निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस सज्ज
बंदोबस्तात शहर पोलिस दलातील अधिकारी-कर्मचारी, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ), राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ), शीघ्र कृती दल (क्यूआरटी) आणि होमगार्ड यांचा समावेश
मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल बाळगण्यास मनाई तसेच केंद्राच्या शंभर मीटर परिसरात छायाचित्रणास सुद्धा बंदी
- नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात
- हा अपघात नसून हा घातपात असल्याचा अविनाश शिंदे यांचा आरोप
- प्रचाराला जात असताना मागच्या बाजूने येऊन एका अज्ञात वाहनाने शिंदे यांच्या गाडीला धडक दिल्याची त्यांची तक्रार
- अविनाश शिंदे यांच्या मणक्याला गंभीर दुखापत असल्याने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले दाखल
- नाशिकमधील खाजगी रुग्णालयात शिंदे यांच्यावर उपचार सुरू
- शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोलापूर विमानतळावर झाले दाखल
- उद्धव ठाकरे सोलापूर विमानतळावर कार्यकर्त्यांचा सत्कार स्वीकारून तुळजापूरकडे झाले रवाना
- उद्धव ठाकरे आज पत्नी रश्मी ठाकरेंसह तुळजाभवानीमातेचे दर्शन घेणार
मधल्या काळात मनोज रंगीची तब्येत ठीक नव्हती म्हणून आज वेळ मिळाला तर त्यांची भेट घेतली. माझा मनोज जरांगे यांच्यासोबत संबंध स्नेहपूर्ण आहेत. राजकारणाव्यतिरिक्त काही विषय असतात त्याविषयी चर्चा केली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर थोडीफार चर्चा होती, जास्त त्याविषयी खोलात जात नाही.संजय शिरसाट
अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावर चालत्या ट्रकने पेट घेतलाय.. चारकोल वाहून नेणाऱ्या ट्रकला सकाळी साडे 11 वाजताच्या सुमारास आग लागलीए. ट्रकमधून धूर निघत असल्याचे निदर्शनास येताच ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला.. बघता बघता ट्रकने पेट घेतलाये.. ट्रक आणि ट्रकमधील संपूर्ण चारकोल म्हणजेच कच्चा कोळसा जळून खाक झालाय. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये. मात्र वाहनासह ट्रक मधील वस्तूंच मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरील बाळापुर-अकोला रस्त्यावरील व्याळा जवळ ही घटना घडली.
जालना जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे .जालना जिल्ह्यत एकूण 1755 मतदान केंद्र असून जिल्हयात एकूण 16 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे..मतदान प्रक्रियेसाठी जवळपास 7917 कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेले आहेत. दरम्यान मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी जालना जिल्ह्यामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे 4000 कर्मचारी, अधिकारी आणि होमगार्ड यांचा तगडा बंदोबस्त जालना जिल्ह्यात तैनात करण्यात येणार आहे त्यामध्ये 2500 कर्मचारी अधिकारी,1400 होमगार्ड ,900 बाहेर जिल्ह्यातून मागवलेले कर्मचारी अधिकारी आणि जवळपास एस आर पी एफ ,बी एस एफ आणि रेल्वे विभागाच्या मिळून एकूण सात कंपन्या जिल्ह्यामध्ये तैनात असणार आहे.
Pune News Live Updates: पुण्यातील कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदीत अडीच हजार गुन्हेगारांवर कारवाई
शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून अडीच हजारांहून अधिक सराईत गुन्हेगारांची झाडाझडती
गेल्या दोन दिवसांत राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदीत गुन्हे शाखेकडून १५ तडीपार गुन्हेगारांवर कारवाई
सराइतांकडून २५ पिस्तूल आणि ३८ जिवंत काडतुसे जप्त
कोयते आणि धारदार हत्यारे बाळगणाऱ्या आरोपींकडून ८१ हत्यारे जप्त करण्यात आली
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात आक्षपार्ह पत्रक वाटपा संदर्भात धुळ्यात निवडणूक आयोगातर्फे करण्यात आला गुन्हा दाखल
विशिष्ट समाजाबाबत वादग्रस्त पोस्टर वाटप करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास येतात अज्ञात व्यक्ती संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात करण्यात आला गुन्हा दाखल
पोलीस प्रशासनास पत्रक वाटपा संदर्भात तपासाचे व सखोल चौकशीचे निवडणूक विभागातर्फे आदेश करण्यात आले जारी
पालघर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक
पालघर ,बोईसर, डहाणू, विक्रमगड, नालासोपारा आणि वसई असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ
सहा विधानसभा मतदार संघामध्ये 22 लाख 92 हजार इतके मतदार
एकूण 2278 मतदान केंद्र
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी 12500 अधिकारी कर्मचारी 4000 पोलिस कर्मचारी 2000 होमगार्ड तसेच आठ एस आर पी एफ तुकड्या तैनात.
उद्याच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज प्रत्येक विधानसभा निहाय ईव्हीएम मशीनचे वाटप.
महाविकास आघाडी विरुद्ध महायुती लढत.
उद्या होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग पूर्णतः तयार असून आज निवडणूक कार्यालयातुन मतपेट्या मतदान केंद्रावर रवाना झाल्यात. निवडणूक कर्मचारी मतपेट्या घेऊन आपआपल्या मतदान केंद्रावर निघाले असून पोलिसांकडून चोख बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आलाय. बेलापूर विधानसभेत 384 तर ऐरोली विधानसभेत 447 मतदान केंद्र असून उद्या या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोसह 'कसब्यात मराठा उमेदवार ओळखा' असा उल्लेख असलेले बॅनर झळकले आहे. कसब्यात काँग्रेस, भाजप, मनसेकडून लढणारे तिन्ही उमेदवार ओबीसी आहेत. माजी महापौर आणि अपक्ष लढणाऱ्या कमल व्यवहारे एकमेव मराठा उमेदवार आहे. पोस्टरवर एक मराठा लाख मराठाच्या घोषणेसह जरांगे पाटलांचा फोटो वापरला आहे.
दोन आठवड्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराची सुरुवात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाने, तर प्रचार संपल्यानंतर आज उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत. दोन आठवड्यापासून महाराष्ट्रभर फिरत 40 पेक्षा जास्त सभा उद्धव ठाकरे यांनी घेत आपला झंजावाती प्रचार दौरा पूर्ण केला आहे . काल प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आज उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत. दोन आठवड्यापूर्वी जेव्हा प्रचाराला उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली तेव्हा प्रचाराची पहिली सभा घेण्यापूर्वी कोल्हापुरात जाऊन उद्धव ठाकरे यांनी आई अंबाबाईचा दर्शन घेतलं होतं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेत आपला दौरा पूर्ण केला.
कसब्यात मराठा उमेदवार ओळखा, अशा आशायचे बॅनर पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात लागले आहेत. एक मराठा लाख मराठा असा या बॅनर वर उल्लेख, हे बॅनर नेमके कोणी लावले हे समजू शकलेले नाही
पुण्यातील स्वारगेट परिसरात आज वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी गणेश कला क्रीडा रंगमंच येथून मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतपेट्या आणि अन्य साहित्य पीएमपी बसने वितरित करण्यात येणार असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. आज आणि बुधवारी उद्या हे बदल केले जाणार आहेत. स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौकातून सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांनी डाव्या मार्गिकेने जावे. उजव्या मर्गिकेवर मतदान साहित्याची वाहतूक करणाऱ्या पीएमपी बससाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणेश कला क्रीडा येथून आधीक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे...
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.