ias officer transfer  Saam tv
महाराष्ट्र

सलग दुसऱ्या दिवशी बदल्यांचा धडाका; बड्या अधिकाऱ्यांची अचानक बदली, प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये चर्चांना उधाण

Maharashtra IAS transfer : सामान्य प्रशासनाने राज्यात सलग दुसऱ्या दिवशी बदल्यांचा धडाका लावला आहे. बड्या अधिकाऱ्यांची अचानक बदली करण्यात आली आहे.

डॉ. माधव सावरगावे

राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका

बड्या अधिकाऱ्याची पुन्हा बदली

बड्या सनदी अधिकाऱ्याची बदली झाल्याने चर्चांना उधाण

राज्यातील सलग दुसऱ्या दिवशी बदल्यांचा धडाका सुरू आहे. राज्य प्रशासनाने काल बुधवारी ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर आज गुरुवारी देखील बड्या अधिकाऱ्यांची बदली केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी बदल्या करण्यात आल्याने प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात तुकाराम मुंढे यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यानंतर काल झालेल्या बदल्यांमध्ये कुशल जैन, रेवैया डोंगरे यांच्या नावाचा समावेश आहे. ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आता आणखी एका बड्या सनदी अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. जी श्रीकांत असे या सनदी अधिकाऱ्यांचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेचे बदलून गेलेले आयुक्त १२ दिवसातच पुन्हा शहरातच आले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त राहिलेले जी श्रीकांत यांची अवघ्या बारा दिवसांत पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्येच बदली झाली आहे. 3 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे आयुक्त पदावरून त्यांची अभियान संचालक जलजीवन मिशन या मुंबई या ठिकाणी बदली झाली होती. आता ते पुन्हा छत्रपती संभाजीनगरात बदली होऊन मराठवाड्याचे विभागीय आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत. आजच त्यांच्या मुंबईहून बदलीची ऑर्डर आली आहे.

कोण आहेत जी. श्रीकांत?

श्रीकांत यांची बदली झाल्यानंतर 3 एप्रिल रोजी राजकीय नेत्यांकडून त्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी केली होती. मात्र ती बदली रद्द झाली नाही. आता मात्र त्यांची मुंबईवरून पुन्हा बदली होऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्त म्हणून त्याचा रुजू होणार आहेत. जी श्रीकांत हे गेल्या पाच वर्षापासून छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये आधी जीएसटी आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त, प्रशासक म्हणून कार्य केले आहे. त्यापूर्वी ते मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्य केलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अकोल्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का

Oral Cancer Risk: तंबाखू न खाणाऱ्या अन् धूम्रपान न करणाऱ्यांनाही तोंडाच्या कर्करोगाचा धोका? जाणून घ्या सत्य...

Pune : पुण्यातील लॉजवर बंद दाराआड सुरु होता भयंकर प्रकार! पोलिसांनी धाड टाकताच ९ महिला नको त्या अवस्थेत सापडल्या

Women Reservation bill : महिला आरक्षणावर बोलताना पंतप्रधान मोदींची विरोधकांना खुली ऑफर; म्हणाले, मी ब्लँक चेक देतो, पण...

Crime: मैत्रिणीसोबत जाणाऱ्या मुलीचं अपहरण, शेतात ओढत नेऊन सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT