंदोलन

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड तसेच भाजपच्या नेत्यांकडून राहुल गांधींच्या विरोधात केलेल्या वक्तव्य विरोधात आंदोलन करण्यात आले. काँग्रेस आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले.

आठ दिवसात शेतकऱ्यांना मिळणार 25 टक्के अग्रीम; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

राज्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांचा रँडम सर्वे येत्या आठ दिवसात पूर्ण करून 25% अग्रीम पिक विमा मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच या मदती संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पिक विमा कंपनीला याबाबत सूचना दिल्याचे देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

गणेशभक्तांवर दारूच्या नशेत लाठीमार; वरिष्ठ पोलीस अधिकारी सस्पेंड

मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांनी दारूच्या नशेत जळगाव जामोद येथे गणेश भक्तांवर लाठीमार केला. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई केली आहे.

कांदिवलीत गुंड आणि त्याच्या साथीदारांकडून महिला पोलीस शिपायाचा विनयभंग

गुंड हरीश मांडवकरसह चार जणांविरोधात विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल रात्री कांदिवलीत विसर्जन स्थळी लाईन तोडून पुढे जाणाऱ्या हरीश मांडवकर आणि त्याच्या साथीदारांना महिला पोलीस शिपायाने रोखल्याने वाद झाला होता. हरीश मांडवकर आणि त्याच्या साथीदारांनी महिला पोलिसांना धक्का मारून दादागिरी केली. याप्रकरणी हरीश मांडवकर आणि त्याच्या साथीदारा विरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

प्रहार जनशक्ती पक्षाकडून निफाड आणि चांदवडसाठी उमेदवारी जाहीर

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने नाशिकच्या निफाड येथे शेतकरी मेळावा व पक्षप्रवेश सोहळा ठेवण्यात आला होता या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप ओबीसी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व माजी निफाड पंचायत समिती उपसभापती गुरुदेव कांदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला यावेळी बच्चू कडू यांनी निफाड विधानसभा मतदार संघात गुरुदेव कांदे यांची तर चांदवड विधानसभा मतदारसंघात प्रहार संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. निफाड आणि चांदवड विधानसभा मतदारसंघात आता त्रिशंकू लढत निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे.

जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यांचे उपोषण स्थगित करा

:मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी १७ सप्टेंबर पासुन पुन्हा एखदा आमरण उपोषण सुरू केले असुन त्यामुळे जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे त्याचा गांभीर्याने विचार करुन जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या शासनाने मान्य करून त्यांचे उपोषण स्थगित करावे अन्यथा जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्याचा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला याबाबत जिल्हाधिकार्‍यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.

Anil Bonde on Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पुन्हा बोलू नये म्हणून चटके द्या म्हटलं; अनिल बोंडेंचा पुन्हा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधींच्या जिभेला चटके द्यायला हवं, असं वादग्रस्त विधान भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं होतं. या विधानानंतर अमरावतीच्या राजापेठ पोलिसात त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. त्यानंतर पुन्हा एकदा मुंडेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा बोलू नये म्हणून चटके द्या म्हटलं, असा हल्लाबोल अनिल बोंडे यांनी चढवलाय.

बुलढाण्यात अतिसारामुळे एका चिमुरडीचा मृत्यू

गोमल गावात अतिसराने एक चिमुरडी दगावली आहे. नीलम तळवडे असं दगावलेल्या चिमुरडीच नाव आहे. तर अतीसाराने त्रस्त दोन रुग्ण झोळीत घालून जळगाव जामोद येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे का? बुलढाणा आरोग्य प्रशासनाने अतीसाराची साथ आटोक्यात आल्याचा दावा केला होता. पुन्हा चिमुरडीच्या मृत्यूने गोमाल गावातील नागरिक भयभीत झालेत.

Ratnagiri Politics:  आमदार नितेश राणे हे खंडणीखोर! माजी आमदार उपरकर यांचा आरोप

परशुराम उपरकर यांच अक्क आयुष्य ब्लॅकमेलिंग व टक्केवारी मागण्यात गेल असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता.या आरोपाला परशुराम उपरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. नितेश राणे हेच खंडणीखोर आहेत. त्यांच्यावर मुंबई येथील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच माझ्या कुंडल्या काढण्याच्या भानगडीत नितेश राणेंनी पडू नये. कारण नितेश राणे आणि त्यांचे वडील खासदार नारायण राणे यांच्या अनेक कुंडल्या माझ्याकडे आहेत. माझ्या कुंडल्या काढण्याचा प्रयत्न नितेश राणे यांनी केला तर, मी तुम्हाला साफ उघडा पाडेन असा इशारा, माजी आमदार परशूराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेतून नितेश राणे यांना दिला आहे.

Mahape News: महापे एमआयडीसीतील सेमीकंडक्टर प्रकल्पाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार उद्घाटन

राज्यातील महापे एमआयडीसीमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत पहिल्या टप्प्याचे उद्घाटनसाठी दाखल झाले आहेत. सेमीकंडक्टर प्रकल्पामुळे १२ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.

PM Modi: पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या विशेष वैद्यकीय सहायता कक्षाचे आयोजन.

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर “मोदी सेवा महिना” राबविण्यात येणार.

विशेष वैद्यकीय मदत कक्षामार्फत राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करणार.

FIR Filed Against MP Anil Bonde : राहुल गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जपचे खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा सरकारला चांगला प्रतिसाद

लाडकी बहीण योजनेचा सरकारला चांगला प्रतिसाद

योजनेबाबत विरोधक टीका करत असले तरी त्याचा परिणाम होणार नाही

बजेटचे योग्य नियोजन केल्यास लाडकी बहीण योजनेसाठीचा पैसा कमी पडणार नाही

इतर सगळ्या योजना सुरळीत ठेऊन लाडकी बहीण योजना सुरू ठेवण शक्य असल्याची सरकारमधील खास सूत्रांची साम टिव्हीला माहिती दिली.

महायुतीची जागावाटपाची चर्चा महिना अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

महायुतीची जागावाटपाची चर्चा महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न - सूत्र

महायुतीतील तीनही पक्ष आग्रही असलेल्या जागांचा तिढा वरिष्ठ पातळीवर दिल्लीत अमित शाहा यांच्याकडे सोडवला जाणार- सूत्र

अजित पवार-एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणविस- एकनाथ शिंदे या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत दोन स्वतंत्र बैठका झाल्या

ज्या कॉमन जागांवर आग्रह आहे, अश्या जागांबाबत चर्चाही झाली. मात्र, ज्या जागांवर तीनही पक्ष आग्रही आहेत. अश्या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही

महायुतीतील तिनही पक्ष ज्या जागांवर आग्रही आहे, अशा वाद असेलेल्या जागांबाबत अमित शाहा यांच्याकडे बैठक धेत तोडगा काढला जाईल

लोकसभेच्यावेळी तीनही पक्ष आग्रही असलेल्या जागांबाबत अमित शाहांनी बैठक घेऊन तिढा सोडवलेला होता

महामंडळ जागावाटप संदर्भात आज सीएमसोबत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस बोलणार

महामंडळ जागा वाटप संदर्भात आज सीएम सोबत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस बोलणार

महामंडळ वाटप करताना भाजपा आणि एनसीपी पक्षाच्या कोट्यातील महामंडळ वाटप लवकर करावे ही भूमिका आहे. पण अंतर्गत पक्षात वाद नको यामुळे महामंडळ जागा वाटप करावे का याबाबत आज अजित पवार त्यांच्या नेत्या समवेत संवाद करण्याची शक्यता आहे.

एनसीपी पक्षाच्या कोट्यात असलेल्या महामंडळांचे वाटप लवकर करावे यासाठी अजित पवार आग्रही आहेत.

अमरावतीच्या अचलपूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे ट्वीट

भाजपा आणि महायुतीच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला आहे.

पुरोगामी महाराष्ट्राची सुस्कृंत राजकीय परंपरा संपवण्याचा उद्योग २०१४ ला सुरु झाला तो रोज खालच्या पातळीवर जात आहे.

भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते दररोज महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासत आहेत आणि त्यांचे नेते मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचा या वाचाळवीरांना मूक पाठिंबा आहे हे अत्यंत धोकादायक आहे.

संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्यावर त्वरित कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालणारे त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्या एवढेच दोषी आहेत.

संजय गायकवाड, अनिल बोंडेंना तर जनता शिक्षा तर देईलच पण यांच्या कर्माची फळं यांना पाठीशी घालणा-या नेत्यांनाही भोगावी लागणार आहेत.

मागच्या वेळी अमरावतीत दंगल केली म्हणून अनिल बोंडे यांना खासदारकी मिळाली-काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप

गेल्या दीड तासापासून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे सह काँग्रेस कार्यकर्त्यांच पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या दालनात आंदोलन सुरू

अनिल बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी

वायफळ माणूस भाजपने त्याला खासदार केलं,गुन्हे दाखल झाले पाहिजे

क्यूआर कोड स्कॅन करा आणि रेल्वे तिकिटाचे पेमेंट करा

क्यूआर कोड स्कॅन करा आणि रेल्वे तिकिटाचे पेमेंट करा,सोलापूर रेल्वे विभागाने दिली आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

सोलापूर रेल्वे विभागाच्या तिकीट काऊंटरवर आता यूपीआय क्यूआर कोडची सुविधा करून देण्यात आली आहे उपलब्ध

कोणत्याही प्रवश्याला रेल्वे स्थानकावर आरक्षित आणि जनरलच्या तिकिटासाठी क्यूआर स्कॅन करून रक्कम भरता येईल

यागोदर पीओएस स्वॅप मशीन आणि कॅश स्वरूपात स्वीकारली जातं होती तिकिटाची रक्कम

यामुळे आता प्रवश्यांच्या वेळेत बचत होऊन त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मदत होणार आहे.

Maharashtra Politics : अजित पवार 21 सप्टेंबरला कोकण दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार 21 सप्टेंबरला कोकण दौऱ्यावर

राष्ट्रवादी कॅाग्रेसची जनसन्मान यात्रा शनिवारी चिपळूणमध्ये

अजित पवारांच्या दौर्यानंतर शरद पवार यांची देखील कोकणवारी

शरद पवार २२ आणि २३ तारखेला कोकण दौऱ्यावर

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार कोकणात आढावा घेणार असल्याची सूत्रांची माहिती

वरिष्ठांची संमतीनेच मी,कामाला लागलो, माजी आमदार संदीप बाजोरियांनी सुरू केलाय यवतमाळात प्रचार

महविकास आघाडी आणि महायुती मध्ये थेट लढत होणार आहे, महाविकास आघाडी कडून सगळ्या पक्षांना वाटते की आमची तिकीट फायनल आहे. परंतु सगळ्यात अनुभवी म्हणून विधिमंडळाचा अनुभवी असलेला उमेदवार म्हणून मी स्वतःला बघतो माझ्याकडे विधिमंडळाची सहा वर्षे होती त्यातील चांगले कामे करून दाखवली आहे. जिल्ह्याचे प्रश्न असो राज्याचे प्रश्न असो मी विधानसभेत सभागृहात मांडलेली आहे आणि गुंडशाहीला संपवण्यासाठी एकमेव पर्याय मी असू शकतो आणि वरिष्ठांची संमती घेऊनच मी कामाला लागलेला...

अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येथे ओबीसींच प्राणांतिक उपोषण....

अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडिगोद्री येथे ओबीसी समाजाचे उपोषण सुरू झालेय,मंगेश ससाणे सोबत पाच ओबीसी आंदोलक उपोषण करत आहे, सगे सोयरे अधिसूचना रद्द करावी ,कुणबी दाखल्याद्वारे होत असलेली घुसखोरी थांबवावी या सह अन्य मागण्यासाठी ओबीसी आंदोलक उपोषण करत आहे.

Pune News  

पुण्यात २६ तास झालं तरी मिरवणुका सुरूच

पुण्यात आता पर्यंत १४५ मंडळाच विसर्जन झाले आहे

आणखी १०० मंडळा असल्याची पालिकेची माहीती

आणखी 2 तास चालु शकते विसर्जन मिरवणुक

खडसे परिवारामध्ये कोण कुठल्या पक्षामध्ये आहे तेच कळत नाही. कुठ कोण जाणार आहे कोण विधान परिषदेवर जाणार आहे. लोकसभेत कुणी कसा प्रचार केला हे सर्वांनाच माहित आहे जाणार आहे असा सर्व गोंधळ महाराष्ट्रासमोर आहे.
रूपाली चाकणकर

Dhule News : गणपती विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर खाली चिरडून झालेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला

गणपती विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर खाली चिरडून झालेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला

ट्रॅक्टर खाली चिरडल्या गेल्याने तिघा चिमुकल्यांचा काल दुर्दैवी मृत्यू झाला होता, आणि आज गंभीरित्या जखमी असलेल्या गायत्री पवार या पंचवीस वर्षे महिलेचा देखील उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे

धुळे तालुक्यातील चितोड येथे काल गणपती मिरवणुकी दरम्यान ट्रॅक्टर चालकाच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली होती

आता या दुर्घटनेत मृतांचा आकडा तीन वरून चार वर पोहोचला आहे

गणपती मिरवणुकी दरम्यान झालेल्या या दुर्घटनेमुळे चौघांचा मृत्यू झाल्याने गणपती मिरवणुकीला गालबोट लागले आहे

शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय या रुग्णालयात अद्यापही पाच जखमींवर उपचार सुरू आहेत, या दरम्यानच गायत्री पवार या गंभीर जखमी असलेल्या महिलेचा आज सकाळी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे

Maharashtra News Live Updates :  आरक्षण मागणीसाठी शेळ्या मेंढ्यांसह धनगर समाजाचा माळशिरस येथे रास्ता रोको आंदोलन

पंढरपुरातील धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज माळशिरस येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे अडीच तासाहून अधिक काळ शेळ्या मेंढ्यांसह धनगर महिला आणि पुरुषांनी एकत्रित येऊन रास्ता रोको केला. त्यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग अडवून ठेवण्यात आला. गजी ढोल वाजवून सरकारचा निषेध केला.‌ पंढरपुरात धनगर बांधवांचे सलग दहाव्या दिवशी उपोषण सुरू आहे. एसटी प्रमाणपत्राच्या अंमलबजावणीसाठी आता राज्यातील धनगर समाज आक्रमक होत रस्त्यावरची लढाई करताना दिसत आहे. सरकारने धनगर समाजाला एसटी चे आरक्षण द्यावे अन्यथा सरकारला कायमचे घरी बसवू असा इशारा धनगर समाजाचे नेते सोमनाथ वाघमोडे यांनी दिला आहे.

भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक

भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्या नंतर काँग्रेस आक्रमक

अमरावती शहर पोलीस आयुक्त कार्यालयात काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे,माजी मंत्री सुनील देशमुख यांच्या सह काँग्रेसचे ठिय्या आंदोलन सुरू

अनिल बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी

पोलिसांनी अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल न केल्याने यशोमती ठाकूर पोलीसावर भडकल्या

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या दालनात यशोमती ठाकूर यांच ठिय्या आंदोलन सुरू

जोपर्यंत डॉक्टर बोंडेवर तक्रार दाखल होत नाही व अटक करत नाही तोपर्यंत पोलीस आयुक्त यांच्या दालनातून उठणार नाही यशोमती ठाकूर यांची मागणी

कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर दोन डंपर चपलांचे ढीग

कोल्हापुरात सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचं विसर्जन झालं. डॉल्बीच्या दणदणाटात मोठी मिरवणूक काढण्यात आली. याच मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणांच्या चपलांचा ढिग मिरवणूक मार्गावर पडलाय. तब्बल दोन डंपर कचरा या मिरवणूक मार्गावर मिळाला. महानगरपालिकेकडून हा कचरा उठवण्याचं काम सुरू झालंय. प्रचंड प्रमाणात चपलांचे ढिगारे या मार्गावर पाहायला मिळाले.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १५ दिवसांत मुख्यमंत्री निवास सोडणार

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १५ दिवसांत मुख्यमंत्री निवास सोडणार

सरकारी निवासस्थान रिकाम केल्यानंतर केजरीवाल जनतेमध्ये राहणार

केजरीवाल कुठे मुक्काम करणार हे अद्याप ठरलेले नाही

मुख्यमंत्र्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सरकारी सुविधाही केजरीवाल सोडणार

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांची माहिती

पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाला दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता

पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाला दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता

वाकड परिसरातील भाजपाचे माजी नगरसेवक राम वाकडकर पक्षाला रामराम ठोकण्याचे तयारीत

तीन दिवसांपूर्वी वाकडचे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी देखील भाजपाला ठोकला होता रामराम

राम वाकडकर यांनी शहर उपाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवल्याची खात्रीशीर सूत्रांची माहिती

विरार जवळ धावत्या ट्रेनमधून पडून प्रवाशाचा मृत्यू

पालघरहून चर्चगेट दिशेने जाणाऱ्या धावत्या ट्रेन मधुन पडुन एक प्रवासी मयत झाल्याची घटना घडली आहे ... विरार जवळील नारिंगी फाटकाजवळ त्याचा मृतदेह दिसल्याची महिती प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला दिल्यानंतर रेल्वे पोलीस व स्टेशन मास्टर यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत शविच्छेदनासाठी पाठविला आहे ... ४० ते ४५ वयोगटातील हा इसम असून डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत आहे.. सदर मयाती समाची ओळख पटली नसल्याची महिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे .. या घटनेची नोंद वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात कऱण्यात आली आहे ..

semiconductor projects in maharashtra

राज्यातील पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे आज होणार उद्घाटन

सेमीकंडक्टर प्रकल्पावरून महा विकास आघाडीने महायुतीवर केला होता हल्लाबोल

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

सेमीकंडक्टर प्रकल्पामुळे १२ हजार कोटींची गुंतवणूक होणार

आज शिंदे व फडणवीसांकडून महा विकास आघाडीचा खरपूस समाचार घेण्याची शक्यता

ठाणे जिल्ह्यातील महापे एमआयडीसी मध्ये होणार उद्घाटन

Pune Miravnuk News : डीजेमुळे रस्ता अडवून ठेवल्याने पोलिसांचा कार्यकर्त्यांना चोप | Marathi News

Maharashtra Politics News

- तिसऱ्या आघाडीत MIM ला नो एंट्री, बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण

- उद्या तिसऱ्या आघाडीसंदर्भात बच्चू कडू, राजू शेट्टी, छत्रपती संभाजी राजे आणि अन्य नेत्यांची महत्त्वाची बैठक

- तिसरी आघाडीची महाशक्ती निर्माण करणार

- इतरांची आघाडी आणि युती तर आमची जनतेची शक्ती राहील

- MIM अथवा धार्मिक प्रखरता असणाऱ्यांना सोबत घेणार नाही

- आमची लढाई जाती धर्मापलीकडे, MIM ची प्रखरता पचवणं आम्हाला शक्य नाही

- धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षापासून आम्ही दूर राहणार

MLA disqualification case

आमदार अपात्रता प्रकरणी आजही सुनावणी होणार नाही

आज देखील प्रकरण नंबर १ ऐकलं जाणार असल्याने यावर सुनावणी होणार नाही

उद्या या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता

Mumbai Crime News

अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार

६० वर्षीय शेजार्यानेच केले १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

धारावीतील धक्कादायक घटना

मास्क घालून स्वतःची ओळख लपवून केला होता चिमुरडीवर हल्ला

मात्र झटापटीत मस्त थोडा बाजूला झाल्याने तसेच अल्पवयीन मुलीने आवाज ओळखल्याने नराधमाच्या बिंग फुटलं

आरडाओरड केल्यास गळा कापण्याची तसेच कोणाला काही सांगितल्यास ॲसिड फेकण्याची दिली होती धमकी

हल्ल्यात अल्पवयीन मुलीच्या गळ्याला जखम

बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलम ४, ८, १२ अंतर्गत नराधमाला अटक

धारावी पोलिसांनी केली अटक

Pune Crime News

हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील बावधन चौकीच्या जवळ असणाऱ्या नर्सरी मधील प्रवीण महतो वय 25 याचा धारदार हत्याराने झोपेत असतानाच गळा चिरून रात्री दीड वाजण्याचे सुमारास मर्डर झालेला होता.

महाविकास आघाडीची दुपारी एक वाजता बैठक

महाविकास आघाडीची दुपारी एक वाजता बैठक

गणेशोत्सव नंतर जागा वाटपावर पुन्हा एकदा महाविकास आघाडी चर्चा करणार

महाविकास आघाडीचे मुंबईचे जागावाटपावर आज अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती

मुंबई सोबत महाराष्ट्रातील इतर जागांवर सुद्धा महाविकास आघाडीचे नेते चर्चा करणार

संजय गायकवाड किंवा अनिल बोंडे यांना समर्थन नाही. पण राहुल गांधी यांनी सांभाळून बोललं पाहिजे. नेहरू यांनी आरक्षण विकासाला अडसर असल्याचं म्हंटल, राहुल गांधी यांनी बुद्धीहीन लोकांना आरक्षण मिळते, जे आरक्षण मिळाले ते बुद्धीहीन आहे का? राहुल गांधी तेच म्हणत आहे. कबूल करत आहे. आम्ही ठरवलं जेव्हा जेव्हा राहुल गांधी महाराष्ट्रात येईल त्यांना आरक्षणासाठी प्रश्न विचारू, मोदीजी बद्दल खोटे बोलले, तुमची भूमिका स्पष्ट करा नंतर बोला.
चंद्रशेखर बावनकुळे

Pune Crime News: गणपती विसर्जनादिवशी २ खून, पुणे हादरलं

विश्रांतवाडी मध्ये महिलेचा खून तर बालेवाडी परिसरात कामगाराचा खून. तुषार बालवडकर यांच्या जागेत ग्रीन ड्रीम नर्सरी बावधन या ठिकाणी मयत इसम नामे प्रवीण कुमार भोला महतू वय 26 वर्ष राहणार सदर (मूळ बिहार )याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी आज पहाटे धारदार हत्याराच्या साह्याने गळा कापून जिवे मारले आहे.

Pune Ganeshotsav 2024:  २४ तास उलटूनही पुण्यातील विसर्जन मिरवणुका सुरुच

24 तास उलटूनही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अद्याप सुरू

पुण्यातील अलका चौकातून केवळ 117 मंडळ विसर्जनासाठी आतापर्यंत गेली आहेत

अजूनही पुण्यातील लक्ष्मी रोड,केळकर रोड,कुमठेकर रोड, टिळक रोडवर मंडळांची मिरवणूका सुरूच

मिरवणूक संपण्यासाठी अजून तीन ते चार तास लागण्याची शक्यता

लवकरात लवकर मंडळ पुढे काढण्यासाठी पुणे पोलीस करत आहेत प्रयत्न

Jalgaon Dispute News: जळगाव जामोद येथे तणावपूर्ण शांतता;   15 तासांनंतरही बाप्पाचे विसर्जन नाही...

काल सायंकाळी गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन गटात झालेल्या वादात जळगाव जामोद शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आणि यामध्ये अनेक वाहनांचे नुकसान झालं आहे. जळगाव जामोद शहर तनावपूर्ण शांतता आहे....

चौभारा या परिसरात अक्षरशा काचांचा खर्च पडला आहे . दगड विटांचा खर्च पडलेला आहे तर अनेक वाहने रस्त्यात उभी असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अनेक घरांवरही दगडफेक झाल्याने घरांचंही नुकसान झालं आहे.. तसेच जोपर्यंत दगडफेक करणारे अटक होत नाही तोपर्यंत गणेश विसर्जन केल्या जाणार नाही अशी भूमिका गणेश मंडळानी घेतलीय..

Nandurbar News:  युवा शेतकऱ्याने भंगार वस्तूंपासून घरी बनवला 55 फूट बूम स्प्रे मशीन

वडिलांसाठी नोकरी सोडून गावाकडे परतलेल्या युवकाला शेतीत अनेक अडचणी येऊ लागल्या.जोडधंदा म्हणून शेती साहित्य भाडे तत्वावर देऊ लागला.या शेतकरी युवकाने युट्युब वर पाहून काही साहित्य खरेदी केले.तर बाकी समान भंगार मधून गोळा करीत नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा या लहानशा गावात राहणाऱ्या कमलेश चौधरी या शेतकऱ्याने 55 फूट लांब हायड्रोलिक बूम स्प्रे बनवला आहे. जो वीस मिनिटात दहा एकर शेतात कीटकनाशक फवारणी करतो.मागील वर्षी त्याने 27 फूट मेन्यूअली बुम स्प्रे तयार केला होता.त्यात त्याने भाडेतत्वावर 1850 एकरावर फवारणी केली होती.

Pune Crime News Update 

विश्रांतवाडी कळस मारवाडी येथे प्रेम प्रकरणात महिलाचे डोक्यात कोयत्याने मारून मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी आहे. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन माहिती कळतात तातडीने पोचले. जखमी महिलाला ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. आरोपीला विश्रांतवाडी पोलीस स्टेशन ने ताब्यात घेतले. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस स्टेशन करत आहे.

Ganesh Visarjan 2024

पुणे अलका चौकात मंडळाची गर्दी

एकाच वेळी अनेक मंडळ चौकात दाखल

अजूनही महत्वाच्या चार ही रस्त्याने मंडळ येत आहेत

मानाच्या गणपती वेळेत विसर्जन झाले तरीही अजून पुण्यात मिरवणुका सुरूच

Maharashtra News Live Updates : पुण्याहून अजित पवार थेट मुंबईतील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात दाखल

पुण्याहून अजित पवार थेट मुंबई मध्ये राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात दाखल

राष्ट्रवादीच्या कार्यालयात विधानसभेसाठी आणि महामंडळासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत अजित पवार साधणार सवांद

अजित पवार कार्यकर्त्यांशी सवांद साधून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देखील करणार

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीतून ३०० जण इच्छूक तर विधान सभेसाठी ४०० कार्यकर्ते इच्छूक

आम्हाला संधी द्या अन्यथा आम्ही शरद पवार यांच्याकडे परत जाऊ असाही काही आमदारांचा आक्रमक पवित्रा… या सगळ्या इच्छूकांशी दादा थेट साधणार संवाद

देवेंद्र फडणवीस हे फेक नरेटीव्हचे बादशाह; यशोमती ठाकूर यांची टीका

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर टीका केली होती त्यानंतर त्यांच्यावर बुलडाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्यावर काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांनी बोंडे यांचा चांगला समाचार घेतला आहे. डॉक्टर बोंडे यांचं संतुलन बिघडलं असेल त्यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती झाला पाहिजे.

Maharashtra News Live Updates : नांदगावात मराठा आंदोलकांचे साखळी उपोषण..

Maharashtra News Live Updates : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, त्यासंबंधी सर्व मागण्या मान्य व्हाव्या म्हणून संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्यांदा आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे..या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या नांदगाव येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर मराठा आंदोलकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.

पहिल्या टप्प्यासाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 11.11% मतदान

Marathi  News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ सप्टेंबर अमेरिका दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ सप्टेंबर अमेरिका दौऱ्यावर

ते क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत मोदी सहभाग घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून जिथे ते क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत आणि संयुक्त राष्ट्रांच्या 'समिट ऑफ द फ्युचर' मध्ये सहभागी होतील

क्वाड नेत्यांची चौथी शिखर परिषद ही मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील सर्वात महत्त्वाची बैठक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय

तीन दिवसांच्या या दौऱ्यात मोदी २२ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करतील

या दौऱ्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत

भेटीची वेळ आणि ठिकाण अद्याप निश्चित झालेलं नाही

अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी ट्रम्प भेट महत्वाची असेल

वर्धेत पर्यावरण पूरक गणेश विसर्जन कुंडात 3500 गणेश मूर्तीचे करण्यात आले विसर्जन

- वर्धेत पर्यावरण पूरक गणेश विसर्जन कुंडात 3500 गणेश मूर्तीचे करण्यात आले विसर्जन

- गेल्या दहा वर्षापासून वैद्यकीय जनजागृती मंच राबवत आहेत पर्यावरण पूरक गणपती विसर्जन कार्यक्रम

- महाआरती व गणेश विसर्जन कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती

- विसर्जित गणेश मूर्तींच्या माती रिसायकल करून बनवण्यात येते पुन्हा गणेश मूर्ती

- निर्माल्यापासून खत बनवून ऑक्सिजन पार्क येथील 25000 झाडांना देण्यात येते खत

- आगळ्यावेगळ्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमाचे होत आहे वर्धेत कौतुक

- वैद्यकीय जनजागृती मंचाच्या स्तुत्य उपक्रमाला जिल्हा प्रशासनाची ही मिळते साथ

- वर्ध्याच्या ऑक्सिजन पार्क येथील पर्यावरण पूरक गणेश विसर्जन कुंडाला वर्धेकरांची पसंती

Maharashtra News Live Updates :  सोलापुरात वाहतूक शाखेकडून बुलेटच्या सायलेन्सरवर रोडरोलर फिरवण्यात आलाय

- सोलापुरात वाहतूक शाखेकडून बुलेटच्या सायलेन्सरवर रोडरोलर फिरवण्यात आलाय.

- 200 हून अधिक मोठा आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर फिरवण्यात आला आहे रोडरोलर

- सायलेन्सर सह 2000 पेक्षा अधिक फॅन्सी नंबर प्लेट ही नष्ट करण्यात आल्या

- पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पदभार घेतल्यानंतर फॅन्सी नंबर प्लेट आणि कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर जप्त करण्याची मोहीम राबविण्यात आली

- त्यानंतर सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने 200 सायलेन्सर आणि 2 हजार फॅन्सी नंबर प्लेट नष्ट करण्यात आल्या,शिवाय आर्थिक दंड ही करण्यात आला आहे.

- वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन सोलापूर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

- त्यामुळे वाहतूक शाखेने केलेल्या या कारवाईच सर्वसामान्य सोलापूरकरांकडून कौतुक केलं जातय.

मराठा बांधवांकडून अनोखे उपोषण

- बार्शीत मनोज जारंगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांकडून अनोखे उपोषण सुरू

- खाली डोकं वर पाय करत सुरू केले अनोखे उपोषण

- आनंद काशीद या जरांगे समर्थकाने सुरू केले हे अनोखे आंदोलन

- अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या बार्शीत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून सुरू करण्यात आले उपोषण

- बार्शीतील तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाला ओबीसीतील आरक्षण द्यावे या मागणीसाठी सुरू केलं उपोषण

'हम्फ्रे फेलोशिप प्रोग्राम'साठी नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड

- अमेरिकेच्या प्रतिष्ठित 'हम्फ्रे फेलोशिप प्रोग्राम'साठी नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड

- ‘लिडरशिप फॉर 21- सेंचुरी’ या कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड झाली आहे.

- या फेलोशिपसाठी निवड झालेल्या भारतातून त्या एकमेव अधिकारी आहेत

- या फेलोशिपसाठी जगातील 12 देशांतील प्रतिष्ठित 12 व्यक्तींची निवड झाली असून यामध्ये भारतातून बिदरी यांचा समावेश आहे.

- या फेलोशिप अंतर्गत जागतिक स्तरावरील प्रमुख वक्ते, निवड झालेले सहभागी यांच्यामध्ये नेतृत्वाभोवती निर्माण होणाऱ्या समस्या,आव्हान आणि उपाययोजनावर चर्चा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

SCROLL FOR NEXT