Maharashtra Live News Update : Saam Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: उडीसाहून रेल्वेने उल्हासनगरात २१ किलो गांजाची तस्करी उघड

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : पेट्रोल-डिझेलची बचत करा, राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस, राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

उडीसाहून रेल्वेने उल्हासनगरात २१ किलो गांजाची तस्करी उघड

उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ यांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २१ किलोहून अधिक गांजा जप्त केला असून तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ९ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

'नीट' परीक्षा पेपर फुटी प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करा

'नीट'ची परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करावी लागली, ही सरकारची नामुष्की आहे. याबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी. विद्यार्थ्यांना नुकसान सोसावे लागले, त्याची भरपाई सरकारकडून मिळावी, अशी मागणी काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी केली.

नद्यांमधील पाण्याचे प्रदूषण वाढल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई - जलसंपदा मंत्री विखे पाटील

देशावर असलेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय बैठका ऑनलाईन पद्धतीने घ्या, उद्घाटन समारंभ आणि राजकीय कार्यक्रम टाळा, इंधनाची बचत करा असे आवाहन लोकप्रतिनिधींना केले आहे.. मात्र मुख्यमंत्र्यांच्या याच निर्देशांना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जणू केराची टोपली दाखवली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय..

इंधन बचतीचा घोडागाडीतून प्रवास करत, आमदार खोत आणि पडळकरांचा संदेश 

सांगली मध्ये आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी थेट घोडा गाडीतून प्रवास केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेच्या वतीने सांगलीत आत्मनिर्भर भारत नागरिक शेतकरी कष्टकरी परिषदेचा आयोजन करण्यात आलं. या परिषदेला आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी शरदला सर्किट हाऊस येथून मारुती चौकापर्यंत घोडा गाडी चालवत प्रवास केला आहे.आमदार महोदय घोडा गाडीतून जात असल्याने यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

जनता दरबारामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंना अमरावती शहराध्यक्षांनी घातली हवा, व्हिडिओ व्हायरल

मरावतीच्या दर्यापूर मधील जनता दरबारामध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कागदाने हवा घालताना भाजप शहराध्यक्ष मेगा भारती यांचा व्हिडिओ व्हायरल....

हवा घालत असल्याचे लक्षात येताच पालकमंत्री बावनकुळे यांनी महिला शहराध्यक्षांना रोखलं....

दर्यापूर मध्ये जनता दरबार आयोजित करण्यात आला होता.

यावेळी ही महिला शहराध्यक्ष कागदांनी बावनकुळे यांना हवा घालत होती मात्र लक्ष जातात बावनकुळे यांनी मेघा भारती यांना रोखलं..

Pune: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानाला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

पुणे -

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानाला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची X वरून घोषणा

या निर्णयामुळे तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगिण विकास आणखीन होणार

ट्रस्टचे सरचिटणीस आणि कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या पाठपुराव्याला यश

माणगाव म्हसळा मार्गावरील घोणसे घाटात टँकरला अपघात

श्रीवर्धन, हरिहरेश्वरहून मुंबईकडे परत निघालेले पर्यटक अपघातामुळे अडकले

म्हसळा, श्रीवर्धनमध्ये पेट्रोल डिजेल, पेट्रोल घेऊन निघालेला टँकर घोणसे घाटातील अवघड वळणावर पलटी झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला दिलासा

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआरच्या विषयाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेऊन अंतिम निर्णय देईपर्यंत त्यांनी या टीडीआर व्यवहाराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

मावळच्या शिरोता डॅम येथे दुर्दैवी घटना; पुण्याहून पर्यटनासाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील शिरोता डॅम येथे पर्यटनासाठी आलेल्या ६ विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

देशात लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता- जयंत पाटील

देशात पेट्रोलचे दर 120 ते 30 रुपये होतील,डॉलरचा दर शंभर रुपये पर्यंत जाईल, असे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी करत भाजपावर टीका केली आहे.तसेच देशात आपोआप लॉकडाऊन लागेल की,काय ? अशी भीती आपल्या मनात निर्माण झाल्याचे जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी केलेल्या इंधन बचतीच्या आव्हानावर देखील खोचक टीका केली आहे,ते सांगलीच्या ईश्वरपूर येथे शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

मराठा समाजासाठी राज्य सरकारनं अनेक गोष्टी केल्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मराठा समाजासाठी राज्य सरकारनं अनेक गोष्टी केल्या आहेत, असं  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातल्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

तीस लाखाचा गुटखा आणि पान मसाला ग्रामीण पोलीसांनी  पकडला, एकाला अटक

नांदेड शहरात विक्रीसाठी आलेला 30 लाखाचा गुटखा ग्रामीण पोलिसांनी पकडला.या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली.गोपनीय माहिती वरुन ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.एका पांढऱ्या बोलेरो गाडीतून मोठ्या प्रमाणात गुटखा नांदेड मध्ये येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलीसांनी सापळा लावला.शहराजवळच्या कांदा मार्केट येथे ही गाडी पोलिसांनी अडवायचा प्रयत्न केला.मात्र चालकाने भरधाव वेगाने गाडी पळवली.पोलीसांनी पाठलाग करुन गाडी पकडली.त्यात गुटखा आणि सुगंधी सुपारीचा मोठा साठा आढळला.

DHULE: नाशिक पाठोपाठ धुळ्याच्या निजामपूर जैताणे येथे देखील भोंदू बाबाचा अघोरी प्रकार उघडकीस 

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणानंतर आता धुळ्याच्या साखरी तालुक्यातील निजामपूर जैताणे येथील परिसरामध्ये अशाच प्रकारे एका भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे, भोंदू बाबा योगेश खैरनार याने अघोरी पूजा करून त्याच्या मठाजवळच दोन जणांची हत्या केलाचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे, यामध्ये विवाहिता जयश्री काकुस्ते वय 25 व अक्षय सोनवणे वय 28 या दोघांची या भोंदू बाबा ने हत्या केली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे,

Pimpri Chinchwad: खाजगी लक्झरी बस चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ 

खुराणा नाव लिहिलेली एक खासगी लक्झरी ट्रॅव्हल्स बस रस्त्यावरून जात असताना एका बाजुला पूर्णपणे झुकलेली दिसत आहे. ट्रॅव्हल्स चक्क एका बाजूला प्रचंड झुकलेली असतानाही मुजोर चालकाने बस न थांबवता तशाच अवस्थेत प्रवाशांचा प्रवास सुरू ठेवला यामुळे ट्रॅव्हल्स बसचा अचानक एक बाजूला तोल जाऊन ती कधीही पलटी होऊ शकली असती.

Ambernath: अंबरनाथचे 'ते' १२ नगरसेवक भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला 

अंबरनाथमध्ये शिवसेना भाजपाची युती होताच काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या १२ नगरसेवकांनी शनिवारी रात्री भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली १२ नगरसेवकांनी डोंबिवलीत ही सदिच्छा भेट घेतली. यानंतर आज सकाळी शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले, जिल्हाध्यक्ष नंदू परब, गटनेते अभिजित करंजुले, शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी उपस्थित होते. नैसर्गिक युती झाल्यानं सदिच्छा भेट घेतल्याचं यानंतर शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले यांनी सांगितलं.

Pune: पुण्यात छत्रपती संभाजी उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांच्या कृती पुतळ्याचे अनावरण 

पुण्यात छत्रपती संभाजी उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांच्या कृती पुतळ्याचे अनावरण

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते अनावरण सोहळा संपन्न

उपमुख्यमंत्री Sunetra Pawar, उपसभापती Neelam Gorhe यांची प्रमुख उपस्थिती

ढोल-ताशा, शंखनाद आणि जयघोषांनी परिसर दणाणला

“छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “छत्रपती संभाजी महाराज की जय” घोषणांनी वातावरण भारावले

Wardha: हरणांच्या कळपातून ऐटीत चालला वाघ; बोर व्याघ्र प्रकल्पाची समृद्धता पुन्हा चर्चेत 

हरणांच्या कळपातून ऐटीत चालला वाघ; बोर व्याघ्र प्रकल्पाची समृद्धता पुन्हा चर्चेत

बोरच्या जंगलातील थरारक दृश्य; हरणांमध्ये निर्धास्त फिरताना दिसला वाघ

बोरमध्ये जैवविविधतेची भरभराट

जलाशय किनारी हरणांचा कळप अन् मधूनच वाघाची राजेशाही चाल

बोर व्याघ्र प्रकल्पात निसर्गाचा अद्भुत क्षण

सांगलीत आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून सदाभाऊ खोतांचा सरकारला घरचा आहेर

शेतकऱ्यांच्या प्रश्न थट्टा मस्करीत घ्यायला लागलो,तर राज्याच्या दृष्टीने हे योग्य होणार नाही,असे विधान करत आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.माझे सहकारी राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांना,ज्या पद्धतीने पोलिसांकडून उचलण्यात आलं,त्याची गरज नव्हती,असे सांगत पोलीस कारवाईबाबत आमदार खोत यांनी खंत व्यक्त केली आहे

अहमदपूर नागठाणा बस मार्गावर बस उलटली, बस मधील सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी

लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर नागठाणा मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस पलटी झाली आहे. बसमध्ये एकूण 35 प्रवासी असल्याची माहिती समोर येतेय.

7 ते 8 जखमी झाल्याने त्यांना अहमदपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.

पुण्यात छत्रपती संभाजी उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांच्या कृती पुतळ्याचे अनावरण

पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यान येथे आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य कृती पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, नीलम गोऱ्हे उपसभापती , महापौर मंजुषा नागपूरे, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर तसेच भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि पालिकेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिकमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवन परिसरात गिरणा नदी काठा लगत शेतकरी कैलास जाधव यांचे फार्म हाऊस, पोल्ट्री शेड, जनावरांचे गोठे असून तेथे बिबट्याचा वावर वाढला होता.

त्यांच्या अनेक जनावरांचा बिबट्याने फडशा पडला होता. अखेर काल रात्री वनविभागाने त्यांच्या शेतलागत पिंजरा लावला असता सकाळच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

कल्याण रेल्वे स्थानकात धक्कादायक प्रकार, 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

  • 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

  • अत्याचार करणाऱ्या आरोपी सौरभ सोनवणे याला कल्याण जीआरपी पोलिसांनी घेतला ताब्यात

  • 14 वर्षाची पीडित मुलगी अहिल्यानगरहून आपल्या मामाला भेटण्यासाठी कल्याणला आली

  • कल्याणहून तिला मामाच्या घरी खोपोलीला जायचे होते

  • खपोलीला जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनचा प्रतीक्षेत होती.

चांदीच्या आयातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर चांदीच्या आयातीवर देखील केंद्र सरकारकडून लावण्यात आले निर्बंध

चांदीची आयात मुक्त श्रेणीतून मर्यादित श्रेणीत

चांदीच्या आयातीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय सराफा बाजारावर व उद्योग व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता

चांदीची आयात मर्यादित झाल्याने पुढील काळात चांदीच्या दरातही वाढ होणार असल्याचे सराफा व्यावसायिकांचे मत

nandurbar : कुंभमेळा निधीवरून भाजप-शिंदे गटात पुन्हा आरोप-प्रत्यारोप

प्रकाशा कुंभमेळा निधीवरून भाजप-शिंदे गटात पुन्हा आरोप-प्रत्यारोप....

मुख्यमंत्र्यांनी 130 कोटीच्या निधी मंजूर केला मात्र तीन रुपयेही आले नाहीत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आरोप....

गावकरी सांगणार तेच काम करा ठेकेदार सांगणार ते काम करू नका रघुवंशींच्या भाजपवर आरोप...

मंजूर झालेल्या कामांचे श्रेय घेण्याचं काम शिंदे गटाचे आमदार करत आहेत माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या पलटवार....

पुण्यात खळबळ; पतीने गुप्तांगावर अॅसिड टाकल्याचा पत्नीचा आरोप

पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना

पतीने गुप्तांगावर ऍसिड टाकल्याचा पत्नीने केला आरोप

पुण्यातील उरुळी कांचन परिसरातील घटना

नराधम पतीविरोधात करण्यात आला गुन्हा दाखल

Ahilyanagar : प्रवरा नदीत बुडून 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

प्रवरा नदीत बुडून 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कुटुंबियांसमोरच चिमुकल्याचा नदीपात्रात बुडून मृत्यू...

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार परिसरातील धक्कादायक घटना...

प्रवरा नदीवरील बंधाऱ्याजवळ घडली दुर्घटना...

आई वडिलांसोबत नदीवर गेलेला 14 वर्षीय मुलगा नदीपात्रात बुडाला...

Pune : पुण्यात इंधन दरवाढीविरोधात मनसेचं आंदोलन 

पुण्यात इंधन दरवाढीवरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने इंदनदरवाढीविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. रस्त्यावर आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही मनसैनिकांना ताब्यात घेतलं. काळे झेंडे दाखवत आंदोलन केले. मुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर आहेत. मंमदवाडी कोंढवा परिसरात आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचं भूमिपूजन आहे.

Nashik : नाशिकमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला मोठा ब्रेक

- नाशिक जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला मोठा ब्रेक

- नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या हस्तक्षेपाने बदली प्रक्रिया स्थगित

- ९० रिक्त उपकेंद्रे असताना केवळ ६६ जागांवरच बदली प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न उघड

- उमेदवाराच्या आक्षेपानंतर प्रभारी सीईओ प्रतिभा संगमनेरे यांनी केली पडताळणी

washim : वाशिममध्ये आलिशान कारमधून गो तस्करी

वाशिम शहरात आलिशान कारमधून गो तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रात्रीच्या सुमारास आलिशान कारमधून आलेल्या चोरट्यांनी गाईला गुंगीचे औषध देत बेशुद्ध करून गाडीत टाकण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याचवेळी अचानक त्या परिसरातील एक व्यक्ती घरातून बाहेर आल्याने गो तस्करांनी तिथून पळ काढला.

Pune :  पुणे-सातारा महामार्गावर कंटेनर उलटून होऊन अपघात

पुणे सातारा महामार्गावरील केळवडे गावच्या मध्यरात्री भरधाव कंटेनर उलटून होऊन अपघात झाल्याची घटना

अपघातात कंटेनर चालकाचा कंटेनरखाली सापडून जागीच मृत्यू

हनुमंत शंकर धोंडे (वय ५०, रा. चिखलगाव, ता. भोर) असं मृत्यू झालेल्या कंटेनर चालकाच नाव आहे

hingoli : हिंगोलीत अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील जयपूरवाडी येथे अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले आहे, मारोती फाळके असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे, फाळके यांच्याकडे दोन एकर शेती असून त्यांच्यावर बँकेचे व खाजगी सावकाराचे कर्ज आहे.

Wardha: वर्धा ठरतंय सर्वात उष्ण शहरांपैकी एक; ४६ अंश तापमानाची नोंद

वर्धा ठरतेय देशातील सर्वात उष्ण शहरांपैकी एक

वर्ध्यात ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

सकाळी १० वाजतापासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ

तीव्र उन्हाचा जनजीवनावर परिणाम

उन्हामुळे जीवाची लाहीलाही

तापमानात आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

Mulshi: मुळशीत चांदे-मूलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्युनर गाडीची

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील चांदे-मूलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्युनर गाडीची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना

या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू तर फॉर्च्युनरमधील तिघे जण जखमी झाले आहेत

यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडेंच्या डोक्याला दुखापत झाल्याने तेही जखमी झाले आहेत.

विकास अर्जुन पारखी असं मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करत जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले

अपघातानंतर अभिमन्यू अर्जुन पारखी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फॉर्च्युनर चालकावर मुळशीतील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय..

पौड पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत..

MNS: इंधन दरवाढी विरोधात मनसे मुख्यमंत्र्यांसमोर समोर आंदोलन करण्याचा इशारा

इंधन दरवाढी विरोधात मनसे मुख्यमंत्र्यांसमोर समोर आंदोलन करण्याचा इशारा

कोंढवा पोलिसांनी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबा यांना दिली नोटीस

मनसे आंदोलन करण्यावर ठाम

मनसेच्या पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात येत असून त्यांच्यासमोरच आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता

पुणे पोलिसांकडून मनसे शहरप्रमुख साईनाथ बाबर यांना नोटीस बजावून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलन करू नये असे म्हटले आहे

पुणे पोलिसांकडून जमाबंदी आदेश लागू करण्यात आले असून पाच पेक्षा पाच अधिक व्यक्ती एकत्र जमू शकणार नसल्यास म्हटला आहे

Pune: पुण्यातील खडकवासला येथे भरधाव कारचा थरार; ६ दुचाकींसह रिक्षाला उडवले

या घटनेत एका ४ वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहेत..

यशराज निलेश कांबळे (वय ४ वर्षे, रा. अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे, पुणे) असे या अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे..

काल सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला..

कार दुचाकींना धडक देऊन दुकानात शिरतानाचा cctv व्हिडीओ समोर आलाय..यात दुकानातून बाहेर पडत असलेली दोन मुलेही थोडक्यात बचावलेली दिसत आहेत..

Pandharpur: भोंदूबाबा मनोहर भोसलेसह अन्य चौघांना न्यायालयीन कोठडी

मुतखड्याचा आजार बरा करतो म्हणून एका भक्ताला ४१ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या भोंदुबाबा मनोहर भोसलेसह चौघा जणांवर करमाळा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन दिवसांची पोलिस कस्टडी संपल्यानंतर न्यायाधीश शर्मा यांनी भोंदुबाबा व त्यांच्या सहकाऱ्यांना न्यायालयीन कस्टडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Solapur : सोलापूर शहर पोलिसांची कारवाई, 35 घरफोडी करणाऱ्या चोरट्याला 48 तासात केलं अटक

सोलापूर शहर पोलिसांची कारवाई

35 घरफोडी करणाऱ्या चोरट्याला 48 तासात केलं अटक

देशातील सर्वाधिक हॉट सिटी अमरावतीत तापमानाचा पारा ४६ अंशावर

देशातील सर्वाधिक हॉट सिटी अमरावतीत तापमानाचा पारा ४६ अंशावर

विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहणार

Ratnagiri CNG Shortage : रत्नागिरी- जिल्ह्यात आज देखील CNG गॅसचा तुटवडा

रत्नागिरी- जिल्ह्यात आज देखील cng गॅसचा तुटवडा

पहाटेपासून सीएनजी मिळावा यासाठी सीएनजी स्टेशन बाहेर रांगा

रत्नागिरी शहरातील माळ नाका परिसरातल्या सीएनजी स्टेशनवर पहाटेपासून वाहन चालक

रांगेत उभे राहिल्यानंतर अडीच ते तीन तासानी मिळतोय गॅस

Jalgaon : अमळनेर राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांकडून अंमळनेर ग्रामीण रुग्णालयाची पाहणी 

अमळनेर राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांकडून अंमळनेर ग्रामीण रुग्णालयाची पाहणी.

अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील अस्वच्छता तसेच सुविधांवरून आमदार अनिल पाटलांनी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले.

रुग्णांनी या रुग्णालयात मरायला यायचं का या शब्दात आमदार अनिल पाटील यांनी सुविधांवरून संताप व्यक्त केला

प्रत्येक गोष्टीची आमदार अनिल पाटील यांनी पाहणी करत रुग्णांची देखील विचारपूस करत चौकशी केली.

NEET Paper Case Update : शिक्षिका मनीषा मांढरे नीट पेपर फुटीप्रकरणी अटक झाल्यानंतर महाविद्यालयाकडून चौकशी होणार

मॉडर्नची शिक्षिका मनीषा मांढरे नीट पेपर फुटीप्रकरणी अटक झाल्यानंतर महाविद्यालयाकडून चौकशी होणार

गेले २४ वर्ष शिक्षिका म्हणून मॉडर्नमध्ये कार्यरत

मनीषा मांढरे शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे कॉलेज कडून स्पष्ट

संग्रामपूर तालुक्यात वाढत्या तापमानाचा फटका; संत्री बागा सुकल्या

जिल्ह्यात वाढत असलेल्या उष्णतेमुळे संग्रामपूर तालुक्यातील बावणबीर परिसरातील संत्री बागांना मोठा फटका बसला आहे. तापमान तब्बल ४५ अंशांपर्यंत पोहोचल्याने फळबागा तग धरू शकल्या नाहीत आणि अनेक बागा सुकून गेल्या आहेत. यात बावणबीर येथील शेतकऱ्यांचे सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले असून परिसरातील फळबाग उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

देवगड येथे आंबा बागायतदारांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी मुंबई येथे काढलेला मोर्चा शासनाने दडपण्याच्या प्रकार केला. त्याच्या निषेधार्थ आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी देवगड जामसंडे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून निषेध केला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी टरबूज फोडून फडणवीस सरकार विरोधात घोषणाबाजी केली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जाळण्यात आलेली जागा स्वच्छ करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान कोकणातील आंबा काजू शेतकरी पहिल्यांदाच नुकसान भरपाई साठी मागणी करत असताना मोर्चा काढू न देता सरकारने तो दडपण्याचा प्रयत्न केला याचा जाब येणाऱ्या काळात सरकारला द्यावा लागेल अशा प्रकारचा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

लोणारच्या प्राचीन दैत्यसूदन मंदिरात सूर्यकिरणांचा सुवर्णस्पर्श

जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरातील प्राचीन दैत्यसूदन मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही किरणोत्सवाला सुरुवात झाली आहे.

१५ मेपासून सुरू झालेल्या या पाच दिवसीय सोहळ्यात सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान मंदिराच्या गाभाऱ्यातील छोट्या छिद्रातून सूर्यकिरण थेट भगवान विष्णूंच्या मूर्तीवर पडताना दिसत आहेत.

सर्वप्रथम किरण मूर्तीच्या मुकुटावर पडून हळूहळू पायापर्यंत सरकतात.

तिरुअनंतपुरम दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमध्ये भीषण आग, कोणतीही जीवित हानी नाही

तिरुअनंतपुरम दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमध्ये भीषण आग

कोणतीही जीवित हानी नाही

सकाळी ५ च्या सुमारास आग लागल्याची घटना

Nagpur Madgaon Express : नागपूर-मडगाव एक्स्प्रेसला केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखवला हिरवा झेंडा

- नागपूर-मडगाव एक्स्प्रेसला केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखवली हिरवी झेंडी..

- नागपूर-मडगाव एक्स्प्रेसचे नियमितीकरणाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले..

- विदर्भ आणि कोकणाला जोडणाऱ्या नागपूर-मडगाव विशेष रेल्वेगाडी आता नियमित धावणार..

Pune : एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पाणीकपातीचे संकेत

उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्यात येत्या काही दिवसांत पाणीकपातीचे संकेत दिले आहेत.

एल-निनोमुळे पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याने जलसंपदा विभागाकडून पाणी नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड आणि औद्योगिक क्षेत्रासाठी १५ टक्के पाणीकपातीचा प्रस्तावही चर्चेत आहे.

Pune : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात

महापालिकेंच्या विविध कामाचे भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार

दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुण्यात विविध कार्यक्रम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोरियन मुलींच्या सरळ केसांचे रहस्य काय?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट ₹३००० येणार? मे-जूनचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता, पाहा महत्त्वाची अपडेट

Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; वयाच्या ३३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत हळहळ

आता इंस्टाग्रामसाठी मोजावे लागणार पैसे? 'इंस्टाग्राम प्लस'मध्ये युझर्सना कोणत्या मिळणार सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra News Live Update: विद्युत पोलचा शॉक लागल्याने सात वर्षीय मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT