मुंबईतील अमित शहा यांच्या भाषणातील मुद्दे
महाराष्ट्राचा निकाल स्पष्ट आहे. 23 तारखेला महाराष्ट्रात महायुती सरकार बनणार आहे. आघाडीचा सुपडासाफ होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ महाराष्ट्र नाही, तर देशाला समृद्ध केलं.
आम्ही संकलपत्र जाहीर केल्यावर आघाडीने देखील त्यांचं संकल्पपत्र जाहीर केलं.
भाजप आणि जनसंघाने दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत.
पुण्यातील शिंदेवाडी जवळ आग
पुण्यातील वेळू फाटा जवळ असलेल्या एका कंपनीला आग
पावडर कोटिंग कंपनीला भीषण आग
अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल
आज विझविण्याचे काम सुरू
अमित शहांची उद्धव ठाकरेंवर टीका
सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत.
मी राहुल गांधीना सांगतो, की तुमची चौथी पिढी जरी आली तरी ३७० हटणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहण्यासाठी अलका टॉकीज चौकात मोठी गर्दी
मोदींचा ताफा काही क्षणात अलका टॉकीज चौकातून पुढे एस पी कॉलेजच्या मैदानाच्या दिशेने जाणार
मुख्य रस्त्यापासून ५० मीटर लांब पोलिसांकडून बॅरिकेड्स
यवतमाळच्या आर्णीत भाजपचे उमेदवार राजु तोडसाम यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. त्या आधी फडणवीस यांची हेलिपॅडवर भरारी पथकांनी त्यांच्या बॅगाची तपासणी केल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. यात घाटंजीचे तहसीलदार आणि आर्णी पोलीस स्टेशन चे दुय्यम पोलीस निरीक्षकांच्या पथकांनी बॅगाची तपासणी केली.
मोदींच्या सभेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
सभास्थळी पाण्याच्या कागद, बाटल्या, पेन नेण्यास बंदी
मुख्य प्रवेश द्वारातून आत गेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी
काळया रंगाच्या गोष्टी नेण्यास बंदी
काळे सॉक्स, पाकीट, पर्स नेण्यास बंदी
लातूरच्या किल्लारी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बॅग निवडणूक अधिकारी कर्मचारी तपासले आहेत. औसा विधानसभेचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारात नितीन गडकरी यांची जाहीर सभा ठेवण्यात आली होती. यावेळी किल्लारी येथे हेलीपॅडवर या बॅगा तपासल्या आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय राजन शिरोडकर यांचे दीर्घ आजाराने निधन झालं.
राजन शिरोडकर यांनी मनसेच्या स्थापनेपासून मनसेसाठी महत्त्वाची भूमिका निभावली होती.
मात्र काही कारणास्तव त्यांनी तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता.
राजन शिरोडकर यांचे चिरंजीव आदित्य शिरोडकर हे शिवसेना ठाकरे गटात पुणे सह संपर्कप्रमुख आहेत
सोलापुरात सभास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं आहे.
- सोलापुराईल होम मैदानमध्ये पार पडत आहे जाहीर सभा
- सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या 11 उमेदवारांनी कमळ पुष्प देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले स्वागत
- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरातील महा विजय सभेमधून नेमकं काय बोलतात, याकडे लागलं संपूर्ण देशाचे लक्ष
उद्धव ठाकरे लोहारा येथे दाखल झाला.
महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
उद्धव ठाकरे यांची शिंदेंचे विद्यमान आमदार आणि शिंदे गटाचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या मतदारसंघात होतेय सभा
उद्धव ठाकरे सभेतून काय बोलणार याकडे लागले लक्ष..?
मुंबईच्या डबेवाल्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे.
उल्हास मुखे आणि रामदास करवंदेंच्या संघटनेने महायुतीला पाठिंबा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांना हवाई उड्डाणं करण्यास परवानगी मिळालेली नाही.
औसा सभा संपल्यावर उद्धव ठाकरे उमरग्याच्या सभेसाठी हेलिकॉप्टरने जाणार होते.
मात्र पंतप्रधान मोदी सोलापूरला येणार असल्यामुळे हवाई उड्डाण करण्यास परवानगी नाकारली
पुणे जिल्ह्यात 2000 एनआर आय करणार मतदान
सर्वाधिक अनिवासी भारतीय (एन आर आय) मतदारांची नावे चिंचवड मतदारसंघात तर कोथरूड दुसऱ्या क्रमांकावर
पुणे जिल्ह्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात 355 अनिवासी भारतीय मतदार
पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात 272 अनिवासी भारतीय मतदार आहेत
परदेशात राहूनही बहुसंख्य मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी देशात येतात
जिल्हा निवडणूक शाखेकडून तयार करण्यात आलेल्या यादीतून माहिती समोर
शरद पवार उद्यापासून पुणे जिल्ह्याचा दौऱ्यावर असणार आहेत.
उद्या शरद पवारांची जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि भोसरीमध्ये सभा
गुरुवारी शरद पवारांचा पुणे शहरात सभांचा धडाका असणार आहे.
गुरुवारी एकाच दिवशी शरद पवारांच्या पुणे शहरात ३ सभा
१४ नोव्हेंबर रोजी शरद पवार संध्याकाळी आधी खडकवासला नंतर हडपसर मध्ये सभा घेणार
१४ नोव्हेंबर रोजी शरद पवारांची काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ सभा
वानवडी मध्ये शरद पवार यांची सभा
१७ तारखेपर्यंत शरद पवार पुणे शहरात थांबणार
सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. औसामध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्या.
नातवासाठी आजी प्रचाराच्या मैदानात उतरल्या असून युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी आज पश्चिम भागाचा दौरा केला. अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. लोकसभेच्या निवडणुकीत देखील प्रतिभा यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. बारामती विधानसभा मतदारसंघातील काका पुतण्याची लढाई ही अत्यंत चुरशीची होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये सभा
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पुण्यात संध्याकाळी सभा
मोदींच्या सभेला पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे तब्बल ३४ उमेदवार उपस्थित असणार
खडकवासल्यात आचारसंहिता भंग प्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल
खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार सचिन दोडके यांच्या ३ कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
रोहन धावडे, संजय दोडके आणि अजय पोळ या तिघा कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 3 किलो सोन जप्त
जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत २.२७ कोटी रुपये
दुबईवरून आलेल्या प्रवाशाला करण्यात आली अटक
प्रत्येकी एक किलो वजनाच्या २४ कॅरेटच्या तीन सोन्याच्या विटा जप्त
ट्राउझरच्या खिशात सोन्याच्या विटा आणण्याचा प्रवाशाचा होता प्रयत्न
कस्टम्स विभागाची कारवाई
राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड
तांत्रिक अडचणीमुळे विमान संभाजीनगर विमानतळावर उतरले नाही
बुलडाण्याच्या चिखली येथे होणार आहे राहुल गांधी यांची सभा
धनंजय महाडिक यांच्याविरुद्ध कारवाई करावी यासाठी पुणे पोलिसांना निवेदन
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसतर्फे पोलिसांना निवेदन
महिलांना हजारो लोकांसमोर धमकी देणे हा गुन्हा आहे तसेच आचारसंहितेचा पण गुन्हा आहे.
महाडिक याच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी महिला काँग्रेसची मागणी
याबाबत निवडणूक आयोगाकडे ही तक्रार करणार
खासदार धनंजय महाडिक याच्यावर कायदेशीर कारवाई करा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १४ नोव्हेंबरला ३ जाहीर सभा
छत्रपती संभाजी नगर, नवी मुंबई आणि मुंबईत मोदींची सभा
छत्रपती संभाजी नगरमध्ये मोदींची पहिली तोफ धडाडणार
खारघर येथे दुपारी मोदी मविआचा समाचार घेणार
शिवाजी पार्क मैदानावर मोदींची तिसरी सभा
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भोरमध्ये पोलिसांनी काढला रूटमार्च
विविध राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या दिवसात कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी
भोर शहरातील प्रमुख बाजारपेठ मार्गांवरून काढण्यात आला रूटमार्च
गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांचा वचक असावा तसेच परिसरात निवडणूकीच्या काळात काही अनुचित घटना घडू नये या करिता रूटमार्चचे आयोजन
मतदार राजांनी कोणत्याही धमक्या तसेच कोणत्याही अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी,पोलिसांकडून नागरिकांना आवाहन..
राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपची केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केली तक्रार
राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ६ नोव्हेंबर रोजीच्या प्रचारात संविधनाबाबत खोटं विधान केल्याचा दावा
माहीमचे आमदार सदा सरवणकर यांच्या रॅलीमध्ये भाजपचे कार्यकर्ते
महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांना भाजपचा पाठिंबा?
एकीकडे अमित ठाकरे यांना भाजपने पाठिंबा दिला असल्याचं नेत्यांचं म्हणणं... दुसरीकडे कार्यकर्ते मात्र सदा सरवणकर यांच्या रॅलीत...
भाजपचा नक्की पाठिंबा कोणाला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात आज जाहीर सभा
सोलापूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी घेतायत सभा
सोलापुरातील होम मैदानात मोदींची पार पडणार सभा
मोदीजींची सोलापुरातली आत्तापर्यंतची ही सातवी सभा आहे.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरेंच्या मुखपत्र सामनातून राम मंदिराच्या मुद्द्याला पुन्हा हात
भाजप सहयोगी मोदी यांच्यावर प्रखर टीका
दिल्लीच्या राजाने देव बदलण्याचा फटका अयोध्याच्या राजाला
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदी शहा एकदाही अयोध्येला गेले नाहीत
राम मंदिराच्या निर्मनातील मोदी शहांचा राजकीय इंटरेस्ट संपला
मोदी त्यांनी देव बदलला यामुळे भाजप ने देव फिरावला
भाजपला राम नकोसे त्यामुळे श्रीराम यांचा नव्याने वनवास
कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील भाजप नेते करणार काँग्रेसची पोलखोल
उद्या भाजपकडून अनुराग ठाकूर, जी किशन रेड्डी आणि शोभा करलांजे यांची पत्रकार परिषद
कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील फसव्या घोषणांचा पर्दाफाश होणार
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले खोटे दावे भाजप नेते खोडून काढणारे
निवडणुकीत कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचलमध्ये दिलेले अनेक आश्वासनं फोल
नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची सभा..
एकमेकांचे कट्टर विरोधी उद्या एकमेकांसमोर...
उद्या उद्धव ठाकरे यांच्या तीन सभा कोकणात...
कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी मध्ये होणार उद्धव ठाकरे यांची सभा..
कणकवली आणि कुडाळ येथे नितेश राणे आणि निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात...
राणेंबद्दल उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष?
उध्दव ठाकरे यांच्या कोकणातील सभेतून कोणाला करतील लक्ष्य आणि कोणावर लक्ष...?
मुंबईत माहीममध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना वॉर...
आज आदित्य ठाकरे यांची माहीम विधानसभा मतदारसंघात सभा...
ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांच्यासाठी आदित्य ठाकरे माहीमच्या मैदानात....
माहीम मतदारसंघातच आदित्य ठाकरे यांचा चुलत भाऊ आणि मनसेचे उमेदवार अमित ठाकरे देखील रिंगणात....
तसेच शिवसेनेतून फुटलेल्या गटाचे उमेदवार सदा सर्वांकर देखील निवडणुकीच्या रिंगणात...
अमित ठाकरे बद्दल आदित्य ठाकरे काय बोलतील? याकडे लक्ष
आदित्य ठाकरे अमित ठाकरे यांना टार्गेट करतील की सदा सरवणकर यांना?
उपमुख्यमंत्री अजित पवार रात्रीपासून अमरावतीत मुक्कामी
अजित पवार यांचे खासगी सचिव संजय खोडके यांच्या फॉर्म हाऊसला थांबले अजित पवार
काल अमरावतीच्या वरुड मध्ये आले होते अजित पवार
अमरावतीत नाईट लँडिंगची व्यवस्था नसल्याने रद्द झाला होता नांदेड दौरा
अमरावतीत अजित पवार यांच्या रात्री महत्त्वाच्या बैठकी झाल्याची माहिती
राजकिय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.