पुणे -
भाषांतर करण्यासाठी आलेले प्रश्न हवालदारने इतर आरोपींच्या माध्यमातून पोहचवले
एन टी ए च्या अनुवादक म्हणून मनिषा हवालदार होत्या कार्यरत
एन टी ए कडून नीट परीक्षेसाठी हवालदार यांची भौतिकशास्त्राच्या पेपरसाठी अनुवादक म्हणून होती नियुक्ती
नीट परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या काही प्रश्नांचे भाषांतर करून स्वतःकडे ठेवले
एन टी ए साठी काम करत असताना हवालदार यांनी हस्तलिखित नोट्स सुद्धा स्वतःकडे ठेवल्या होत्या
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
- सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात वाढ
- २६ मे पासून कांदा खरेदीच्या दरात वाढ
- उद्यापासून नाफेड आणि NCCF कडून नव्या दराने खरेदी
- उद्यापासून १५८० रूपये प्रति क्विंटल दराने होणार कांदा खरेदी
- आजपर्यंत १२३५ रुपये प्रति क्विंटल होता भाव
- शेतकऱ्यांच्या नाराजीनंतर कांदा खरेदी दरात सरकारकडून वाढ
एंकर - जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना सांगोल्यातील राजाराम दामोदर ढोले (वय ४९) या शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. येथील विद्यामंदिर प्रशालेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. राजाराम ढोले यांची जनगणना प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सोमवारी सकाळी सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास सांगोला शहरालगतच्या गावडे वस्ती परिसरात जनगणनेअंतर्गत माहिती संकलनाचे काम सुरू असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
गेल्या १५ मे ते २५ मे दरम्यान पेट्रोल-डिझेलच्या दरात वारंवार वाढ झाल्याने सर्वसामान्य, शेतकरी, कामगार व लघु व्यावसायिक अडचणीत आले असल्याचा आरोप उबाठाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केला आहे. केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकार परिस्थिती हाताळण्यात सपशेल नापास ठरल्याची टीका त्यांनी केली. सततची इंधन दरवाढ थांबली नाही तर देशात अराजकतेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
परभणीत पेट्रोल पंप चालकांडून पंपावर पोलिस बंदोबस्ताची मागणी
गर्दी आणि हाणामारीच्या घटनांमुळे पंप चालकांची पोलिस बंदोबस्ताची मागणी
पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेल पुरवठा वाढवावा, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
नांदेडच्या धर्माबाद तालुक्यात मान्सून पूर्व पावसाचा धुमाकूळ.
वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे धर्माबाद तालुक्यातील विळेगाव थडी येथील शिवनाम सप्ताहा निमित्त उभारण्यात आलेला मंडप जमीन उद्ध्वस्त.
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मंडप आणि शिवनाम सप्तानिमित्त लागणाऱ्या अन्न धान्याचे मोठे नुकसान.
अधिक मासानिमित्त विळेगाव थडी येथे शिवनाम सप्ताहाचा करण्यात आलं होतं आयोजन.
अचानक आलेल्या वादळवाऱ्यासह पावसामुळे भाविकांची उडाली धावपळ.
सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले आहे आज दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील नाझरे,चोपडी,हातीद,उदनवाडी या परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिक आणि जनावरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
नीट पेपर फुटी प्रकरण
शहा, मांढरे आणि हवालदार यांचे कनेक्शन आले समोर
शहा ने वही मध्ये हवालदार कडून प्रश्न घेतले लिहून
शहा ने हवालदार कडून ५० ते ६० प्रश्न घेतले होते लिहून
या प्रश्नांचे फोटो काढून हवालदार यांना पाठवले गेले
मांढरे ने मागितले होते हवालदार यांना महत्वाचे प्रश्न
हवालदार यांनी प्रश्नांचे फोटो पाठवल्यावर केले डिलिट
अकोल्यातल्या दहीहंडा येथे कडाक्याच्या उष्णतेनंतर आज पावसाची हजेरी. वाढत्या उकड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तापमानात मोठी वाढ होत आहे. अशातच आज अकोल्यातील ग्रामीण भागात जोराच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात मोठा बदल झाला. पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या जोरदार वादळी वाऱ्याचा फटका विमानतळालाही बसला आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या आतमधील छताचा काही भाग उखडून कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी विमानतळावर कोणतेही विमान दाखल नव्हते, तसेच प्रवाशांची गर्दीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. वादळी वाऱ्यामुळे छताचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून, घटनेनंतर विमानतळ प्रशासनाने परिसराची पाहणी करत सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या आहेत. या घटनेमुळे विमानतळाच्या संरचनेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील दाळींब आणि मुरूम परिसरात आज मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली.
पुण्यासह राज्यातील काही प्रमुख महाविद्यालयातील प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर?
अटक केलेल्या आरोपींच्या संपर्कात हा प्राध्यापकांचा सहभाग असल्याचा तपास यंत्रणांना संशय
यातील प्राध्यापकांपैकी काही जणांचा एन टी ए समिती मध्ये सहभाग
या प्राध्यापकांपैकी एक प्राध्यापक निवृत्त झाले असून त्यांच्या निवृत्ती समारंभाला मनीषा मांढरे होत्या उपस्थित
पहिल्याच पावसात पुणे शहरातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेली पूरस्थिती, रस्त्यांवरील पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागलेला त्रास या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराविरोधात शिवसेनेच्या वतीने तीव्र “हल्लाबोल मोर्चा”
दुर्गाडी किल्ला परिसरातील दुर्गाडी देवी मंदिर आणि ईदगाहच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदच्या दिवशी मंदिर प्रवेशबंदीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. हिंदुत्ववादी संघटना, भाजपा तसेच शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाने मंदिरात भाविकांना प्रवेश देण्याची मागणी करत रस्त्यांवरील नमाज पठणाला विरोध दर्शवला आहे.
नंदुरबार भाजीपाला मार्केट येथे गवाराची आवक वाढल्याने गवाराचे दर अचानक मोठ्या प्रमाणात घसरले आहे. मागील आठवड्यात 70 रुपये किलो प्रमाणे विक्री होत असलेली गवार 25 ते 30 रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे. एक बाजू पालेभाज्यांची किंमत गगनाला भीडली आहे, तर गवाराची किंमती अचानक घसरल्याने गवार उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तर ग्राहकांकडून गवार खरेदीला पहिली पसंती दिली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचा आंदोलन सुरूच आहे. मुख्य अभियंत्याने आश्वासन देऊ नये शेतकरी आपल्या मागण्यांवरती ठाम आहे. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्नासाठीच्या आंदोलनाची चर्चा फिसकटली.
मंत्री दत्ता भरणे हर्षवर्धन पाटील आणि अधिकाऱ्याने चार तारखेपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासनानंतरही शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. खडकवासला दुसऱ्या आवर्तनाचे पाणी इंदापूरला भेटत नसल्याने शेतकऱ्याने सकाळपासून सुरू आहे.
शेतात काम करण्यासाठी गेलेल्या छबुताई सर्जेराव पाटील या महिलेचा खून
हातावर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा प्रकार उघडकीस
काल रात्री घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज
पन्हाळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीसांकडून तपास सुरू
- उपराजधानी नागपूर उष्णतेच्या भीषण लाटेत होरपळत असतानाच पश्चिम नागपुरात वारंवारच्या लोडशेडिंगने विरोधात कॉंग्रेसकडून मुख्य विद्युत भवन कार्यालयात जोरदार आंदोलन करण्यात आले...
- या विरोधात पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आले.
- महावितरण कार्यालयाच्या विद्युत भवन येथे जोरदार आंदोलन करण्यात आले...यावेळी आंदोलकांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेटिंगवर चढून लोड शेडिंगचा रोष व्यक्त केला..
- “उकाड्याने जनता त्रस्त आणि महावितरण मात्र सुस्त” असा आरोप करत ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
-नाशिकच्या मालेगाव शहर व तालूक्यात काल झालेल्या मान्सूनपुर्व पावसामुळे तालूक्यातील गणेश निकम या शेतक-याने सकाळी कांदा विक्री साठी नेण्यासाठी चाळीत काढून तो ट्रॅक्टर मध्ये भरुन ठेवलेला असतांना अचानक संध्याकाळच्या सुमारास झालेल्या पावसाने ट्रॉली मध्ये भरलेला कांदा पावसाने भिजून गेल्याने शेतक-याचे मोठ नुकसान झाले आहे.आधिच कांद्याला भाव नाही,त्यातच होणारे नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने तातडीने पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतक-याने केलीय.
दोन जून ते एक जुलै पर्यंत ठरावाची रणधुमाळी उडणार
गोकुळ निवडणूक प्रक्रिया झाली सुरु
१ जुलै २०२६ पर्यंत ठराव दाखल करण्याची मुदत..
खडकवासला कालव्याचे हक्काचे आवर्तन वेळेत न मिळाल्यामुळे इंदापूर तालुक्यातील सुमारे ३६ गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने लेखी आश्वासन देऊनही पाणी न सोडल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज पुण्यातील शनिवार पेठ येथील खडकवासला पाटबंधारे विभागाच्या 'सिंचन भवन'कार्यालयासमोर तीव्र धरणे आणि बोंबाबोंब' आंदोलन सुरू केले आहे.
विधानसभा निवडणुकीला तीन वर्षाचा कालावधी असला तरी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात आतापासूनच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष माधव पावडे यांनी आगामी निवडणुकीत नांदेड उत्तरचा आमदार पावडेवाडीतूनच होणार अस विधान करत आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली.
वाशिम च्या रिसोड तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने रिसोड तहसील कार्यालय समोर घंटानाद आंदोलन केलय
शुभम कावरे, शिवराज पवार आणी योगेश सोळुके RCP मध्ये आहे कर्मचारी तर गणेश मधे आहे QRT मध्ये पोलीस कर्मचारी....
ईद निमित्त पोलीस मुख्यलय येथे मॉकड्रिल सुरु असतांना हातातचं फुटला ग्रेनेट...
हातात ग्रेनेट फुटल्याने शुभम कावरे आणि शिवराज पवारची हाताची करंगळी झाली वेगळी...
कोणतेही पूर्व प्रशिक्षण न देता डायरेक्ट स्नो ग्रेनेट फोडायला दिल्याने ग्रेनेट हातातचं फुटला...
चौघे पोलीस कर्मचारी जखमी तर दोघांवर खाजगी रुग्णालयात थोड्याच वेळात होणार शस्त्रक्रिया.
कोल्हापुरातल्या राजारामपुरी सहाव्या गल्लीतील यशवंत अपार्टमेंट परिसरात पेट्रोल चोरीच्या घटना वाढताना दिसत आहेत.. गेल्या काही दिवसांपासून अज्ञात युवक दुचाकींमधून पेट्रोल चोरी करत असल्याचे रहिवाशांनी म्हंटले आहे. विशेष म्हणजे, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवूनही आरोपी तोंड झाकून येतात आणि कॅमेऱ्याची दिशा बदलून चोरी करत असल्याचे समोर आले आहे.
रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र
कृष्णा नदीत मासेमारी करताना सांगलीच्या हरिपूर येथे एका मच्छीमाराला तब्बल 40 किलो वजनाचा भला मोठा मासा सापडला आहे.कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमावर छडीवर मासेमारी करत असताना आम्हाला मोठा मासा सापडला आहे,.कटला प्रजातीचा हा मासा असून भल्या मोठ्या माशाला नदीतून बाहेर काढताना मच्छीमाराची चांगलीच दमछाक झाली. नदीतून हा भला मोठा मासा बाहेर काढल्यानंतर माशाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नदीमध्ये एवढ्या मोठ्या वजनाचा मासा मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हिंगोलीत 48 वर्षीय व्यक्तीचा उष्मघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे, संतोष गोपाल धाबे असे या व्यक्तीचे नाव असून ते हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील हानकदरी गावचे रहिवासी आहेत, दरम्यान संतोष यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
नाशिकच्या बागलाण तालुक्यातील राहुड येथे कर्जबाजारीपणा, बदलते हवामान आणि शेतीमालाला मिळणाऱ्या कवडीमोल दरांच्या विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. अडावद, खर्डी, लोणी आणि पंचक परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेली केळी जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कर्ज काढून केळीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
उद्योगपती अरुण लखानी यांना वर्धा गडचिरोली चंद्रपूर विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्याची मागणी.
कॅाग्रेसचे नगरसेवकांचे मते जुळवण्याचे आव्हान
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्याला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे.यावल, हरीपुरा,सांगवी, न्हावी आणि पंचक परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुण्यातील सातारा रस्त्यावरील किंग बर्गर येथे एका डिलिव्हरी बॉयला दुकानातील कामगाराने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. मारहाणीत डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात गंभीर घाव लागून दुकानात सर्वत्र रक्त सांडल्याचे दिसून आले. या घटनेचे व्हिडिओ इन्स्टाग्राम युजर प्रसाद भोपळे यांनी शेअर केले आहेत.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी रास्ता रोको करणाऱ्या संतप्त टोल कर्मचाऱ्यांची समजूत काढल्यानंतर, पोलीस अधीक्षकांनी केलेल्या विनंतीला मान देत टोल कर्मचाऱ्यांनी अखेर रास्ता रोको आंदोलन मागे घेतले आहे,
पेट्रोल डिझेलच्या दरात गेल्या दहा दिवसात सलग चौथ्यांदा वाढ झाली आहे.त्यामूळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे.सातत्याने होणारी इंधन दरवाढीमुळे नागरीकांतुन संताप व्यक्त केला जात आहे.धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल दर 113 रुपयांवर तर डिझेलचे दर 99.63 पैशांवर पोहचले आहेत.तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यात गेली तीन दिवसापासून डिझेल तुटवडा निर्माण झाला आहे. बहुतांश पेट्रोल पंपावरील डिझेल साठा संपल्याने पंपचालकांनी डिझेल शिल्लक नसल्याचे बोर्ड लावले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती मशागतीची कामे खोळंबली आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या 54 तासापासून इंधनाचा साठा पूर्णपणे संपला आहे डिझेल उपलब्ध होत नसल्याने हिंगोली शहरातील रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे सकाळी सहा वाजल्यापासून ही रिक्षा चालक डिझेल मिळवण्यासाठी रांगेत लागले आहेत दरम्यान पेट्रोल पंपावर इंधनाचा टँकर दाखल झाला आहे मात्र अद्याप देखील डिझेल पुरवठा चालू झाला नसल्याने रिक्षा चालक पेट्रोल पंपावरच वाट पाहत थांबले आहेत दरम्यान सरकारने इंधनाचे दर आणखी वाढवावेत मात्र डिझेल उपलब्ध करून द्यावे अशी उद्दीन प्रतिक्रिया रिक्षा चालकाने दिली आहे
नागपूरकरांच्या खिशाला पुन्हा एकदा झळ बसली आहे... पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग वाढ सुरूच असून, अवघ्या १२ दिवसांत चौथ्यांदा इंधन महागलं आहे. नागपूरात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २ रुपये ७३ पैशांची वाढ झाली असून साध्या पेट्रोलचा दर आता १११ रुपये ७२ पैशांवर पोहोचला आहे. डिझेलही महागलं असून प्रति लिटर २ रुपये ७१ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे नागपूरात डिझेलचा दर ९८ रुपये ३८ पैशांवर गेला आहे. तर पॉवर पेट्रोलसाठी वाहनधारकांना आता तब्बल १२० रुपये ७३ पैसे मोजावे लागणार आहेत. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक आणि वाहतूक क्षेत्रावर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नांदेड शहरातील साठे चौक परिसरातील तीन लहान मुले गोदावरी नदीच्या नगीना घाट येथे पोहण्यासाठी गेली असताना, त्यातील दोन मुलांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटन घडली. रणवीर यशवंत शिंगाडे (वय १४ वर्षे) आणि गणेश डोंगरे (वय १३ वर्षे, दोघे रा. तुकामाई हॉस्पिटल समोर, साठे चौक, नांदेड) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दुर्दैवी बालकांची नावे आहेत.यातील एक जण सुखरूप पाण्याच्या बाहेर निघाला.
धुळे तालुक्यातील लळिंग घाटामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे, यामध्ये डंपर ने ट्रकला उडवले आणि त्यानंतर पाठीमागून येणारि खाजगी ट्रॅव्हल बस देखील या वाहनांना धडकल्यामुळे या विचित्र अपघातात जवळपास पाच जण मृत्युमुखी पडले असून, जवळपास पाच ते सहा जण जखमी झाले आहेत, जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे,
राज्यात आज मान्सून पूर्व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर नाशिक, पुणे आणि कोल्हापूरमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिकच्या कळवण तालूक्यातील चणकापूर धरणावर मालसेमारी साठी मोहमुख येथिल २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.पाण्याच्या काठावर असतांना अचानक तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाला,घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेतल त्याचा शोध त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला,तर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक व बचाव पथकाच्या माध्यामातून शोध घेतला असता संध्याकाळी उशिरा मृतदेह शोधण्यात यश येऊन तो पाण्यातून बाहेर काढण्यात आला.काही दिवसांपुर्वीच अशीच दुर्घना घडून पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.