- सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मी लक्ष घातलं असून सर्वांना नीट करणार, कोणालाही सोडणार नाही. असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाज बांधवांना दिलं आहे.
पुणे विमानतळावर नागपुर कडे जात असताना मराठा आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली
बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाई ची मागणी मराठा आंदोलकांनी फडणवीस यांच्याकडे यावेळी केली
फडणवीस यांचं कारवाई करण्याचं आश्वासन
तसेच या प्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मंत्रिपदाचा शपथविधीसाठी नरहरी झिरवाळ यांना फोन आला आहे.
NIA च्या पथकाकडून अमरावतीमधील त्या २३ वर्षीय संशयित युवकाची तीन दिवसांपासून सुरू असलेली चौकशी अखेर संपली..
NIA चं पथका त्या संशयित युवकाला आज रात्री उशिरा पर्यत सोडून देणार असल्याची सूत्रांची माहिती.
तीन दिवसांपासून संशयित युवकाची एन आयएच्या पथकाकडून सुरू होती कसून चौकशी...
देश विरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांची संशयित युवकाचा फोन कॉल करून संबंध आल्याच्या संशयावरुन NIA नं घेतलं होतं ताब्यात....
गुरुवारच्या मध्यरात्री अमरावतीच्या छाया नगरातून घेतलं होतं या तरुणाला ताब्यात..
बिबटयाच्या हल्ल्यात 13 बकऱ्या ठार
कराड तालुक्यातील घोगाव येथील घटना
पाटीलमळी नावाच्या शिवारात मेंढपाळाच्या बकऱ्याच्या कळपावर घाला
घोगाव परिसरातील शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण
बिबटयाचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज नागपूर येथे आगमन झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.
भारताला लोकशाहीची जननी म्हणून ओळखलं जातं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाल. संसदेत संविधानावरील विशेष चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही बाब सांगितली.
दादर येथील हनुमान मंदिर रेल्वे प्रकरणात आदित्य ठाकरे हनुमान मंदिरात दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे मंदिरात भगवान हनुमानाची महाआरती करणार आहेत.
संजय राऊत महाराआरतीसाठी हनुमान मंदिरात दाखल झाले आहेत. या मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी महाआरती केल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
दादरमधील हनुमान मंदिरामध्ये आदित्य ठाकरे महाआरती करणार आहेत. आदित्य ठाकरे थोड्याच वेळात दादरमधील हनुमान मंदिरात उपस्थित राहणार आहेत. यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते मंदिरासमोर जमायला सुरुवात झाली आहे.
दादर रेल्वे स्टेशन जवळील पुरातन हनुमान मंदिर ट्रस्टला रेल्वेकडून देण्यात आलेल्या नोटीस बाबत माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी रेल्वे मंत्र्यांना लेखी निवेदन दिले. काही वर्षापूर्वी देखील अशाच रीतीने आलेल्या नोटिशीला राहुल शेवाळे यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर कारवाई स्थगित झाली होती. या प्रकरणी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी माजी खासदार शेवाळे यांनी केली आहे.
पोलिस स्टेशनमध्ये बंदुकीची गोळी लागून महिला पोलिस कार्मचारी जखमी झाल्याची घटना पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्टेशनमध्ये घडली आहे. नुतन लाड असे जखमी महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सदर महिला पोलिस कर्मचारी बंदूक साफ करण्याचे काम करत असताना हा अपघात घडला.
अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या नोकर भरतीत मोठा गैरव्यवहार झाला आहे. बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत आणि सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध नोकर भरतीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तक्रारदाराने कोर्टात दाद मागितीली होती. कोर्टाने बँकेच्या अध्यक्षांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षक बँकेच्या कर्मचारी भरतीत मोठा गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाले आहेत.
जालन्यात बस आणि आयशरचा भीषण अपघात
2 प्रवासी ठार, 20 प्रवासी जखमी आणि बस वाहक देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती
अँकर: जालना सिंदखेडराजा रोडवर नाव्हा येथे बस आणि आयशरचा भीषण अपघात झालाय. या अपघातात जवळपास 20 प्रवासी जखमी झाले असून 2 प्रवासी जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर बसचा वाहक देखील गंभीर जखमी असल्याचे सांगितले जातय.
एसटी बस जालन्याकडून बुलढाण्याच्या दिशेने जात होती तर आयशर हे सिंदखेड राजा वरून जालनाच्या दिशेने येत होत.
जालन्यात तब्बल कंटेनरसह एक कोटींचा गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
कंटेनरसह 1 कोटी 2 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.
कारवाईमुळे गुटखा माफीयांचे धाबे दणाणले
कंटेनरसह 3 संशयित आरोपी ताब्यात
संविधानाच्या चर्चेवरून लोकसभेत गोंधळ.
खा. श्रीकांत शिंदे यांनी भाषणातून राहुल गांधींवर टीका
((सभागृहात गोंधळ))
श्रीकांत शिंदे यांना उत्तर देण्यासाठी राहुल गांधी उभे राहिले होते
राहुल गांधीजी तुमच्या आजीने इंदिरा गांधीजींनी सावरकरांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते
त्यापण संविधान विरोधी होत्या का, राहुलजी ? श्रीकांत शिंदे यांचा सवाल
राहुल गांधी उभे राहिले
(विरोधी पक्षाचे खासदार चेअरकडे गेले होते... सभागृहात गोंधळ)
जर एका खासदाराने कोणाचे नाव घेतलं तर उत्तर देण्याचा अधिकार ज्यांचे नाव घेतले गेले त्यांना आहे - किरेन रिजिजू
जालना शहर वाहतूक शाखेने मागील 11 महिन्यात 57 हजार वाहनधारकांवर कारवाई करत तब्बल 5 कोटी 25 लाखांचा दंड वसूल केलाय. विना हेल्मेट, ड्रंक अँड ड्राईव्ह, ट्रिपल सीट यांसह वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विरोधात जालना शहर वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरांमध्ये ठीक ठिकाणी नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करून दहा लाखाचा दंड वसूल केल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली आहे
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
विकएन्डसाठी कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या प्रवासात वाहतुक कोंडीचा अडथळा
मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये 4 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा
माणगाव बाजारपेठ ते खरवली फाट्यादरम्यान वाहतूक संथगतीने
रत्नागिरी - रत्नागिरीत डंपरने पाठीमागून दुचाकीस्वाराला चिरडलं
भीषण अपघातात उच्चशिक्षित तरुणाचा जागीच मृत्यू
रत्नागिरीतल्या हातखंबा इथं रात्री झाला अपघात
मुंबई गोवा महामार्गावर काम करणाऱ्या इगल इन्फ्रा कंपनीच्या पाण्याच्या डंपरने पाठीमागून दुचाकीस्वाराला दिली धडक
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडल्यानंतर राज्याचे लक्ष आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. पुणे जिल्ह्यातील किमान आठ आमदारांना मंत्रिपदाचे वेध...
यामध्ये माजी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील,दत्तात्रय भरणे,चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार महेश लांडगे,राहुल कुल, माधुरी मिसाळ,मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या नावांची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रिपदाची संधी मिळणार का? याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्ह्याचे सध्याचे चित्र पाहिल्यास 21 विधानसभा मतदारसंघांपैकी 9 ठिकाणी भाजप,तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 ठिकाणी आमदार निवडून आले आहेत. शिंदें शिवसेना 1,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष- 1, अपक्ष-1 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 1 आमदार निवडून आला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यामध्ये भाजपचा एक आमदार जास्त आहे.
रायगडच्या अलिबाग रेवदंडा चौल येथील स्वयंभू दत्ताचे मंदिरात दत्त जयंती निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दत्त जयंती निमित्ताने येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले असून हि यात्रा पुढील पाच दिवस सुरु रहाणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या स्वयंभू दत्त मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात
उद्या नागपूरमध्ये होणाऱ्या मंत्री मंडळ विस्तारात शपथ घेणारे संभाव्य मंत्री अधिकृत फोनच्या प्रतिक्षेत.
संभाव्य मंत्र्यांचे कुटुंबिय आणि प्रमुख पदाधिकारी नागपूरला जाण्यासाठी सज्ज.
अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथील ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रेला आज उत्साहाच्या वातावरणात सुरूवात झालीय.. भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनी विखे पाटील यांचे हस्ते म्हसोबा महाराजांचा अभिषेक तसेच महाआरती पार पडली.. यात्रेच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.. लोणी येथील म्हसोबा महाराजांची यात्रा आठ दिवस साजरी केली जाते त्यामुळे ग्रामिण अर्थकारणाला चालना मिळत असल्याने खेळण्याची दुकाने, रहाट पाळणे, खाद्यपदार्थाची विविध स्टॉल्स थाटण्यात आली आहेत...
शिवसेना आमदार दिपक केसरकर आणि तानाजी सावंत यांची पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी धडपड सुरू
काल पाच तास वर्षा बंगल्यावर थांबून ही एकनाथ शिंदे यांनी भेट दिली नसल्याने दोन्ही माजी मंत्र्यांना नाराज होऊन परतावे लागल, सूत्रांची माहिती
अखेर रात्री २ वाजता भेट झाल्याची माहिती
मात्र या दोन्ही नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार नाही अशी सूत्रांची माहीती
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्यास आश्चर्य वाटू नये असे सूचक विधान मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले आहे. निवडणुकीच्या काळात काका मला वाचवा अस बोलणारे आता दादा मला वाचवा बोलत आहेत. भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध झाला तरी प्रत्येक कार्यकर्ता हा आनंदी असणार आहे... मात्र अजितदादा यांच्या कठीण काळात ज्यांनी साथ दिली त्यांना विश्वासात घेणे महत्त्वाचे आहे. आमच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे दहा जागा मागितल्या आहे. मला मंत्रीपद मिळाले तर आनंदच आहे...
शिवसेनेचे आमदार संजय राठोड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी दाखल
- आमदार प्रकाश सोलंकी सागर बंगल्यावर दाखल
- आमदार राहुल आवाडे सागर बंगल्यावर दाखल
- माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सागर बंगल्यावर दाखल
खालापूर नगरपंचायतीने मालमत्ता करवाढीच्या नोटीसा बजावल्या असून वाढीव मालमत्ता कर वाढी विरोधात खालापुर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेच्या वेळी ग्रामस्थांनी नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. शहरात मुलभूत नागरी मुलभूत सोयी सुविधा नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही अशी परिस्थिती असताना केल्या जाणाऱ्या मालमत्ता करात वाढीला खालापूर ग्रामस्थांनी विरोध दर्शवत आहे.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात असलेल्या बोंदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गेल्या वर्षभरापासून दारू पिऊन दररोज शाळेत येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून पालकांना येत होती. अखेर बोंदरी येथील सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि संपूर्ण गावकऱ्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकाला मद्यपान केलेल्या अवस्थेत रंगेहाथ पकडले. त्यानंतर शाळेला कुलूप ठोकले. पंचायत समितीचे अधिकारी आणि केंद्रप्रमुखांना हे कळताच त्यांनी गावात धाव घेतली. सखोल चौकशी करून शाळेला दुसरे शिक्षक दिले जातील, असे सांगितले. मात्र दुसरा मुख्याध्यापक मिळणार नाही तोपर्यंत शाळेच कुलूप उघडणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता शिक्षणाधिकारी या प्रकरणाकडे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- 1991 नंतर पहिल्यांदाच नागपुरात होणार मंत्र्यांचा शपथविधी
- राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी दुपारी 3 वाजता नागपुरात होणार
- नागपूरच्या राजभवन मध्ये देण्यात येणार नव्या मंत्र्यांना शपथ
- 1991 मध्ये शिवसेना सोडून नागपूर अधिवेशनात छगन भुजबळ यांनी नऊ आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता
- त्यावेळी नागपूरच्या राज भवन मध्ये तत्कालीन राज्यपाल सी सुब्रमानियम यांनी छगन भुजबळ आणि इतर आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली होती
- नागपूर आणि विदर्भाचे राज्याच्या राजकारणात स्थान अधिक मजबूत करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारासाठी नागपूर निवडल्याची चर्चा
मागील 4 दिवसांपासून तापमानाचा पारा खाली घसरला, एक-दोन नव्हे चक्क सोमावरपासून 6 अंशाने तापमानात घसरण झाली. अकोला शहरात कमाल तापमानाची नोंद 10.6 अंश नोंदवण्यात आली. यामुळे अकोलेकरांना हुडहुडी भरवणाऱ्या थंडीचा सामना करावा लागतोय. सोबतच बोचऱ्या वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता अधिकच वाढली. त्यात उद्या रविवारपर्यत किमान तापमान 10 अंश सेल्सियसपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय.. त्यामुळं थंडीत मोठी वाढ़ झालीय.. रात्रीच्या कडाक्याच्या थंडीमूळ अकोलेकर हैराण झालेए. आता ठीक-ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत..मात्र, वाढलेल्या थंडीमुळे हरभरा पिक धोक्यात येण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेवर लोकल उशिराने धावत आहेत.
सकाळी 6 च्या सुमारास कल्याणच्या पुढे बत्ती गुल झाली होती. ओव्हर हेड वायर मध्ये विद्युत पुरवठा अचानक बंद झाल्याने अनेक लोकल आणि एक्सप्रेस रखडल्या.
कल्याण ते इगतपुरी आणि कल्याण ते लोणावळा अश्या दोन्ही घाटात विद्युत पुरवठा बंद झाल्याने मोठा गोंधळ
सकाळी 6 ते 7 दरम्यान टाटा कंपनीच्या ग्रीड मध्ये झाला होता बिघाड
यामुळे सर्वच लोकल आणि एक्सप्रेसचे वेळापत्रक बिघडले
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये अंमली पदार्थाची तस्करी करणारे व बेकायदेशीर राहणाऱ्या आफ्रिकन नागरिकांवर नवी मुंबई पोलिसांतर्फे कोंबिंग ऑपरेशनद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आलेय. यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकुण 150 पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते. या कारवाईत एकुण 25 ठिकाणी छापा टाकुन 2 किलो 45 ग्रॅम वजनाचे कोकेन, 663 ग्रॅम एम.डी. पावडर, ५८ ग्रॅम मिथिलीन, 23 ग्रॅम चरस, 31 ग्रॅम गांजा असे एकूण 11 कोटी 86 लाख रूपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेत. या कारवाईमध्ये 13 अफ्रिकन नागरिक व बनावट पासपोर्ट अथवा विसा बाळगणारे 3 अफ्रिकन नागरिक अश्या एकुण १६ अफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आलेय. यासोबतच पासपोर्ट व विसा संपलेल्या ७३ अफ्रिकन नागरिकांना देश सोडुन जाण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आलेय.
वन नेशन वन इलेक्शन विधेयक सोमवारी लोकसभेत मांडले जाणार
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल मांडणार विधेयक
२ दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाने विधेयकाला दिली होती मंजुरी
नाशिक आणि निफाडमध्ये थंडीचा पारा पुन्हा घसरला
- निफाडमध्ये कालच्या तुलनेत तापमानात ३.८ अंश सेल्सिअस घट
- आज निफाडमध्ये ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
- तर नाशिकचा पारा ९.२ अंशांवर, कालच्या तुलनेत २.७ अंश सेल्सिअसने तापमान घसरलं
- उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग कमी झालेला असला तरी थंडीची लाट कायम
धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरल्याचे बघावयास मिळाले असून, आज धुळ्यात 4.4 अंश डिग्री सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे, एरवी राज्यामध्ये थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर कडे बघितल जात परंतु गेल्या आठवड्याभरापासून धुळ्यात आठ पूर्णांकापेक्षा देखील कमी तापमानाची नोंद केली जात आहे,
या हाड गोठवणाऱ्या थंडीमुळे सकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या संख्येमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे, मॉर्निंग वॉक साठी गजबजलेले रस्ते आता निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत आहे, थंडीचा कहर धुळ्यात सध्या बघावयास मिळत आहे, या थंडीचा परिणाम नागरिकांच्या जनजीवनावर देखील होताना दिसून येत आहे,
धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा घसरला
4.4 अंश डिग्री सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची धुळ्यात झाली नोंद
महाबळेश्वर पेक्षा देखील धुळ्यात वाढली थंडी
गेल्या आठवडाभरापासून धुळ्यात आठ पूर्णांक पेक्षा देखील कमी तापमानाची नोंद
हाड गोठवणाऱ्या थंडीमुळे धुळेकर गारठले
पालघरच्या बोईसर जवळील पास्थळ येथील पेट्रोल पंपावर तुफान हाणामारी . सीएनजी भरल्यानंतर बराच काळ गाडी चालू होत नसल्याने झालेल्या वादाचं हाणामारीत रूपांतर . हाणामारीचा व्हिडिओ समोर . पास्थळच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावरील घटना . पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून गाडीतील तिघांना बेदम मारहाण . याच पेट्रोल पंपावर अनेक वेळा वाहन चालकांना मुजोर कर्मचाऱ्यांकडून यापूर्वी देखील मारहाण करण्यात आल्याच्या तक्रारी.
पंढरपूर - मुंबई रेल्वे दररोज सुरू करावी, मोडनिंब येथे काॅर्गो टर्मिनल उभा करावे, किसान रेल्वे सुरू करावी यासह इतर प्रमुख मागण्या आमदार अभिजित पाटील यांनी केल्या आहेत. मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना यांची भेट घेऊन आमदार पाटील यांनी रेल्वे प्रश्नांसंदर्भात चर्चा केली.
कुर्डुवाडी रेल्वे स्थानकाच्या वार्षिक तपासणीसाठी मीना आले होते. यावेळी आमदार पाटील यांची आमदार पाटील यांनी भेट घेऊन स्वागत केले.
जालन्यात तब्बल एक कोटींचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.जालन्याच्या कडवंची शिवारात समृद्धी महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही मोठी कारवाई केलीया याप्रकरणी कंटेनरसह 3 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. दरम्यान यापुढेही अवैध धदांविरुद्ध कारवाई सुरूच राहील असं स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांनी सांगितलं.
एनआयए कडून तीसऱ्या दिवशी त्या संशयीतांचे होणार क्रॉस व्हेरिफिकेशन,
अमरावतीत तीन दिवसापासून NIA टीम तळ ठोकून,
आज पुन्हा त्या संशयित तरुणाची चौकशी
NIA सकाळी दहा वाजता पासून पुन्हा आज चौकशी सुरू करनार
काल सायकल रिक्षा मधून त्या तरुणाला त्याचे वडील व मामाने पोलीस ठाण्यात आणले होते
गुरुवारी पहाटे अमरावतीच्या छाया नगर मधून एका 23 वर्षीय तरुणाला NIA च्या टीमने ताब्यात घेतल्यानंतर त्याची मॅरेथॉन कसून चौकशी
देश-विदेशातील काही प्रतिबंधित दशोपदी संघटना पाकिस्तानशी संबंध असल्याचा तरुणावर संशय
राष्ट्रीय तपास यंत्रणा कडून ताब्यात घेतलेल्या संशयित तरुणाची उलट तपासणी
धरणगाव-चोपडा रोडवर पिंपळे फाट्याजवळ आज सकाळी एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमी बस ड्रायव्हर गंभीर जखमी असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे बस अनियंत्रित होऊन इलेक्ट्रिक पोलला धडकल्यानंतर 28 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास धरणगाव चोपडा रोडवरील पिंपळे फाट्याजवळ उभे असलेल्या एका ट्रॅक्टरला बसने मागून धडक दिल्याने एसटी बस ड्रायव्हरची केबिन पूर्णपणे चक्काचूर झाली होती. या अपघातात एक जण ठार तर काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात होत असलेल्या दुचाकी चोरीचा छडा लावण्यात जळगाव शहर आणि जिल्हापेठ पोलिसांना मोठे यश आले आहे. जळगाव शहर पोलिसांनी चोरीच्या १९ तर जिल्हापेठ पोलिसांनी २० अशा एकूण ३९ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. तर सहा संशयित आरोपींकडून तब्बल ३९ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्याचेही अपर पोलीस अधीक्षक नखाते यांनी सांगितले.
परभणी शहरासह जिल्हा भरात थंडीचा जोर वाढत असून गेल्या दोन दिवसापासून थंडी कमी जास्त होत आहे आज ह्या मौशमातील कमी तापमानाची नोंद झाली आहे. आज 7.8सेल्शियस तापमान आहे . ह्या थंडीने रब्बीतील ज्वारी/हरबरा पिकांना होणार आहे.सकाळी तापमानात घट व दुपारी तापमानात वाढ होत असल्याने लहान बालक व वृध्दामध्ये खोखला सर्दीचे आजार वाढत आहेत, पुढील काही दिवस थंडीचा जोर असाच राहणार असल्याचा अंदाज कृषि विद्यापीठाच्या हवामान खात्याने वर्तवला आहे.
परभणी संविधान उद्देशिका विटबांना प्रकरणाचे लोण जिल्ह्यापर्यंत पसरले असून मलकापूर येथे आंबेडकर अनुयायानी उपविभागीय कार्याल्यावर मोर्चा काढला.. यावेळी पोलीस प्रशासना विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच घटनेचा निषेध नोंदवून आरोपीची नारको टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली तसेच पोलिसांनी तात्काल कोंबिंग ऑपरेशन थांबविण्याची मागणी केली .. जर सरकारने हे कृत्य थांबविले नाही तर राज्यात उद्रेक होईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय
बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचे अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेचा धाराशिव जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला दरम्यान दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असुन सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन प्रकरणातील मुख्य सुञधार व दोषींवर कठोर कायदेशीर कार्यवाही करावी व देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशा भावना मराठा बांधवांनी व्यक्त केल्या.
यंदाच्या चांगल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील रब्बी हंगामाने नवा उच्चांक गाठला आहे. कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ६ हजार ४३८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे, जी सरासरीच्या ११८.५५ टक्के अधिक आहे. यंदा हे क्षेत्र सव्वा लाख हेक्टर पार करण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
वाशिमच्या रिसोड शहरातील शिव मूळव्याध दवाखान्यात अवैधरित्या गर्भपात केल्या प्रकरणी अटक केलेल्या डॉक्टर अमोल भोपाळे याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्याला 16 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकारणी आरोपीच्या डॉक्टर पत्नी विरोधातही आरोग्य विभागाकडून तक्रार देण्यात आली असून तिच्या सहभागा विषयीही पोलीस तपास करत आहेत.
ऋतू बदलामुळे भंडारा जिल्ह्यात तापमानात घट झाल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे. जिल्ह्यातील किमान तापमान १० अंश सेल्सिअसवर पोहोचले. जिल्ह्याचे कमाल तापमान सध्या २७ अंश सेल्सिअसच्या सामान्य मर्यादेत असले तरी थंड वारेही वाहत आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होऊन थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.चालू वर्ष २०२४ मध्ये तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची ही दुसरी वेळ आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी २५ जानेवारीला वर्षाच्या सुरुवातीला जिल्ह्याचे किमान तापमान १० अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. शुक्रवारी दुसऱ्यांदा किमान तापमान पुन्हा १० अंशांवर पोहोचल्याने थंडी वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.