Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 19 September: आज गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, गणेश विसर्जन, मनोरंजन, क्रीडा, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स, बिझनेस क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Pension News :  राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर

राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन १०००० रुपये पेन्शन मिळणार

बँकेच्या ५०० हून जास्त कर्मचाऱ्यांना होणार लाभ

राज्य सहकारी बँकेचा नफा ६०९ वरुन ६१५ कोटी रुपये झाला

घोटाळ्यांचा आरोप झाल्यानंतर प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्याकडे राज्य सहकारी बँकेचा कारभार

MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात २२ ऑक्टोबरला होणार?

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात २२ ऑक्टोबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या कॉम्पुटर जनरेटेड तारखेमधे सुनावणीची तारीख थेट महिन्याभराने देण्यात आली आहे. शनिवारी येणाऱ्या कामकाजाच्या नव्या लिस्ट मधे सुनावणी कधी होणार हे स्पष्ट होणार आहे. मागच्या २ आठवड्या पासून हे प्रकरण सुनावणीसाठी बोर्डावर आलंच नाही. कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी घेत का हे पाहणं महत्वाच आहे. कोर्टाने पुढील आठवड्यात सुनावणीची तारीख दिली तर विधानसभेच्या आधी निकाल लागतो का हे पाहणं महत्वाच आहे.

Amaravati News : भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक

अमरावतीच्या दर्यापूर येथे भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक

दर्यापूर येथे अनिल बोंडे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात अनिल बोंडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने संतप्त पडसाद

युवक काँग्रेसचे प्रदेश सागर कलाने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

अनिल बोंडेचा पुतळा जाळून भाजपा व बोंडे विरोधात नारेबाजी

Sanjay pandey : मी निवडणूक लढण्यावर ठाम - माजी पोलीस आयुक्त संजय पांडे

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठं भाष्य केलं. - मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे. ⁠या संदर्भात पक्ष निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. लोकसभा निवडणुकीसाठी ते उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक होते. आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.

बदलापूर अत्याचार प्रकरण;SIT कडून कल्याण सत्र न्यायालयात चार्जशीट दाखल

एसआयटीच्या प्रमुख आयपीएस अधिकारी आरती सिंग यांनी पुष्टी केली आहे. दोन गुन्ह्यांच्या दोन स्वतंत्र चार्जशीट दाखल केली आहे. यात विविध तांत्रिक पुरावे, जबाब समाविष्ट असलेली ५०० पेक्षा जास्त पानांची चार्जशीट दाखल करण्यात आलीय. यासोबतच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील देण्याचीही एसआयटीची राज्य सरकारकडे मागणी केलीय.

Nashik Politics: भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना जीवे मारण्याची धमकी

विजय गायकवाड नावाने फोनवरून दिली २ दिवसांत जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा शहाणे यांचा आरोप आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत करा;भीम बिग्रेडचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन

मरावती जिल्ह्यात 2 लाख 60 हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा केला गेला. मात्र सोयाबीनवर मोठ्या प्रमाणावर पिवळा मोझॉक आल्याने सोयाबीन पिवळे पडू लागले आहे. या रोगामुळे ते सुकू लागले आहे. त्यामुळे आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

आमदार संजय शिरसाट यांनी सिडको अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला

आमदार संजय शिरसाट यांनी सिडको अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. बेलापूर मधील सिडको कार्यालयात संजय शिरसाट यांचं जंगी स्वागत. ढोल ताशाच्या गजरात, जेसीबीच्या साहाय्याने भव्य पुष्पहार घालून करण्यात त्यांचे स्वागत करण्यात आले. पदभार स्वीकारताना आमदार संजय शिरसाट यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सिडकोच्या इतिहासात प्रथमच एक महिन्यासाठी पदभार असणाऱ्या अध्यक्षाचे जंगी स्वागत होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Nandurbar : नंदुरबारमध्ये दोन गटात तणाव, तुफान दगडफेक

नंदुरबार शहरात दोन गटात तणाव निर्माण झाला असून दोन्ही बाजुने तुफान दगडफेक झालीय. शहरातील माळीवाडा परिसरात घटना घडलीय.

Pune News:  पुणे महापालिकेची बोपोडी येथील शाळा बनली दारुचा अड्डा

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन बोपोडी ही पुणे महापालिकेची शाळा आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी दारू पिणारे येऊन बसतात. वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका अधिकारी याकडे लक्ष देत नाहीये. आज आप पक्षाच्या वतीने शाळेत जाऊन स्वच्छता मोहीम राबवत या ठिकाणी असणाऱ्या दारूच्या बाटल्या एकत्रित करण्यात आल्या आहेत. शाळेला सुरक्षा रक्षक नसल्याने या ठिकाणी ही शाळा दारुड्याचा अड्डा झाला आहे.

आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत. पितृपक्ष पंधरवाडा संपल्यानंतर पक्ष प्रवेश मुहूर्त ठरल्याची निकटवर्तीयांकडून माहिती दिली. अनिल सावंत यांनी यापूर्वीच शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवाराची मागणी केलीय. अनिल सावंत तुतारी घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

आंदोलनाआधीच काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

काँग्रेस महिला कार्यकर्त्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घराबाहेर आंदोलन करायला आल्या होत्या.

पुण्यात काँग्रेसने राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलन

पुण्यात काँग्रेसने राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. अनिल बोंडे , तरविन्दर सिंग मारवा, भाजपच्या विरोधात आंदोलन केलं. भाजप नेत्यांचा फोटोला जोडे मारले.आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा काँग्रेसकडून करण्यात आलीय.

Dharashiv  : राहुल गांधी यांच्यावरील टीकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन

लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीची टिका करुन जिविताला धोका निर्माण करणारी विधाने करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

रिसोडमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून काँग्रेसचे सुनील केदार यांच्या निषेधार्थ आंदोलन

वाशिमच्या रिसोडमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या निषेधार्थ काँग्रसचे आमदार अमित झणक यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. सुनील केदार यांनी लाडकी बहीण योजना बंद करण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं, त्यामुळं राहुल गांधी आणि सुनील केदार यांच्या प्रतिमेला जोडे मारून घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याची मोठी उपस्थिती होती.

जरांगे यांची आमच्यावर बोलायची लायकी नाही - वाघमारे

जरांगे यांची आमच्यावर बोलायची लायकी नाही - वाघमारे

मुख्यमंत्र्यांनी मागच्या आंदोलन आम्हाला आश्वासन दिल होता...

चौकशी करून कुणबी नोंदी रद्द करू असे आश्वासन दिल होत....

जातीवादी मुख्यमंत्रीना उपोषणने उपोषण उत्तर देत आहोत...

आमच्या मागण्या मान्य होई पर्यंत उपोषण करणार ...

सगे सोयरे आणि गॅझेट लागू करणार नाही असं जो प्रयंत सांगत नाही तो पर्यंत उपोषण सुरू असणार

Salim Khan : धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

निर्माते सलीम खान धमकी प्रकरणातील दोन्ही आरोपींना वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे सलीम खान हे अभिनेता सलमान खान यांचे वडील. लॉरेन्स बिश्नोई को भेजु क्या असे म्हणत काल सकाळी ही दुकली वांद्रे परिसरातून फरार झाली होती.मात्र वांद्रे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चा आधार घेत सकाळी बाईक चालकाला अटक केली होती यानंतर आता धमकी देणाऱ्या महिलेला देखील अटक केली आहे.

Maharashtra News Live Updates:  कॉग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी फुंकले विधानसभा निवडणुकीचे रणशिंग

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 19 September :

तुळजापुर मतदार संघात संवाद मेळाव्याला केली सुरूवात - विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे दिले संकेत?

मधुकरराव चव्हाण हे तुळजापूरचे माजी आमदार- 2019 मध्ये भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला होता चव्हाण यांचा पराभव

मतदार संघातील येवती येथे संवाद मेळावा घेत साधला गावकऱ्यांशी संवाद -

पुर्वी देखील हेवे दावे,गटबाजी होती माञ ती टोकाची नव्हती,आता माञ घरात घुसुन मारु अस बोललं जातय - हे एका माझी मुख्यमंत्री व त्यांच्या मुलाची भाषा आहे

मधुकरराव चव्हाण यांनी संवाद मेळाव्यातुन नारायण राणे,नितेश राणे यांच्यावर ही केली नाव न घेता टिका

Crime News : बारामती : दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींना पुण्यातील हडपसर परिसरातील एका खोलीत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली

गणेश भक्तांवर पोलिसांचा लाठीचार्ज, नांदेड शहरातील वजीराबाद येथील प्रकार 

नांदेड जिल्ह्यात सर्वत्र शांततेत गणेश विसर्जन पार पडत असताना नांदेड शहरात मात्र या शांतलेला गालबोट लागले.विसर्जन मिरवणुक पुढे घेण्याचे आवाहन पोलिस करीत होते.यावेळी गणेश भक्तांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.बाचाबाची नंतर पोलिसांनी गणेश भक्तांवर सौम्य लाठीचार्ज केला.नांदेड शहरातील वजीराबाद परिसरात ही घटना घडली. या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.परंतु या घटने नंतर गणेश विसर्जन शांततेत पार पडले.परंतु या घटनेची कुणीही पोलिसात तक्रार केली नाही.

एक देश एक निवडणूक भारताच्या लोकशाहीला पोषक नाही. तुम्हाला ४ राज्याच्या निवडणुका एकावेळी घेता येत नाहीत तर २८ राज्यांच्या निवडणुका कशा एकत्र घेणार आहात?
उल्हास बापट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापुरातील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावणार -माऊली पवार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापुरातील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावणार

- सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांचा सरकारला ईशारा

- मनोज जरांगे पाटील हे प्राणपणाने सहाव्यांदा उपोषणाला बसले असताना त्याकडे दुर्लक्ष करून सरकार कार्यक्रम घेत असेल तर तो कार्यक्रम आम्ही उधळून लावू

- आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून जर निर्लज्ज मनाने सरकार लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेत असेल तर हे योग्य नाही

- 25 सप्टेंबर रोजी सोलापुरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेय

- या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत.

- मात्र त्यापूर्वी सकल मराठा समाजाने त्याला आता तीव्र विरोध दर्शवला आहे.

Crime News :  पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्या प्रकरणातील चार आरोपी मुद्देमालांसह अटक 

अमरावतीच्या वरुड मधील कुरळी येथील पेट्रोल पंप दरोडा प्रकरणातील आरोपींना अमरावती ग्रामीण पोलिसांनी अटक केलीय.. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यांसह त्याच्या साथीदारांनी पेट्रोल पंप लुटण्याचा कट रचल्याचे पोलीस तपासातून उघड झालेय.. 17 सप्टेंबरच्या मध्यरात्री अज्ञात आरोपीनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकून पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता.. या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी चार आरोपींसह मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली..

Marathi Breaking:  बीड, माजलगाव शहरासह अनेक खेड्यांचा पाणी प्रश्न सुटणार

बीडच्या माजलगाव येथील धरण पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही जोत्याखालीच होते. परंतु मागील आठवड्यात धरण परिसरात व वरील भागात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे हे धरण निम्मे भरत आले असून सध्या धरणाची पाणी पातळी 48 टक्के झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात असून बीड व माजलगाव शहरासह अनेक खेड्यांचा पाणी प्रश्न सुटला आहे.

वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती पाच राज्यांचा दौरा करणार

वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती पाच राज्यांचा दौरा करणार

महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकचा दौरा करणार

मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू मध्ये बैठका घेणार

हा दौरा 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत होईल

जेपीसी सदस्य पाच राज्यांतील अल्पसंख्याक विभागांच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत

वक्फ मालमत्तांची माहिती गोळा करून वक्फ विधेयकाबाबत चर्चा करणार

यांना फक्त अल्पसंख्याक समाजाचं हित पाहायचं आहे... यांना फक्त मुस्लिम आणि ख्रिचन समाजाचं हित बघायचं आहे. खरा गुन्हा राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झाला पाहिजे... राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे
अनिल बोंडे

Maharashtra News मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस,अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून, त्यातच ओबीसी आंदोलकांनी गणिमी काव्यानं अंतरवाली सराटी मध्ये उपोषण सुरु केलंय.. त्यामुळं दोनही उपोषणला भेट देण्यासाठी गर्दी होणार आहे.. त्यामुळं कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिसांनी अंतरवाली सराटीकडे जाणारा म्हणजे अंतरवाली फाट्यावर बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केला. दरम्यान आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे देखील वडीगोद्री येथे थोड्याच वेळात आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे.

Mumbai Fire : अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरात भीषण आग

अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरात भीषण आग

लोखंडवाला सेकंड क्रॉस लेन येथील दोन बंगल्यांना सकाळी साडेनऊच्या सुमारास लागली भीषण आग

बंगल्याच्या तळमजल्यावर आग लागल्याने बंगल्याचा मोठ्या नुकसान

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

आग नेमकी कशाने लागली हे अद्याप स्पष्ट नाही

अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सध्या कुलिंग चे काम सुरू आहे

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण

तळोजा कारागृहाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने लाच मागितल्याचा आरोपी हरपाल सिंह चा आरोप

आठ महिन्यांपूर्वी बोटाला फ्रॅक्चर झाल्याप्रकरणी रुग्णालयात पाठवण्याची विनंती केल्यानंतर १०,००० रुपयांची मागणी केल्याचा आरोप

न्यायाधीशांनी सीएमओला आरोपांसंदर्भात उत्तर देण्याचे निर्देश दिले

तसेच आरोपी हरपाल सिंहला आवश्यक वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश

Chhatrapati Sambhajinagar: दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षांच्या मृत्यू

अज्ञात दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खुलताबाद तालुका अध्यक्ष यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.राजू आसाराम हरदे असं त्यांचं नाव असून खुलताबाद च्या गल्ले बोरगाव येथे ही घटना घडली आहे.

Beed News:  कापसाच्या पिकात गांजाची शेती.. बीडच्या बेलखंडी पाटोदा गावातील प्रकार..पोलिसांची कारवाई

कापसाच्या पिकात गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार बीडचा बेलखंडी पाटोदा गावात उघडकीस आला आहे. पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपयांचा गांजा जप्त केला असून या प्रकरणात आरोपी विरोधात, बीडच्या नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. तब्बल 4 एकर कापसाच्या शेतात असलेली गांजाची झाड पोलिसांकडून जप्त करून यावर कारवाई करण्यात आली आहे.

Pune Ganeshotsav News: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत तिघांचा आकस्मित मृत्यू

पुण्यातील विसर्जन मिरवणुकी दरम्यान तिघांचा आकस्मित मृत्यू

मृत्यू नेमक्या कशामुळे हे शवविच्छेदन अहवालातून येणार समोर

ससून रुग्णालयाने दिली माहिती

नयन ढोके, विशाल बल्लाळ, व अन्य एक 45 वर्षीय व्यक्तीचा झाला मृत्यू

लक्ष्मी रोड, टिळक रोड व एकाचा कसबा गणपती मंडळाजवळ झाला मृत्यू

तिघांचेही मृतदेहांचे ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केले असून काही काळामध्ये येणार त्याचा अहवाल

छत्रपती संभाजी नगर : मंत्री गुलाबराव पाटील आणि बाळासाहेब थोरात यांना नोटीस.

Maharashtra Politics:  अभियंता महिलेच्या बदली प्रकरणात उच्च न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि जल प्राधिकरण व्यवस्थापनाचे अभियंता बिन्नर यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. अभियंता शैलजा थेटे यांच्या बदलीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत नियुक्त केलेल्या जागेवरून बदली करू नये असे आदेश न्यायालयाने दिलेले असतानाही जलप्रधिकरणाने 29 ऑगस्ट रोजी त्यांची बदली केली. त्यामुळे बदलीचा हा आदेश न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकेत केला असल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली.

Sangli News : जमिनीच्या वादातून भावानेच फवारले पिकावर तणनाशक

crime News : सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील तोंडली येथे शेत जमिनीच्या वादाच्या कारणावरून स्वतःच्या भावानेच स्वतःच्या भावाच्या शेतामध्ये तन नाशक फवारणी करून पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. भावाने भावा विरोधात कडेगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या घटनेची कडेगाव पोलिसांमध्ये नोंद झाले आहे.

तोंडोली येथे सुरेश आणि नवनाथ याच्या मध्ये शेत जमिनीच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. सुरेश यांनी आपल्या शेतात 40 गुंठे क्षेत्रात बटाटा पीक घेतले आहे. या पिकावर भाऊ नवनाथ यांनी तणनाशक फवारणी केली आहे. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Rain Update : समाधानकारक पाऊस झाल्याने वाई तालुक्यातील धोम धरण 100% भरले

वाई तालुक्यातील पश्चिम भागात समाधानकारक पाऊस पडला आहे त्यामुळे धोम धरण शंभर टक्के भरले आहे.

धोम धरण पुर्ण भरल्याने पुर्व भागातील दुष्काळग्रस्त गावांना आता दिलासा मिळाला आहे.या धरणातून पुर्व भागात कॅनालच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

Ajit Pawar : माझं चुकलतरी काय....अजित पवारांच्या नेत्याचं पत्र व्हायरल

Maharashtra Politics:  माझं चुकलतरी काय ? अशा आशयाचं नाना काटे यांचं एक भावनिक पत्र सध्या चिंचवड विधानसभा क्षेत्रात झपाट्याने व्हायरल होत आहे. मी नगरसेवक असताना पिंपरी चिंचवड शहरात, आदी गाव अशी ओळख असलेल्या पिंपळे सौदागर परिसराचा सर्वात जास्त विकास केला. पिंपरी चिंचवड शहरातील इतर कोणत्याही भागापेक्षा पिंपळे सौदागर भागाचा विकास हा अतिशय सूनियोजन पद्धतीने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने केला, तरी माझा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आणि 2017 च्या विधानसभा पोट नवडणुकीत पराभव का झाला असं नाना काटे हे मतदारांना लिहिलेल्या पत्रात विचारात आहे.

parbhani accident : एसटी व स्कुटीच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू....

जिंतूर ते परभणी रोडवर बोरी येथील डॉ. लक्ष्मीकांत जाधव हे आपल्या स्कुटी वरून शेताकडून गावाकडे येत होती तर जिंतूर ते अमळनेर एम.एच 20.बि. एल.2314जितुर आगाराची ही एसटी परभणीकडे जात होती. यावेळी बस व स्कुटीची समोरा समोर जोरदार धडक झाली. या धडकेने डॉ. लक्ष्मीकांत जाधव हे खाली पडून डोक्याला मार लागल्याने जखमी झाले. तेथील नागरीकांनी डॉक्टर जाधव यांना तात्काळ परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेवून आले परंतु, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने बोरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का, ओबीसी सेलचे अध्यक्ष शरद पवार गटात प्रवेश करणार

अजित पवार गटाला शरद पवार गटाचा धक्का

छगन भुजबळ यांचे समर्थक आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात येणार

उद्या शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ११ वाजता पक्ष कार्यालयात प्रवेश

ओबीसींना न्याय मिळत नसल्याची भावना घेऊन ओबीसी पदाधिकारी पवारांच्या गटात परतणार

Marathi Breaking : सांगलीच्या वाळवा तालुक्याच्या वारणा पट्ट्यात धुक्याची चादर..

सांगलीच्या वाळवा तालुक्यात वारणा पट्ट्यात सकाळी पहाटे चार वाजल्यापासून धुक्याची चादर पसरली आहे. शेतात कामानिमित्त जाणाऱ्या शेतकऱ्याला या धुक्यातून वाट काढत जावे लागत आहे. तर या धुक्याने भाजीपाला पिकांना फटका बसणार असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे . पहिलेच अति मुसळधार पावसामुळे भाजीपाला पिके गेली आहेत. आता उरली सुरली भाजीपाला पिके या धुक्यामुळे जाणार यामुळे भाजीपाला पिकावर मोठ्या प्रमाणात संक्रात येणार असल्याचे शेतकरी वर्गातून बोललं जात आहे.

Nanded : शिवसेना आणि भाजपामध्ये नांदेडमध्ये साडी-चोळी वाटपासाठी चढाओढ.

Maharashtra Politics : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदार संघात श्रयवादासाठी चढाओढ लागलीय. शिवसेना आणि भाजपाच्या वतीने हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील महिलांना साडी-चोळी वाटप करून त्यांचा सन्मान करण्यासाठी सन्मान सोहळे आयोजित करण्यात येत आहेत. या सन्मान सोहळ्यासाठी महिलांना आमंत्रित करण्यात येत आहे.महिलांसाठी ने-आन करण्याची व्यवस्था, जेवण आणि साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात येत आहे. परंतु या साडी-चोळी वाटपाच्या कार्यक्रमात गोंधळ उडत असून साडी चोळी घेण्यासाठी महिलांची झुंबड उडत आहे. अनेक महिलांना साडी-चोळी मिळत नसल्याने आयोजकांवर रोष देखील वक्त करीत आहेत. नांदेडच्या हदगाव-हिमायतनगर तालुक्यात साडी-चोळी वाटपाचे कार्यक्रम होत असल्याने सध्या याचीच चर्चा सुरू आहे.

Maharashtra Politics : घरावरुन नवी मुंबईतील राजकारण पेटलं, महायुतीमध्ये श्रेय वादावरून लढाई

Navi Mumbai : प्रकल्पग्रास्थांचा प्रश्न मी मार्गी लावला असे म्हणणाऱ्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर शिवसेना उपनेते विजय नाहटा यांची टीका.

मंदा म्हात्रे यांनी 10 वर्षात प्रकल्पग्रस्थानसाठी काहीही केलं नसून त्यांना यातील एबीसीडी देखील माहित नाही.

याच श्रेय घ्यायला गेल्यास त्या कश्या आळशी आहेत त्यांनी कशी कॉन्ट्रॅक्ट घेतली हे सांगावं लागेल.

तर मंदा म्हात्रे यांनी काही जण आता पत्र व्यवहार आणि बैठका घेऊन आम्ही प्रश्न मार्गी लावला असा दावा करत असल्याचा केला होता आरोप.

Crime News : छत्रपती संभाजीनगर : बेनामी पैसा क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतरित करून देणाऱ्या दोघांना पोलिसांनी सुरतमध्ये पकडले

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 19 September : शेकडो बँक खाते उघडून बेनामी व्यवहार करणाऱ्या रॅकेट मधील दोघांना पोलिसांनी सुरत मधून अटक केलय.त्यातील एक आरोपी वेब डेव्हलपर असून दुसऱ्याचे फॉरेक्स ट्रेडिंग सेंटर असल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान या गुन्ह्यात आधीच अटक करण्यात आलेला आरोपी हर्षल काछडीया हा बँक खात्यातून काढलेली रोख रक्कम या दोन्ही आरोपींना देत होता आणि हे दोन्ही आरोपी हे या रकमेचे यु.एस.डी.टी मध्ये रूपांतर करून विक्री करत असल्याची माहिती तपासामध्ये समोर आली. दरम्यान या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपी उत्सव कुमार भेसानीटाया, ऋषिकेश भागवत अनुराग घोडके आणि ज्ञानेश्वर पठाडे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे तर इतर तीन जणांना 21 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Amrawati : अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव

Marathi News : विदर्भात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते तर अमरावती जिल्ह्यत यावर्षी 2 लाख 60 हजार हेक्टर वर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. त्यामुळे अमरावती जिल्हातील सोयाबीन पीक व खरिपातील नगदी पीक समजल्या जाणाऱ्या सोयाबीन सततचा पाऊस व विविध रोगासह पिकावर शेवटच्या टप्प्यात पिवळ्या मोझॅक (हळद्या) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे सोयाबीन चे पीक सुखु लागले आहे,त्यामुळे 50 टक्के उत्पादनात आणखी घट होण्याच्या भीतीने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

Maharashtra Politics : सुभाष देशमुख यांना आणखी एक राजकीय धक्का

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 19 September:- सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात माजी सहकार मंत्री आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना आणखी एक राजकीय धक्का

- सोलापूर महापालिकेचे माजी उपमहापौर राजेश काळे यांनी दिला इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा

- या अगोदरच सुभाष देशमुख गटाच्या 6 माजी नगरसेवकांनी दिला होता सोमनाथ वैद्य यांना लेखी पाठिंबा

- आता माजी उपमहापौरांचा ही लेखी पाठिंबा मिळवण्यात सोमनाथ वैद्य यशस्वी झाल्याने,आमदार सुभाष देशमुख यांची चिंता वाढली.

- माजी उपमहापौर राजेश काळे हे आमदार सुभाष देशमुख गटाचे मानले जायचे कट्टर समर्थक,मात्र त्यांनी ही वैद्य ना पाठिंबा दिल्याने सुभाष देशमुख गटातील बंडळी आली सामोरं

- आगामी काळात आणखी माजी नगरसेवक तसेच ग्रामीण भागातील सरपंच आपल्या बाजूने उभे राहणार असल्याचा भाजपचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी केला दावा

Pune Crime : बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक 

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 19 September: मावळच्या तळेगांव दाभाडे येथे अग्नीशस्त्र बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अक्षय साबळे या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक रिव्हॉल्वर व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत, आरोपी अक्षय साबळे याच्याकडे शस्त्र असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 50 हजार रुपये किमतीची एक रिव्हॉल्वर, तसेच 1500 किमतीचे तीन जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख एक हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Maharashtra News :11 ठेकेदारांना पिंपरी चिंचवड महापालिकेने काळया यादीत टाकलं

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 19 September: पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या स्थापत्य विभागाची निकृष्ट कामे करणाऱ्या 11 ठेकेदारांना पिंपरी चिंचवड महापालिकेने एक वर्षासाठी काळया यादीत टाकलं आहे.

अजय घनश्याम खेमचंदानी, अनिकेत एंटरप्राईजेस, चैताली सप्लायर्स, कविता इंटरप्राईजेस, काव्य असोसिएश, मोटवानी अँड सन्स, नामदेव इंटरप्राईजेस, आर जी मंगळवेढेकर, रामचंद्र एंटरप्राइजेस, संनसारा कन्ट्रक्शन, आणि सोहम इंटरप्राईजेस या 11 ठेकेदार एक वर्षासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने काळया यादी टाकलं आहे.

Maharashtra News : अमरावती शहरात पोलीस आयुक्तालयाकडून जमावबंदी 

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 19 September: अमरावती जिल्ह्यात येत्या काळात सण उत्सव साजरे होणार आहेत. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.सदर आदेशाची अंमलबजाणी करण्यासाठी सर्व पोलिस ठाणेदार, अंमलदार त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम 36 मधील पोटकलमानुसार कार्यवाही करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असल्यास किंवा अडथळ्यांचा संभव असल्यास अडथळा होऊ देऊ नये, मिरवणूकांचे मार्ग विहित करणे, मोर्चे, निदर्शने, सभा, पदयात्रा, वाद्यांबाबत नियम आणि नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सक्षम अधिकाऱ्यांनी या अधिनियमाच्या कलम 33, 35, 37 ते 40, 44 व 45 अन्वये कार्यवाही करावी, असे पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.

Maharashtra Marathi Breaking : गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान घडली मोठी घटना

गणपती विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी जीर्ण इमारतीवर चढून विसर्जनातील डीजे व झाक्यांचा आनंद घेत असतानाच अचानक जीर्ण इमारतीचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीस ते चाळीस महिला किरकोळ जखमी झाल्याची घटना भंडाऱ्यात घडली.

Marathi Breaking Live : विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरांचा सुळसुळाट

विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरांचा सुळसुळाट

आत्ता पर्यंत २६७ भाविकांनी मोबाईल फोन गहाळ झाल्याच्या केल्या तक्रारी

तर २२ भक्तांचे सोन्याचे दागिने लंपास

आकडा वाढण्याची शक्यता

सगळ्यात जास्त चोऱ्या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत

गर्दीचा फायदा घेत चोरांनी मारला भक्तांच्या मोबाईलवर डल्ला

डी बी मार्ग पोलीस ठाण्यात ९९, व्ही पी रोड पोलीस ठाण्यात ८९ तर काळाचौकी पोलीस ठाण्यात ७९ मोबाईल चोरीच्या तक्रारी

आत्ता पर्यंत ८ जणांना पकडण्यात यश

विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करण्यासाठी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून मोबाईल चोरांच्या टोळ्या मुंबईत आल्याची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT