Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: कोल्हापुरात पोलीस तपासात वाहनात आढळले ५ कोटींचे मौल्यवान दागिने

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 2 November 2024: आज शनिवार दिनांक २ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, महाराष्ट्रातला पाऊस, मनोज जरांगे पाटील, महायुती-महाविकास आघाडीच्या बैठका, दिवाळी पाडवा, शरद पवार यांच्या घरचा दिवाळी पाडवा यासह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

Jalgaon News : धावत्या एक्स्प्रेसच्या धडकेत ३ ते ४ गायींचा जागीच मृत्यू

जळगावात धावत्या रेल्वे एक्सप्रेसने 7 ते 8 गायींना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये तीन ते चार गायींचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून उर्वरित गायी जखमी झाल्या आहेत रेल्वे एक्सप्रेस जळगाव शहरातून जात असताना बजरंग बोगद्याजवळ सात ते आठ गायींना धडक दिली. या घटनेमध्ये तीन ते चार गायींचा जागीच मृत्यू झाला असून उर्वरित गायी जखमी झाल्या आहेत.

Kolhapur News : कोल्हापुरात पोलीस तपासात वाहनात आढळले ५ कोटींचे मौल्यवान दागिने

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची तपासणी सुरू आहे. कोल्हापुरातील शिरोली नाका इथं स्थिर सर्वेक्षण पथकाला वाहनात 5 कोटी 58 लाखांचे मौल्यवान दागिने आढळले. कोल्हापुरातील शिरोली जकात नाक्यावरील तपासणीत कारवाई करण्यात आली. मे रेडियंट व्हॅल्युएबल लॉजिस्टिक लिमिटेड या कंपनीच्या पिकप वाहनात 4 कोटी 3 लाख 3 हजार 71 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सापडले.

Sangli News : विश्वजीत कदम व विशाल पाटील यांच्याकडून जयश्री पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न

सांगली विधानसभा निवडणुकीसाठी जयश्री पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन विश्वजीत कदम व विशाल पाटील यांनी भेट घेतली. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्याकडून जयश्री पाटील यांच्याकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विश्वजीत कदम,विशाल पाटील आणि जयश्री पाटील यांच्यात 3 तास बंद दाराआड चर्चा झाली. जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटलांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

Kolhapur News : काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी घेतली अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांची भेट

काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांची भेट घेतली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर केली होती. राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधूनच विरोध झाल्याने काँग्रेस पक्षाने मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने उमेदवार बदलल्याने राजेश लाटकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला.

Malad News : मालाडचे आमदार अस्लम शेख यांनी निवडणूक आयोगाला गंडवले; भाजपचा आरोप

मालाडचे आमदार अस्लम शेख यांनी निवडणूक आयोगाला गंडवले,असा भाजपने आरोप केला आहे. भाजपचे मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी अस्लम शेख यांच्यावर आरोप केला आहे. २००९ मध्ये अस्लम शेख यांनी १२वी उत्तीर्ण असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. २०२४ मध्ये आठवी उत्तीर्ण असल्याची शेख यांनी माहिती दिली. १५ वर्षांत अस्लम शेख यांचा शिक्षणाचा प्रवास उलटा कसा झाला? असा सवाल तेजिंदर सिंग तिवाना यांनी उपस्थित केला.

Ulhasnagar News : ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात; भाजप जिल्हाध्यक्षांचं वक्तव्य

ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात, उल्हासनगरात भाजप जिल्हाध्यक्षांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. भाषणानंतर मात्र मी तसं बोललोच नसल्याची सारवासारव केली.

Solapur News : सोलापुरात महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत, उद्धव ठाकरेंचा सभांच्या तारखा ठरल्या

- सोलापुरात महाविकास आघाडीतील मैत्रीपूर्ण लढत असलेल्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभा

- महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत असलेल्या सांगोला आणि दक्षिण सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे प्रचाराला येणार

- 10 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे सांगोला आणि दक्षिण सोलापूर दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून फोडणार प्रचाराचा नारळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून फोडणार प्रचाराचा नारळ

उद्या अंधेरी पूर्व येथे शिवसेनेची पहिली जाहीर सभा

अंधेरी पूर्व विधानसभेतील शेरे पंजाब मैदानात मुख्यमंत्री शिंदेची पहिली सभा

मुरली पटेल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री घेणार पहिली सभा

उद्या सायंकाळी ६ वाजता महायुतीचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या प्रचार प्रीत्यर्थ मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचे आयोजन

मनसे अध्यक्ष प्रचाराचा नारळ यंदा ठाण्यातून फोडणार!

मनसे अध्यक्ष प्रचाराचा नारळ यंदा ठाण्यातून फोडणार आहेत.चार नोव्हेंबर रोजी राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन घोडबंदर रोड वरील ब्रम्हांड या ठिकाणी संध्याकाळी करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील काँग्रेसला खिंडार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील काँग्रेसला खिंडार

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांचा भाजपमध्ये प्रवेश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत प्रवेश

अनिल कौशिक नवी मुंबई महानगरपलिकेचे उपमहापौरही होते

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सागर बंगल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश

गोरेगावच्या सिद्धार्थ नगर परिसरात 31 मजली टॉवरला आग

गोरेगावच्या सिद्धार्थ नगर परिसरात 31 मजली टॉवरला लागली आग

कल्पतरू रेसिडेन्सीच्या दुसऱ्या मजल्यावर लागली आग

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

राज्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही?

राज्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही

6 तारखेला कोल्हापूरमधून महायुती प्रचार नारळ फोडणार

कोल्हापूर अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचार शुभारंभ होणार

महायुती नेते एकत्रित बसून राहिलेले अर्ज माघार घेतली जाईल,उद्या सायंकाळी याबाबत बैठक होईल

सुनील तटकरे यांनी दिली माहिती

यवतमाळ जिल्हा प्रहार अध्यक्षांची हकालपट्टी

प्रहार जनशक्ती पक्षाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन मिर्झापुरे यांची पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांनी पदावरून हकालपट्टी केली आहे. मिर्झापुरे प्रहार मध्ये असले तरी त्यांची सक्रियता काँग्रेस नेत्यांसोबत दिसत होती, विधानसभा निवडणुकीत प्रहार ने बिपीन चौधरी यांना रिंगणात उतरविल्यानंतरही नितीन मिर्झापुरे काँग्रेस उमेदवारासोबत वावरत होते. याबाबत तक्रारी झाल्यानंतर मिर्झापुरे हे पक्षाच्या ध्येयधोरणांशी पायमल्ली करीत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला व त्यांना पक्षातूनच बरखास्त करण्यात आले आहे.

सुपा टोलनाक्यावर पथकाने २३ कोटींचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर पथकाने २३ कोटी ७१ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पकडल्या प्रकरणी हे दागिने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सापडल्याने पोलिसांनी हा तपास त्या दिशेने सुरू केला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली आहे. बीव्हीसी कंपनीचे चार कर्मचारी हा मुद्देमाल घेऊन जात असताना यांच्याकडून चांदीची चाळीस किलोची वीट आढळून आली. सोन्याची बिस्किटे, तर एकूण ५३ किलो चांदी, हिरे-मोत्यांचे दागिने ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी गोल्ड व्हॅल्युअर आणि कंपनीच्या प्रतिनिधींसमोर यासंबंधीचा १५ पानी पंचनामा केला असून कारवाईतील सोन्या-चांदीच्या विटांसह इतर सोने, हिऱ्याचे दागिने आयकर विभागाकडे जमा केले आहेत. आयकर विभागाच्या अहवालानुसार पुढील कारवाई करणार असल्याचे देखील खैरे यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रातील आजच्या स्थितीची चिंता वाटते. ⁠परिस्थिती हाताळण्यास आजच्या सरकारला अपयश आलं आहे - शरद पवार

मराठा समाजातील तरुणाने रक्ताने लिहिलेल पत्र व्हायरल...

मराठा समाजातील तरुणाने रक्ताने लिहिलेल पत्र व्हायरल...

मनोज जरांगे यांनी जी भूमिका घेतलीय त्यामुळे व्यथित होऊन लिहिले पत्र..

मनोज जरांगे यांची भूमिका महायुतीसाठी पोषक...

मनोज जरांगे यांनी ज्या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत त्यामुळे मराठा समाजातील मतामध्ये फूट पडणार...

त्याचा फायदा शिवसेना - भाजपाला होणार असल्याचा आरोप...

रक्ताने पत्र लिहिणारा तरुण कोण ?

इच्छुक मराठ्यामध्ये भाडणे लावू नका...

शिंदे, सामंत, चिवटे, या नादाला लागून समाजाची वाट लावू नका...नाही तर तुमचे नाव लिहून मी आत्महत्या करणार...

असे लिहिले पत्र...

मराठा समाजातील त्या तरुणाची मनोज जरांगे विनंती...

या पत्रामध्ये नाव नसून 'अंगठा' छापलेला आहे...

Pune News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात

फडणवीस नाराज कार्यकर्त्यांची करणार मनधरणी

भाजपचे जगदीश मुळीक, सनी निम्हण, श्रीनाथ भिमाले, धीरज घाटे यांच्या घरी जाऊन घेणार भेट

भेट घेत देवेंद्र फडणवीस करणार नाराजी दूर

यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता

Buldhana News: बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला

चिखली विधानसभा मतदार संघातील बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवारावर हल्ल

शंकर चव्हाण यांच्यावर ४० ते ५० अज्ञातांनी केला जीवघेणा हल्ला.

हल्ल्यात एड.शंकर चव्हाण गंभीर जखमी , चिखली येथील खाजगी रुग्णालयात अती दक्षता विभागात उपचार सुरू.

शंकर चव्हाण हे बहुजन समाज पार्टीचे चिखली विधानसभेचे उमेदवार.

Hina Gavit: शिंदे शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांची गद्दारी म्हणून माझी अपक्ष उमेदवारी - हिना गावित

नंदुरबारमध्ये महायुतीचा वाद चव्हाट्यावर

शिंदे शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांची गद्दारी म्हणून माझी अपक्ष उमेदवारी

माजी खासदार डॉ. हिना गावित यांचा शिंदे गटाला इशारा

नंदुरबार विधानसभेत भाजपाच्या उमेदवाराविरुद्ध शिंदे शिवसेनेचा प्रचार म्हणून अक्कलकुवा विधानसभेत शिंदे सेनेच्या उमेदवाराविरुद्ध डॉ. हिना गवितांची अपक्ष उमेदवारी

Mumbai News:  अनमोल बिश्र्नोईच्या प्रत्यार्पणासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या हालचाली

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्र्नोईच्या प्रत्यार्पणासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या हालचाली

अनमोल बिश्र्नोईच्या प्रत्यार्पणासाठी मुंबई गुन्हे शाखेने केला सत्र न्यायालयात अर्ज

अनमोल बिश्नोई सध्या कॅनडात लपून बसल्याची माहिती

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या तसेच अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारा प्रकरणी अनमोल बिश्र्नोई वॉन्टेड

Baramati News: मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी गोविंद बागेत घेतली शरद पवार यांची भेट

- मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी गोविंद बागेत घेतली शरद पवार यांची भेट

- ⁠रमेश कदम यांनी सुप्रिया सुळे यांचीही घेतली भेट

- ⁠सुप्रिया सुळे यांच्याकडून रमेश कदम यांना आश्वासन आपकी बेटी अब मेरी बेटी है. तुमची मुलगी खूप गुणी आहे. तिची इथून पुढची सर्व जबाबदारी माझी असेल

- ⁠रमेश कदम यांच्या मुलीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोहोळ मधून दिली होती उमेदवारी

- ⁠मात्र ऐनवेळी घोषित झालेली उमेदवारी रद्द करून दुसऱ्या उमेदवाराला मोहोळमधून उमेदवारी देण्यात आले त्यानंतर रमेश कदम होते नाराज

Kolhapur News: दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर होणार गुळाचे सौदे

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर होणार गुळाचे सौदे

थोड्याच वेळात कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे

गेल्या वर्षीच्या तुलनेत गुळाला अधिकचा दर मिळण्याची आशा

दिवाळीच्या मुहूर्तासाठी गुळ उत्पादक शेतकऱ्यांची बाजार समितीमध्ये गर्दी

Ajit Pawar: दत्ता भरणे काटेवाडी येथे अजित पवार यांच्या भेटीला

इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार दत्ता भरणे काटेवाडी येथे अजित पवार यांच्या भेटीला

पाडव्याला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे

इंदापूरला सगळं व्यवस्थित आहे २० तारखेला गुलाल आपलाच आहे

Sharad Pawar: अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली शरद पवार यांची भेट

अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली शरद पवार यांची भेट

⁠निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला

जिल्हाध्यक्ष दादा कळमकर देखील पवारांच्या भेटीला

⁠श्रीगोंदातील बंडखोर राहुल जगताप ही पवारांच्या भेटीला

Baramati News: भोसरीचे माजी आमदार विलास लांडे शरद पवार यांच्या भेटीला

भोसरीचे माजी आमदार विलास लांडे शरद पवार यांच्या भेटीला

शरद पवार आणि विलास लांडे यांच्यामध्ये गोविंद बागेत भेट

⁠विलास लांडे यांच्या कार्यकर्त्यांच्या हाती 'आपकी बार शरद पवार सरकार'चे बोर्ड

Mumbai News: शिवाजी पार्क येथे मनसेने दीपोत्सोवात लावलेले कंदील पालिकेने खाली उतरवले

शिवाजी पार्क येथे मनसेने दीपोत्सवात लावलेले कंदील अखेर पालिकेने खाली उतरवले

ज्यावर मनसेचे चिन्ह आणि पक्षाचा नाव असल्याने उबाठाने घेतला आक्षेप

निवडणूक आयोगाला या संदर्भात केली होती तक्रार

या तक्रारीनंतर आज शिवाजी पार्क मधील मनसे तर्फे लावण्यात आलेले कंदील काढण्यात आले आहेतयाच विषयी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी घेतलेला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : पाडवे दोन, भाऊबीज एक? बारामतीत पवार कुटुंबीयांचे पहिल्यांदाच दिसले २ पाडवे, पाहा व्हिडिओ

Nana Patole : एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सर्टिफिकेट देण्यापेक्षा....; नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना खणखणीत टोला

Sada Sarvankar : 'मी पक्षासाठी उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण...'; सदा सरवणकर यांनी मनसेपुढे ठेवली एक अट

Bank Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; ५९२ रिक्त पदांसाठी भरती; पात्रता काय? जाणून घ्या

Raju Patil : मनसे आमदार करणार महाविकास आघाडीला मदत; राजू पाटलांच्या वक्तव्याने खळबळ, VIDEO

SCROLL FOR NEXT