Maharashtra News Live Update saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट आज दुपारी १२ ते २ पर्यंत बंद

Marathi Breaking Live Headlines Updates : संसदेचे पावसाळी अधिवेशन, महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

अमरावती विमानतळावर 'नाईट लँडिंग' पुन्हा रखडले!

रूट निश्चितीतील तांत्रिक अडचणीमुळे अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून नाईट लँडिंग आणि टेकऑफला विलंब.

डीव्हीओआर (DVOR) यंत्रणा यशस्वीपणे इन्स्टॉल,तरीही रात्रीच्या उड्डाणासाठी अंतिम मार्ग निश्चित नाही.

एअर इंडियाने डीजीसीएला तांत्रिक अडचणींची माहिती दिली, पर्यायी मार्ग सुचवण्याची प्रक्रिया सुरू.

७२ आसनी विमानाच्या नियोजनाचा पेच,अतिरिक्त विमान ठेवावे की दुसऱ्या विमानतळावरून सेवा वळवावी यावर विचार.

पुणे शहराच्या निम्म्या भागाचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद

पुणे शहरातील कुठल्या भागात येणार नाही पाणी?

काळेपडळ, हडपसर गावठाण, रामनगर झोपडपट्टी, वैदुवाडी, भीम नगर, मुंढवा, वानवडी गावठाण, कोंढवा गावठाण, मिठा नगर, बी टी कवडे रोड, लक्ष्मी नगर, कॅम्प परिसर, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट, कोरेगाव पार्क ब्रिज परिसर, येरवडा गावठाण गुंजन साळवे भाजी मार्केट गांधीनगर, काश्मीर कॉलनी, नवी खडकी, भोसले वस्ती, डेक्कन लाईन, कल्याणी नगर, खराडी गावठाण, चंदननगर, सुतार नगर, आनंद पार्क

विदर्भातील २६ मोठ्या धरणांमध्ये सरासरी ४९.७६ टक्के जलसाठा

- विदर्भात यंदा पावसाने दडी दिल्यामुळे जुलै महिना संपत आला तरी धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा झालेला नाही. २७ जुलैपर्यंत विदर्भातील २६ मोठ्या धरणांमध्ये सरासरी ४९.७६ टक्के जलसाठा असून, गतवर्षी याच दिवशी तो ५५ टक्के होता. त्यामुळे यंदा सुमारे ५ टक्क्यांची तूट नोंदवली गेली आहे.

- नागपूर विभागातील १६ मोठ्या धरणांमध्ये ४७.८५ टक्के पाणीसाठा आहे, तर ४३ मध्यम प्रकल्पांमध्ये ४३.२८ टक्के साठा असून तो गतवर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांनी कमी आहे. लघु प्रकल्पांमध्येही १४.२९ टक्क्यांची तूट आहे.

- अमरावती विभागातही परिस्थिती समाधानकारक नाही. ३७.६४ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असून काही प्रकल्पांमध्ये स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

जुलैच्या अवघ्या सहा दिवसात 144 तालुक्यात 100 टक्के पावसाची नोंद

राज्यातील एकूण 355 पैकी 144 तालुक्याने जुलै ची पावसाची शंभर टक्के सरासरी गाठलीय

राज्यातील 77 तालुक्यात 75 टक्के पेक्षा जास्त पावसाची नोंद झालीय

95 तालुक्यात 50 टक्के तर 39 तालुक्यात 25 ते 50 टक्के इतका पाऊस झाला आहे

जुलैमध्ये एकही तालुका रेड झोन मध्ये नाही मुंबई आणि कोकण मध्ये महाराष्ट्राने सरासरी गाठली आहे

मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाने सरासरीखूप कमी असल्याची हवामान विभागाची माहिती

महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्याला आग, प्रवाशांमध्ये घबराट

कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एका डब्याला आग.

कर्जतजवळ रेल्वे पोहोचताच डब्यातून धूर येऊ लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज.

फायर अलार्म वाजताच झोपेत असलेल्या प्रवाशांची एकच धावपळ.

धूर पसरल्याने काही काळ भीतीचे वातावरण; प्रवाशांना तातडीने सतर्क करण्यात आले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

शिर्डीत तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवसीय गुरूपोर्णीमा उत्सवाला आज भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे.. साईबाबांची काकड आरती झाल्यानंतर पारंपारीक पद्धतीने साईबाबांचा फोटो आणि विणा याची मंदिरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.. साईबाबांच्या हयातीत सुरू झालेला गुरूपोर्णीमा उत्सव आजही मोठ्या भक्तीमय वातावरणात शिर्डीत साजरा केला जात आहे.. साईबाबा संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह संस्थानचे अधिकारी, साईभक्त आणि ग्रामस्थ या मिरवणूकीत सहभागी झाले होते..

शिक्षकांच्या मागणीसाठी शिक्षण विभागात चिमुकल्यांचा ठिय्या आंदोलन..

संग्रामपूर तालुक्यातील उमरा पानाचे येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता दूर करण्याच्या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संग्रामपूर येथील शिक्षण विभागात ठिय्या आंदोलन केले. ६५ विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच शिक्षक असल्याने शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप पालकांनी केला. "शिक्षक द्या... आम्हाला शिक्षक द्या..." अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पहिली ते चौथी असे वर्ग असून एकच असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे..

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट आज दुपारी १२ ते २ पर्यंत बंद

दिवे घाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंग साठी रस्ता बंद

आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवे घाट या मार्गावर काम

आज दुपारी १२ पासून वाहनचालकांसाठी घाट राहणार बंद

या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार असल्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाचे आवाहन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Waterfalls : पावसाळ्यात धबधब्यांनी खुलतंय 'हे' सुंदर ठिकाण, निसर्गप्रेमींनी नक्की भेट द्या

Mysterious temples: भारतातील सर्वात रहस्यमय मंदिरं; शतकानुशतकं न उलगडलेली गूढ रहस्यं

इकडे कच्चे तेल धडाम, तिकडे पेट्रोल डिझेलचे आजचे दर जाहीर; जाणून घ्या ग्राहकांना दिलासा मिळाला का?

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

38 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, मुंब्र्यात 13 वर्षीय मुलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT