Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update Saam TV Marahi News
महाराष्ट्र

Maharashtra Nagar Palika Election Result Live: मुंबईत बेस्ट बस वाहकास बांबूने मारहाण

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update city wise : राज्यातील 246 नगरपरिषदा (Municipal Councils), 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची (Nagar Panchayat Election Result 2025) मतमोजणी आज होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात होई. तुमच्या शहरात कुणाची सत्ता येणार? कोण नगराध्यक्ष होणार? याबाबतचे अपडेट जाणून घ्या..

Namdeo Kumbhar

मुंबईत बेस्ट बस वाहकास बांबूने मारहाण

पवई आय आय टी बस थांब्यावर बेस्ट बस वाहकास बांबूने मारहाण

मारहाण करून अज्ञात इसम फरार, वाहक गंभीर जखमी,

पोलिस घटनास्थळी दाखल

वाहन चालक अर्जुन लाड यांना ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल

अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत महाराष्ट्र पोलिसांचा सुवर्ण विजय

रेल्वे संरक्षण दलातर्फे आयोजित २६ वी अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धा २०२५ सिकंदराबाद येथे पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस ब्रास बँड संघाने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम पारितोषिक व सुवर्णपदक पटकावले. याचबरोबर महाराष्ट्र पोलीस ब्युगलर संघानेही प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक जिंकले. दोन्ही संघांच्या या यशामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे.

भंडारा, साकोली नगरपालिकेवर भाजपचा नगराध्यक्ष

भंडारा जिल्ह्यातील चार नगरपालिका भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोलीचा निकाल आज घोषित झाला. भंडारा आणि साकोली नगरपालिकेवर भाजपाने नगराध्यक्षपदासह एकहाती सत्ता मिळवली. तर पवनी आणि तुमसर मध्ये ही सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत भाजपा हा भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आज समोर आला.

अंजनगाव सुर्जी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पराभव, काँग्रेसचा निवडणुकीवर आक्षेप

अंजनगाव सुर्जी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्याने काँग्रेसचा निवडणुकीवर आक्षेप

नगराध्यक्ष पदाची फेर मतमोजणी नाकारल्याने काँग्रेस पक्ष न्यायालयात जाणार

निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाला कोर्टात काँग्रेस देणार आव्हान

नांदगावात शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला

नांदगाव व मनमाड नगरपरिषदेवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकवल्यानंतर आ.सुहास कांदे यांच्या देवाज निवासस्थानी जल्लोष करण्यात आला..यावेळी आ.सुहास कांदे यांनी विजयी उमेदवारांचे स्वागत सत्कार केला.

नांदगाव व मनमाड नगरपरिषदेवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला, आमदार कांदेंकडून विजयी उमेदवारांचा सत्कार

नांदगाव व मनमाड नगरपरिषदेवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकवल्यानंतर आ.सुहास कांदे यांच्या देवाज निवासस्थानी जल्लोष करण्यात आला..यावेळी आ.सुहास कांदे यांनी विजयी उमेदवारांचे स्वागत सत्कार केले.. नांदगाव मतदार संघाचा विकास हेच उद्देश घेऊन निवडणूक लढलो, आणि मनमाड, नांदगाव नगरपरिषदेवर भगवा फडकवला.

शिंदे, अजित पवार यांचे अभिनंदन, तीन्ही पक्षाची जबरदस्त कामगिरी: मुख्यमंत्री

हाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. माझ्या महायुतीला प्रचंड मोठा समर्थन दिलेले आहे.

यापूर्वीच भाकीत केलं होतं, 75 टक्के माहितीचे निवडून येईल तसा पद्धतीचा कौल दिलेला आहे.

भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचा आज निकालावरून पुढे आला आहे.

129 नगराध्यक्ष भाजपचे आहे

तिघांचे मिळून 75 टक्के नगराध्यक्ष आहे.

नगरसेवक म्हणून नवीन रेकॉर्ड केला आहे.

3325 नगरसेवक निवडणून आलेलं आहे

साडेतीन वर्षांच्या कामाचे फळ शिवसेनेला मिळालं: संजय शिरसाट

शिवसेनेने साडेतीन वर्षाचा कामाचे हे फळ अहे आहे

कार्यकर्त्यांसाठी ते प्रत्येक ठिकाणी फिरत होते

जेवढ्या योजना आहेत त्या सक्षमपणे राबवण्याचे काम आम्ही केलें

आम्ही कधीच एक नंबर वर दावा केला नव्हता आम्ही महाराष्ट्रात दोन नंबर वर राहू, हे मी पहिल्यापासून सांगत होतो

स्ट्राइक रेट जर पाहिला तर सर्वात चांगला स्ट्राईक रेट आमचा आहे

पूर्ण महाविकास आघाडी मिळून जेवढ्या जागा आल्या नाहीत त्यापेक्षा पुढे एकनाथ शिंदे साहेब राहिले आहेत.

दीपक केसरकर यांच्या कार्यालया समोर भाजपचा जल्लोष. पोलिसांनी संघर्ष टाळला

सावंतवाडी मध्ये दीपक केसरकर यांना भाजपने धक्का दिला आहे. या विजयानंतर भाजपने मोठा जल्लोष केला. दीपक केसरकर यांच्या कार्यालया समोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी डीजे लावून जल्लोष केला. भाजपचे प्रचार प्रमुख विशाल परब यांना खांद्यावर घेऊन भाजपचे कार्यकर्ते अक्षरशः नाचत होते. यावेळी पोलिसांनी कोणताही संघर्ष होणार नाही याची काळजी घेतली.

नागपूर जिल्ह्यातील कामठी नगरपरिषदेत इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा विजय

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातील भाजपचे कामठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय अग्रवाल विजयी

- अटीतटीच्या लढतीत कामठीत भाजपचे अजय अग्रवाल यांचा विजय

अमरावती जिल्ह्यात काँग्रेसचा मोठा विजय; जनतेने भाजपला नाकारले

अमरावती जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल काँग्रेससाठी मोठा राजकीय विजय ठरले असून, जनतेने भाजपचे दावे फोल ठरवले आहेत, अशी प्रतिक्रिया अमरावती जिल्ह्याचे खासदार व काँग्रेस नेते बळवंत वानखडे यांनी दिली आहे.

बदलापुरात कमळ फुललं, शिंदेसेनेला धक्का

बदलापुरात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसलाय. याठिकाणी भाजपच्या रुचिता घोरपडे 7 हजार 634 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या वीणा म्हात्रे यांचा पराभव केलाय. बदलापुरात शिवसेना आणि भाजपात जोरदार चुरस होती. मात्र मतमोजणीवेळी सुरुवातीपासूनच भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखत भाजपने एकहाती विजयश्री खेचून आणली.

रुचिता घोरपडे यांना 64 हजार 604 मतं मिळाली तर मीना म्हात्रे यांना 56 हजार 970 मतं मिळाली. नगराध्यक्षपदाच्या विजयासह भाजपने 23 जागा जिंकल्या आहेत तर शिवसेना 23 जागांवर विजयी झाली आहे. राष्ट्रवादीने तीन जागा मिळवल्या आहेत. बदलापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र भाजपच्या विजयाने हा बालेकिल्ला उध्वस्त झालाय.

पैठणमध्ये दोन पराभूत उमेदवारांमध्ये वाद; दोन्ही उमेदवारांच्या गटाकडून दगडफेक

पैठण मध्येदोन पराभूत उमेदवारांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे या वादानंतर दोन्ही उमेदवारांच्या गटाकडून दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये पाच जण जखमी झालेत. दोन्ही उमेदवार एकमेकांना पराभूत करण्यात जबाबदार असल्याचा वाद विकोपाला गेला आणि त्यांचे गट एकमेकांसमोर भिडले.

वर्धा नगरपालिकेत भाजपाला मोठा धक्का

वर्धा नगरपालिकेत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर पांगुळ विजयी झाले आहेत. पालकमंत्री पंकज भोयर यांना मोठा धक्का बसला आहे. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या जवळचे मानले जाणारे भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निलेश कीटे पराभूत झाले आहेत.

खोपोली नगरपरिषदेवर असणारी राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडीत

25 वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली खोपोली नगरपरिषद अखेर यावेळी शिवसेना शिंदे गटाने बहुमताने जिंकली. नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे कुलदीपक शेंडे निवडून आले. तर 31 नगरसेवकांपैकी 14 शिवसेना शिंदे गट, 4 भाजप, असे 18 नगरसेवक निवडून आलेत. राष्ट्रवादी 7 , शेकापक्ष 4, राष्ट्रवादी शरदपवार गट 1 व अपक्ष 1 असे नगरसेवक निवडून आले आहेत.

वाशिमच्या कारंजा नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदावर एमआयएमचा झेंडा

कारंजा नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदावर एमआयएमचा झेंडा फडकला आहे. यावेळी फरीदा बानो महमद शफी पुंजानी 110 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विरोधातील भाजपच्या निशा रुणवाल गुलेच्छा यांचा पराभव झालाय. भाजपच्या आमदार सई डहाके यांना मोठा धक्का बसला आहे.

यवतमाळच्या पुसद पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅड.मोहिनी इंद्रनील नाईक विजयी

अतीतटीच्या लढतीत अॅड मोहिनी नाईक ह्या 645 मताने काॅग्रेस डाॅक्टर मोहम्मद नदीम यांचा पराभव केला आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक ह्यांच्या पत्नी अॅड.मोहिनी नाईक पुसद पालिकेत विजयी ठरल्या आहेत.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात पाय ठेवू नये- आमदार उत्तम जानकर यांचा इशारा

सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाय ठेवू नये असाच संदेश इथल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालाने दिला आहे. अशी टीका आमदार उत्तम जानकर यांनी केली आहे. भाजप सध्या पक्षाचे जेल झाले आहे. त्यामुळे तिकडे जाण्याची अनेकांना घाई झाली आहे, असंही ते म्हणालेत.

नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपालिकेत भाजपाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांच्यासह परिवारातील सर्व सहा उमेदवारांचा पराभव

लोहा नगरपालिका भाजपाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांच्यासह परिवारातील सर्व सहा उमेदवारांचा पराभव झाला आहे.

कोपरगाव नगरपालिकेत भाजपाचे पराग संधान नगराध्यक्ष पदी विजयी

भाजपाचे पराग संधान नगराध्यक्ष पदी विजयी झालेत. राष्ट्रवादी AP गटाच्या उमेदवाराचा अवघ्या 399 मतांनी पराभव झाला आहे. अटीतटीच्या लढतीत भाजपाचा विजय झाला आहे.

नंदुरबारच्या शहादा नगरपरिषदेत भाजपला धक्का; नगराध्यक्षपदी जनता विकास आघाडीचे अभिजीत पाटील विजयी

शहादा नगरपरिषदेत भाजपला धक्का बसला आहे. स्थानिक उमेदवार भाजपचा असूनही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी नगराध्यक्षपदी जनता विकास आघाडीचे अभिजीत पाटील 1041 मतांनी विजयी झालेत. तर भाजप उमेदवार मकरंद पाटील यांचा 1041 मतांनी पराभव झाला आहे.

अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ठाकरे गटाच्या प्राप्ती मारोटकर विजयी

अमरावती जिल्ह्यात ठाकरे गटाने खातं उघडलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या प्राप्ती मारोटकर यांचा विजय झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून मोठा जल्लोष करण्यात आला आहे.

पांढरकवडा नागरपालिकेत भाजपचे आतिष बोरले नगराध्यक्षपदी 213 मतांनी विजयी

पांढरकवडा नागरपालिकेमध्ये भाजपचे आतिष बोरले नगराध्यक्षपदी 213 मतांनी विजयी झाला आहे.

अकलूज नगरपरिषदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे २२ उमेदवार विजयी

अकलूज नगरपरिषदेत एकूण 13 प्रभाग, 26 उमेदवार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे २२ उमेदवार विजयी झालेत. तर भाजपचे ४ उमेदवार भाजपचे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नगराध्यक्ष उमेदवार सौ.रेश्मा आडगळे २७९३ मतांनी विजयी झाल्या असून भाजपाच्या सौ.पूजा कोथमीरे यांना पराभव स्विकारावा लागलाय.

धामणगाव रेल्वे नगरपरिषदेमधून भाजपच्या उमेदवार अर्चना रोठे विजयी

धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रताप अडसड अर्चना रोठे यांचा विजय झाला आहे. भाजपाचे 20 पैकी 20 उमेदवार विजयी झाले असून हा भाजपाचा ऐतिहासिक विजय आहे. तर काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. यावेळी साम टीव्हीने दाखवलेला एक्झिट पोल खरा ठरलाय.

Nanded Nagarpalika Voting Counting live: नांदेडमध्ये मुदखेड नगराध्यक्षपदी भाजपच्या विश्रांती कदम विजयी

मुदखेड नगराध्यक्षपदी भाजपच्या विश्रांती कदम विजयी

माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण आणि चव्हाण यांच्या कन्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी गड राखला.भोकर आणि मुदखेड नगराध्यक्षपदी भाजपचे नगराध्यक्ष

बुटीबोरी नगरपरिषद निवडणुकीत समित शंकर मेंढे यांची नगराध्यक्ष पदी निवड

बुटीबोरी नगरपरिषद निवडणुक निकाल जाहीर...

समित शंकर मेंढे नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार (गोंडवाना गणतंत्र पक्ष)

सोलापूरच्या मोहोळ नगरपरिषदेत शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे विजयी

- मोहोळ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी

- मोहोळ मध्ये विजयानंतर शिवसेना शिंदे गटाकडून जल्लोष करण्यात आलाय

Rahuri Nagarpalika: राहुरी नगरपालिकेवर तनपूरेंची सत्ता...

माजी आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या शहर विकास आघाडीचा विजय...

नगराध्यक्षपदी बाबासाहेब मोरे बहुमताने विजयी..

तनपूरेंनी आपला गड राखला...

24 पैकी 17 जागेवर तनपूरेंचे उमेदवार विजयी...

7 जागेवर भाजपच्या नगरसेवकांचा विजय...

हिवरखेड भाजपचे नगराध्यक्षा पदाचे उमेदवार सुलभा दुतोंडे विजयी..

हिवरखेड भाजपचे नगराध्यक्षा पदाचे उमेदवार सुलभा दुतोंडे विजयी.. हिवरखेड नगरपालिकेवर भाजपची सत्ता. भाजपच्या सुलभा दुतोंडे 1241 मतांनी नगराध्यक्षपदी विजयी. शेकडो मतांनी विजयी झाले आहेत.

Amravati: अमरावतीच्या चांदूरमध्ये वंचितच्या प्रियंका विश्वकर्मा विजयी

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपरिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीने उघडले खाते

वंचितच्या प्रियंका विश्वकर्मा विजयी

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची सत्ता

छत्रपती संभाजीनगरमध्ये नगराध्यक्षपदाचे आतापर्यंतचे विजयी उमेदवार

सिल्लोड...

- समीर सत्तार शिंदे यांची शिवसेना सिल्लोड इथून विजयी...

वैजापूर

- दिनेश परदेशी भाजप वैजापूर येथून विजयी.

फुलंब्री.

- ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे विजय.

गंगापूर.

- अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय जाधव विजय.

खुलताबाद.

- काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमीर पटेल विजय.

Paithan: पैठणमध्ये नगराध्यक्षपदी विद्या भूषण कावसानकर विजयी

पैठणची सत्ता राखण्यात खासदार संदिपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांना यश

नगराध्यक्षपदी विद्या भूषण कावसानकर विजयी

Solapur: सोलापूरातील अनगरमध्ये राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील प्रथम नगराध्यक्ष

- अनगर नगरपरिषद अखेर बिनविरोध घोषित

- राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील अनगरच्या प्रथम नगराध्यक्ष

- भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठी चूरस पाहायला मिळाली

- अखेर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिले प्रमाणपत्र

- विरोधकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांनी विश्वास दाखवला.

Parbhani:  गंगाखेड मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार उर्मिला मधुसूदन केंद्रे विजयी

गंगाखेड मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार उर्मिला मधुसूदन केंद्रे विजयी

धनंजय मुंडे यांच्या बहिणी उर्मिला केंद्रे विजयी

धनजंय मुंढे यांनी घेतली होती बहिणी साठी भावुक सभा

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये 11 नगरपरिषद 1 नगरपंचायतीचा निकाल जाहीर

1) राहता - भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.स्वाधीन गाडेकर विजयी

2) देवळाली प्रवरा - भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजीत कदम विजयी

3) नेवासा - शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. करण घुले विजयी

4) शिर्डी - भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री विष्णू थोरात यांची विजयाकडे वाटचाल...

5) कोपरगाव - भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान आघाडीवर

6) संगमनेर - संगमनेर सेवा समिती ( अपक्ष ) नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.मैथिली तांबे यांची विजयाकडे वाटचाल..

7) श्रीरामपूर - काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाणे यांची विजयाकडे वाटचाल...

8) राहुरी - शहर विकास आघाडीचे ( अपक्ष ) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबासाहेब मोरे आघाडीवर

9) श्रीगोंदा- भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता खेतमालीस विजयी...

10) पाथर्डी - भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय आव्हाड विजयी...

11) जामखेड- भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल चिंतामणी यांना निर्णायक आघाडी...

12) शेवगाव- शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माया मुंडे विजयी...

Tuljapur Nagar palika vote counting LIVE: : तुळजापुरात भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिटु गंगणे 1770 मतांनी विजयी

तुळजापुरात भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिटु गंगणे 1770 मतांनी विजयी

तुळजापुर नगरपरिषदेत भाजपाचे 18 नगरसेवक विजयी तर महाविकास आघाडीचे 5 नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी

तुळजापुर ड्रग्स तस्करी प्रकरणामुळे तुळजापुर नगरपरिषदेची निवडणूक होती राज्यभर चर्चेत

महाविकास आघाडी विरूध्द भाजप अशी थेट होती लढत

भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील व ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रतिष्ठा होती पणाला

रत्नागिरी नगरपरिषदेचा निकाल जाहीर

रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगरपरिषदेवर शिवसेनेचा तर दोन नगरपंचायतीवर भाजप आणि एका नगरपरिषदेवर काॅग्रेसचा नगराध्यक्ष विजयी

रत्नागिरी नगर परिषद शिल्पा सुर्वे शिवसेना( विजयी)

चिपळूण नगरपरिषद शिवसेना उमेश सकपाळ (विजयी)

खेड नगरपरिषद माधवी बुटाला शिवसेना (विजयी)

राजापूर नगरपरिषद काँग्रेसच्या हुस्नबानू खलिपे ( विजयी)

लांजा नगरपंचायत शिवसेना सावली कुरुप ( विजयी)

देवरुख नगरपंचायत भाजपा मृणाल शेट्ये ( विजयी)

गुहागर नगरपंचायत भाजप निता मालप ( विजयी)

पालघरमधील जव्हार वाडा येथे नगरपरिषद व नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा

पालघर जिल्ह्यातील जव्हार नगरपरिषद असो की वाडा नगरपंचायत या दोन्ही ठिकाणी भाजपने बाजी मारली असून या दोन्ही ठिकाणी आतापर्यंत शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांची आलटून पालटून सत्ता येत होती मात्र भाजपने स्वतंत्र निवडणूक लढविली व एक हाती सत्ता घेतली.

जव्हार नगरपरिषद मध्ये भाजपची

पूजा कुणाल उदावंत तर वाडा नगरपंचायती मध्ये भाजपची रिमा हर्षद गंधे या विजयी झाल्या आहेत.

Pune Nagar palika vote counting LIVE: उत्तर पुणे जिल्ह्यात अजित पवारांना धक्का; जुन्नर, राजगुरुनगर, चाकणमध्ये शिंदेसेनेचं वर्चस्व

उत्तर पुणे जिल्ह्यात अजित पवारांना धक्का..

जुन्नर, राजगुरुनगर, चाकण मध्ये शिंदेच्या शिवसेनेचा विजय

राजगुरुनगरमध्ये मंगेश गुंडाळ

जुन्नर मध्ये सुजाता काजळे

चाकणमध्ये मनिषा गोरे विजयी

अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने गड केला काबीज.

BJP: भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार राजन गिरप विजयी

सावंतवाडी व वेंगुर्ला दोन्ही नगरपालिकेत भाजपचा विजय

माजी मंत्री व सावंतवाडी वेंगुर्ला मतदारसंघाचे आमदार दिपक केसरकर यांना मोठा धक्का..

सिन्नरमध्ये भाजपला धक्का; अजित पवार गटाचे उमेदवार विठ्ठल उगले आघाडीवर

- सिन्नरमध्ये भाजपला मोठा धक्का

- सिन्नर निवडणुकीत तिसऱ्या फेरी अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विठ्ठल उगले ४ हजार २४० मतांनी आघाडीवर

- माणिकराव कोकाटे समर्थकाची विजयाच्या दिशेने वाटचाल

दूधनी नगरपरिषदेत शिंदे गटाचे १४ नगरसेवक विजयी

दूधनी नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाची आघाडी

आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार शिंदे गटाचे १४ नगरसेवक विजयी

तर शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रथमेश म्हेत्रे हे 2 हजार मताने आघाडीवर

Umarga Nagar palika vote counting LIVE: उमरगा नगरपरिषदेत शिंदे गटाचे किरण गायकवाड विजयी

उमरगा नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण गायकवाड हे 6242 मतांनी विजयी

कार्यकर्त्यांनी सुरू केला जल्लोष

Vaijapur Nagar palika vote counting LIVE: वैजापूर नगरपरिषदेमधून भाजपाचे उमेदवार दिनेश परदेशी विजयी

वैजापूर मध्ये शिंदे सेनेला मोठा धक्का

वैजापूर नगरपरिषदेमधून भाजपाचे उमेदवार दिनेश परदेशी विजयी

स्थानिक आमदार रमेश बोरणारे यांना झटका

Tasgaon Nagar palika vote counting LIVE: तासगाव नगरपरिषद निवडणुकीत आमदार रोहित पाटलांना धक्का

तासगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटलांना धक्का

माजी खासदार संजय काका पाटलांच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे नगराध्यक्ष विजयी

विजया सावंत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 412 मतांनी झाल्या विजयी

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार वंदना सावंत यांचा केला पराभव

Indapur: इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 उमेदवार विजयी.....

कृष्णा भीमा विकास आघाडीचे पाच उमेदवार विजयी.....

इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे भरत शहा विजयी.....

इंदापुरात प्रदीप गारटकारांचा पराभव

इंदापुरात माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपचे नेते प्रवीण माने यांना धक्का......

भोरमध्ये राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष! रामचंद्र आवारे 170 मतांनी विजयी

भोर नगरपंचायतीचा निकाल जाहीर

नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे रामचंद्र आवारे 170 मतांनी विजयी

शिरूर नगरपरिषदेत अजित पवार गटाच्या ऐश्वर्या पाचर्णे विजयी

शिरूर नगरपरिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐश्वर्या पाचर्णे विजयी भाजप सह महाविकास आघाडीला जोरदार धक्का...

भाजप-11

राष्ट्रवादी AP -5

महाविकास आघाडी-7

अपक्ष- 1

Amravati: धामणगावमध्ये रेल्वे नगरपरिषदेमधून भाजपच्या उमेदवार अर्चना रोठे विजयी

धामणगाव रेल्वे नगरपरिषदेमधून भाजपच्या उमेदवार अर्चना रोठे विजयी

धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रताप अडसड अर्चना रोठे विजय

भाजपाचे 20 पैकी 20 उमेदवार विजयी भाजपाचा ऐतिहासिक विजय तर काँग्रेसचा सुपडा साप

नांदेडच्या लोहामध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राखला गड

नांदेडच्या लोहा मध्ये नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शरद पवार विजयी.

राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राखला गड

बुलढाण्यात शरद पवार गटाचे सौरभ तायडे विजयी

सिंदखेडराजा नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट, सौरभ तायडे विजयी..

Satara Election Live: साताऱ्यात ४ शहरांचा नगराध्यक्ष ठरला; भाजपचे सर्व उमेदवार विजयी

वाई नगराध्यक्षपदाचे भाजप उमेदवार अनिल सावंत विजयी..

रहिमतपूर नगरपालिका नगराध्यक्ष भाजप वैशाली निलेश माने विजयी

मलकापूर नगरपालिका मधील भाजप नगराध्यक्ष उमेदवार तेजस सोनवले विजयी...

मेढा नगरपंचायत भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रूपाली वरखडे विजयी

Nanded: नांदेडच्या कंधार मध्ये नगराध्यक्षपदी शहाजी नळगे विजयी

नांदेडच्या कंधार मध्ये नगराध्यक्षपदी शहाजी नळगे विजयी.

राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना धक्का

सोलापूरमध्ये मोहोळ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी

मोहोळ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी

पिंपळगाव नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा…..

नगराध्यक्ष पदासह १८ जागांवर भाजप आणि शिंदे गटाचा विजय

राष्ट्रवादी ( AP ) च्या घड्याळाला अवघ्या ७ जागा…

राष्ट्रवादीच्या आमदार बनकराना होमपिचवर मोठा धक्का

Nanded Nagar palika election result LIVE : नांदेडमध्ये भाजप आमदाराला धक्का, शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्ष

Chiplun Nagar Palika election result live : शरद पवार गटाच्या माजी आमदाराचा पालिका निवडणुकीत पराभव

रत्नागिरीतील चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेश सकपाळ यांचा विजय झाला आहे. तर शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम हे पराभूत झाले आहेत.

Amaravati Nagar palika election result LIVE : अमरावतीच्या चिखलदरामध्ये भाजपला मोठा धक्का, नगराध्यक्षपदी काँग्रेसचा उमेदवार विजयी

Rahata Nagar Parishad vote counting LIVE : अहिल्यानगरमधील राहातामध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. स्वाधीन गाडेकर यांचा विजय

Yavatmal Nagar palika vote counting LIVE : ढाणकी नगर पंचायतमध्ये भाजप 5, शिंदे सेना 5, एमआयएमचे २ उमेदवार विजयी

Hingoli Nagar palika election result LIVE: हिंगोलीत भाजपचे ५, राष्ट्रवादीचे ६ उमेदवार विजयी

हिंगोलीमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, भाजपचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेचा एक तर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून, सहा उमेदवार विजयी झाले आहेत.

Shirdi Nagar palika election result LIVE: शिर्डीत महायुतीचे ४ आणि अपक्ष २ उमेदवार विजयी

Nagar palika election result LIVE : नांदेडच्या धर्माबादमध्ये मराठवाडा जनहित पार्टीचे ६ उमेदवार विजयी

Medha Nagar Panchayat election result LIVE : मेढाच्या नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवार रूपाली वारागडे विजयी

Guhagar Nagar palika election result LIVE : रत्नागिरीतील गुहागरमध्ये मनसेची एन्ट्री, उमेदवार कोमल जांगळी विजयी

Beed Nagar palika election result LIVE: बीडच्या गेवराई नगरपरिषदेत भाजपचे ६ उमेदवार विजयी

Latur Nagar palika election result LIVE : लातूरच्या उदगीरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४ उमेदवार विजयी

Chandrapur Nagar palika election result LIVE : चंद्रपुरातील भिसी नगरपंचायतीत ४ जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय

Beed Nagar palika election result LIVE : बीडमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्मिता वाघमारेंच्या पतीचा पराभव

बीडमध्ये धक्कादायक निकाल लागला आहे. बीड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्मिता वाघमारे यांचे पती आणि नगरसेवकपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.

Beed Nagar palika election result LIVE : बीडच्या गेवराई नगरपालिका निवडणुकीत पहिल्या फेरीत भाजप आघाडीवर, २ उमेदवारांचा विजय

Sindhudurg Nagar Parishad vote counting : मालवणमध्ये भाजपचे दोन उमेदवार विजयी

Barshi Nagar palika election result LIVE : ठाकरेंच्या शिवसेनेनं खातं उघडलं, बार्शीत एकाच प्रभागातील २ उमेदवार विजयी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पालिका निवडणुकीत खातं उघडलं. बार्शीत प्रभाग एकमधील दोन्ही नगरसेवक विजयी झाले आहेत.

Kankavli Nagar palika election result LIVE : कणकवलीत भाजपचे ४ उमेदवार विजयी

सिंधुदुर्गमधील कणकवलीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या भाजपचे ४ उमेदवार विजयी झाल्याची माहिती आहे.

Dhamangaon Muncipal Council Result : धामणगावमध्ये भाजपचे ६ उमेदवार विजयी 

पालिका निवडणुकांचे निकाल लागायला सुरुवात झाली आहे. भाजपने सुरुवातीलाच खातं उघडलं आहे. धामणगावमध्ये भाजपचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत.

Solapur Election News : सोलापूरमधील बार्शीमध्ये भाजपचे ४ उमेदवार आघाडीवर, २ जणांचा विजय

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी नगरपरिषदेत मतमोजणीला सुरूवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणी भाजपाचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत.

प्रभाग एक मधील भाजपचे उमेदवार कांताबाई मोहिते, संतोष पाटील तर प्रभाग दोन मधील भाजपचेच उमेदवार अरुरथ वाणी आणि सुनीता ढोणे विजयी. पहिल्या दोन प्रभागात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजस्विनी कथले यांना आघाडी

Akola Latest News : अकोला जिल्हा नगरपालिका निकाल, टपाली मतदानाला सुरुवात

अकोला जिल्ह्यातील मतमोजणी होत असलेल्या

नगरपालिका : अकोट, तेल्हारा, हिवरखेड, बाळापुर आणि मुर्तीजापुर

नगरपंचायत : बार्शीटाकळी

नगरसेवक पदाच्या एकूण जागा : 142

नगराध्यक्ष पदाच्या एकूण जागा : 06

नगरसेवक पदासाठी रिंगणातील उमेदवार : 707

नगराध्यक्ष पदासाठी रिंगणातील एकूण उमेदवार : 41

Nagar palika Election Results 2025 Live : पहिला कल आला हातात

राज्यात ११७ जागांवरील पहिला कल समोर आलाय. भाजपचे २७, ठाकरेसेना ५, राष्ट्रवादी अजित पवार १५, शहर विकास आघाडीच्या २० जागांवर आघाडी आहेत.

Dharashiv : धाराशिवमध्ये निकालापूर्वी भाजपकडून गुलालाची खरेदी

भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या संपर्क कार्यालयात गुलालाच्या गोण्या ठेवण्यात आल्या. गणेश उत्सवाच्या काळात ओमराजे निंबाळकर यांना उद्देशून वापरलेलं गाणं वापरत मल्हार पाटील फॅन क्लब पेजवरून गुलाल पोत्याचे व्हिडिओ पोस्ट

धाराशिव नगर परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भारतीय जनता पार्टी आमने-सामने

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचाही स्वतंत्र उमेदवार त्यामुळे तिरंगी लढत

धाराशिव नगरपरिषदेसाठी खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

Beed Election : बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी  

बीड जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांच्या निवडणुकीची आज मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे..यात बीड, गेवराई, माजलगाव, धारूर, परळी, आंबेजोगाई या सहा नगरपरिषदांसाठी 168 नगरसेवक व सहा नगराध्यक्ष पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे... जिल्ह्यात मोठा पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.. सकाळी दहा वाजता या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.. या संपूर्ण परिस्थितीकडे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कांवत हे लक्ष ठेवून आहे.. दुपारपर्यंत कोणत्या नगर परिषदेवर कोणाचा झेंडा असणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.

तळेगावमध्ये २७ पैकी १९ नगरसेवक बिनविरोध, थोड्याच वेळात मतमोजणीला सुरावात

तळेगाव नगरपरिषद मध्ये 27 नगरसेवकांसाठी निवडणूक घेण्यात येणार होती मात्र 19 नगरसेवक बिनविरोध झाले त्यामुळे आठ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यांचा जागांसाठी मत मोजणी मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये पार पडणार आहे, सकाळी 10 वाजता या मतमोजणी ला सुरुवात होणार असून 14 टेबलवर ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी, 2 नोडल अधिकारी, 14 विभागीय अधिकारी, 28 मतमोजणी सहाय्यक असून मदतीसाठी नगरपरिषदेचे 60 कर्मचारी सुद्धा असणार आहे, या संपूर्ण मतमोजणी वरती सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असून कुठलाही अनुचित प्रकार घडून यासाठी चौख पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान ज्या ठिकाणी ही मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.. दरम्यान भाजपचे संतोष दाभाडे आणि अपक्ष किशोर भेगडे यांच्या मुख्य लढत होणार असून मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले..

थोड्याच वेळात मतमोजणी, पुण्यात जमावबंदी लागू...!

उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, मंचर, शिरूर, राजगुरुनगर आणि चाकण या नगरपरिषदांच्या निवडणुकीचे निकालाच्या आनंदाला कायद्याचे निर्बंध लागु करण्यात आलेत

निकालाची उत्सुकता सर्वच स्तरांवर शिगेला पोहोचली असून, समर्थकांमध्ये विजयाचा आनंद साजरा करण्याची लगबग सुरू आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे विजयाचा आनंद साजरा करता येईल, पण जल्लोषाला मात्र निर्बंध घालण्यात आले आहेत.

Local Body Election : मतमोजणीआधीच भाजपचा जल्लोष अन् घोषणाबाजी

अक्कलकोटमध्ये मतमोजणी सुरू होण्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला सुरुवात

फटक्यांची आतिषबाजी करत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष

मतमोजणी सुरु होण्याआधीच अक्कलकोटमध्ये झळकले अभिनंदनाचे बॅनर

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी यांच्या अभिनंदनाचे बॅनर अक्कलकोट शहरात झळकले

अक्कलकोटमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट विरुद्ध काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे

ज्यामध्ये भाजपतर्फे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी, काँग्रेसतर्फे अशपाक बळोरगी, शिवसेना शिंदे गटातर्फे रईस टिनवाला हे उमेदवार आहेत

भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा इतका आत्मविश्वास आहे की मतमोजणी सुरु होण्याआधीच मिलन कल्याणशेट्टी यांचे नगराध्यक्ष म्हणून अभिनंदनाचे बॅनर शहरभर लावण्यात आलेत

Baramati Election result : बारामतीत काही वेळात होणार मतमोजणीला सुरुवात, कोण बाजी मारणार?

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती नगर परिषदेची निवडणूक काल पार पडली. या नगर परिषदेची मतमोजणी आज होत असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने इतर पक्षांना सोबत घेत पॅनल उभा केला आहे, भाजपाने देखील आपला स्वतंत्र पॅनल पवार यांच्या विरोधात उभा केला आहे, तर शिवसेना एकनाथ शिंदे गट बहुजन समाज पक्ष यांनी आपला पॅनल उभा केला आहे. बारामतीत अजित पवार गटाला आठ जागा आतापर्यंत बिनविरोध निवडून आले आहेत 33 जागांसाठी आणि एक नगराध्यक्ष पद याकरिता आज मतमोजणी होत आहे मतदान केंद्रावरून आढावा घेतला आहे

bhandara : भंडाऱ्यात 622 नगरसेवक उमेदवार तर 35 नगराध्यक्षांच्या उमेदवाराचा फैसला आज

भंडारा जिल्ह्यात चारही ठिकाणच्या नगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होत आहे. भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली-सेंदूरवाफा या चार ठिकाणी होत असलेल्या मतमोजणीसाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. सुमारे ५०० वर अधिकारी कर्मचारी आणि जवळपास तेवढाच पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त मतमोजणी केंद्रावर राहणार आहे.सकाळी दहा वाजता पोस्टल बॅलेटने मतमोजणी सुरू होऊन नंतर ईव्हीएम उघडले जातील. अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला निकाल सकाळी १०:३० वाजता जाहीर होण्याची शक्यता आहे, तर शेवटचा निकाल दुपारी १:३० ते २ वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

Ambarnath Election Result : अंबरनाथ पालिका निवडणूक : आज मतमोजणी, नगराध्यक्ष पदाची चुरशीची लढत

अंबरनाथ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत 208 बोगस मतदार, हाणामारी व राडा अशा घटनांमुळे राज्यभरात मोठी चर्चा झाली. 29 प्रभागांमधील 59 उमेदवारांचे भवितव्य या निवडणुकीत बंदिस्त झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या मनीषाताई वाळेकर आणि भाजपच्या तेजश्री करंजुले यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. आज सकाळी 10 वाजता अंबरनाथमधील महात्मा गांधी शाळेत मतमोजणी सुरू होणार असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Latur local body Election : लातूर जिल्ह्यातील चार नगरपालिका आणि एक नगरपंचायतीच्या मतमोजणी

लातूर जिल्ह्यातील 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मतमोजणीला काही वेळात सुरुवात होणार आहे, जिल्ह्यातील औसा निलंगा ,अहमदपूर, उदगीर , या नगरपालिकासह रेणापूर नगरपंचायत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, हे सगळ निकालाच चित्र दुपार पर्यंत स्पष्ट होईल, मतमोजणी केंद्रांवर सुरक्षेच्या कारणाने पोलिसांनी देखील दगड बंदोबस्त लावला आहे

palghar Election Result : पालघर जिल्ह्यात तीन नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतीसाठी आत होणार मतमोजणी

मतमोजणीला सकाळी 10 वाजेपासून होणार सुरुवात

•पालघर, डहाणू ,जव्हार या तीन नगरपरिषदा तर वाडा या एका नगरपंचायतीवर कोण फडकवणारा झेंडा याकडे सर्वांचे लक्ष

•चार नगराध्यक्ष पदासाठी 17 उमेदवार तर 94 नगरसेवक पदासाठी 316 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.

•भाजपची जिल्ह्यात मित्र पक्षांसह विरोधकांशी असणार थेट लढत.

•जिल्ह्यातील मत मोजणी केंद्र बाहेर पोलिसांचा असणार चौक बंदोबस्त

Pune Local Body Election result : उत्तर पुणे जिल्ह्यातील सहा नगरपरिषदेच्या निवडणूकीची मतमोजणी आज होणार

जुन्नर शिरुर मंचर राजगुरुनगर चाकण नगरपरिषदेच्या निवडणूकीत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती या नगरपरिषदेतील विजय हा फक्त नगराध्यक्षपदापुरता मर्यादित नसुन आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठीचा पाया असणार आहे त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागुन राहिलं असताना हि निवडणूक चुरशीची ठरली असुन उत्तर पुणे जिल्ह्यात शिरुर वघळता चारही ठिकाणी महायुतीची एकमेकांविरोधात लढत होती त्यातच राज्यातल्या दिग्गज नेत्यांनी सभा घेऊन चुरशी लढत केली होती त्यामुळे निकालाचा कल कोणाच्या बाजुने झुकतोय याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे

nashik nagar parishad result Live :  नाशिक जिल्ह्यातील 14 नगर परिषदांसाठी आज मतमोजणी

नाशिकच्या जिल्ह्यातील 14 नगर परिषदांसाठी आज मतमोजणी होत असून जिल्ह्यात सर्वात मोठी व चर्चेत राहिलेल्या नगर परिषद असलेल्या मनमाड नगर परिषदेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.मतमोजणीच्या निमित्ताने प्रशासनाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे.सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरवात करण्यात येणार आहे.निवडणुकीच्या निमित्ताने येवल्यात मंत्री छगन भुजबळ , तर मनमाड, नांदगाव आमदार सुहास कांदे यांच्यासह अनेक दिग्गज उमेदवाराच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहे.

Maharashtra Local Body Election Results 2025 Live :  मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील ५२ नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ५२ नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज लागणार असून, विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ते स्पष्ट होईल. मराठवाड्यात ५२ नगराध्यक्ष आणि १,२४६ सदस्यांची निवड होणार आहे. अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या या निवडणुकीत कोणत्या पक्षाकडे सर्वाधिक नगराध्यक्षपदे आणि नगरपालिका राहणार याकडेही लक्ष असणार आहे. १० वाजता उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक १३ नगरपालिकांत मतमोजणी होणार असून, या ठिकाणी १३ नगराध्यक्षांसह २६९ नगरसेवक निवडून येणार आहेत. यंदा नगर परिषदेच्या निवडणुकीतही विविध पक्षांत मोठी चुरस दिसली. त्यामुळे स्थानिक पातळीवरील विविध पक्षांतील आमदार आणि खासदारांच्या नेतृत्वाची कसोटीही लागली होती.

Maharashtra Local Body Election Results 2025 Live : या नगर परिषद / नगरपंचायतींची होणार मतमोजणी :

छत्रपती संभाजीनगर (७): फुलंब्री (न.पं.), गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड, वैजापूर

जालना (३) : अंबड, भोकरदन, परतूर

नांदेड (१३) : बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर (न.पं.), कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट, लोहा

परभणी (७) : गंगाखेड, जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा, सेलू, सोनपेठ

बीड (६) : अंबेजोगाई, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, परळी-वैजनाथ

लातूर (५) : अहमदपूर, औसा, निलंगा, रेणापूर (न.पं.), उदगीर

हिंगोली (३) : हिंगोली, वसमत, कळमनुरी

धाराशिव (८) : भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, धाराशिव, परंडा, तुळजापूर, उमरगा

Maharashtra Local Body Election Results 2025 Live : मराठवाड्यातून किती नगराध्यक्ष, किती नगरसेवक निवडून येणार?

छत्रपती संभाजीनगर :

नगराध्यक्ष :७

नगरसेवक : १६०

जालना :

नगराध्यक्ष : ३

नगरसेवक : ६५

बीड :

नगराध्यक्ष :६

नगरसेवक : १८६

परभणी :

नगराध्यक्ष : ७

नगरसेवक : १६५

हिंगोली :

नगराध्यक्ष : ३

नगरसेवक : ८४

नांदेड :

नगराध्यक्ष: १३

नगरसेवक : २६९

लातूर :

नगराध्यक्ष : ५

नगरसेवक : १२८

धाराशिव :

नगराध्यक्ष : ८

नगरसेवक : १८९

amrawati local body Election : अमरावती जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 2 नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला 10 वाजता पासून होणार सुरुवात

अमरावती जिल्ह्यातील 155 प्रभागात 278 नगरसेवक निवडल्या जात असून यामध्ये सदस्य पदासाठी 612 स्त्री व 638 पुरुष असे 1 250 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर 12 नगराध्यक्ष पदाकरिता 47 स्त्री व 24 पुरुष असे71 उमेदवारांच्या भवितव्याचा आज लागणार निकाल

या मतमोजणीच्या बंदोबस्तासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला...

नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे खासदार अनिल बोंडे माजी खासदार नवनीत राणा यांनी घेतल्या होत्या प्रचारसभा.तर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर,खासदार बळवंत वानखेडे हे सुद्धा प्रचारात उतरले होते. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सर्व दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे

Local Body Election : रत्नागिरीती नगर परिषद आणि नगर पंचायतींचा आज निकाल

जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या चार प्रमुख नगर परिषदांसह लांजा, देवरुख आणि गुहागर या तीन नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज एकाचवेळी पार पडणार

सात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 68.14 टक्के झालं होतं मतदान

सात नगराध्यक्षपदासाठी 33 तर नगरसेवकपदाच्या 151 जागांसाठी 461 उमेदवार रिंगणात

10 वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी 1 वाजेपर्यंत निकालाचं अंतिम चित्र स्पष्ट होणार

कमी मतदान आणि कमी फेऱ्या असलेल्या गुहागर आणि राजापूरचा निकाल लवकर जाहीर होणार

थेट नगराध्यक्ष निवडींमुळे रोमांचक चित्र.. जोरदार राजकीय चुरस

मतमोजणीसाठी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त

Beed Election Result : बीड जिल्ह्यातील सहा नगरपरिषदेच्या निवडणुकांची आज मतमोजणी

बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या निवडणुकांची मतमोजणी असून यामध्ये बीड गेवराई माजलगाव धारूर आंबेजोगाई परळी या नगर परिषदेचा निकाल आज लागणार असून यासाठी आता जिल्हा प्रशासन अलर्ट वरती असून दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 400 अंमलदार आरसीबी आरसीएफ पोलिसांचा मोठा फौज फाटा असणार आहे त्याचबरोबर बीड मधील नगर परिषदेमध्ये 13फेऱ्या असून ठीक दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे या संपूर्ण परिस्थितीवर बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन व बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे लक्ष ठेवून असणार आहे

hingoli Local Body Election Results 2025 Live : मोबाईल आढळला तर कडक कारवाई होणार

मतमोजणी प्रक्रिया दरम्यान उमेदवाराच्या प्रतिनिधी जवळ मोबाईल आढळला तर कडक कारवाई होणार

हिंगोली चे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची माहिती

मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात नागरिकांना गर्दी करता येणार नाही

हिंगोलीत निवडणूक निकालानंतर मिरवणुकीला परवानगी नाही

हिंगोलीत कलम 163 लागू असल्याने नागरिकांनी नोंद घ्यावी अन्यथा कारवाई होणार

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update अहिल्यानगर जिल्ह्यात पालिका निवडणुकांच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

अहिल्यानगर जिल्ह्यात 12 पालीकांसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.. जिल्ह्यात विखे, थोरात, काळे, कोल्हे, तनपुरे, गडाख या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.. सकाळी 10 वाजता वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून कुणाच्या अंगावर विजयी गुलाल पडतो याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे..

Beed Election Result : : विजय मिरवणुकीवर बीडमध्ये बंदी, पोलिसांचा मोठा निर्णय

बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या निवडणुकांचा आज निकाल लागत आहे यामध्ये बीड गेवराई परळी आंबेजोगाई धारूर माजलगाव या नगर परिषदेचा निकाल लागत असून निकालापूर्वी बीड पोलिसांनी मोठी पावले उचलत विजयी मिरवणुकीवर बंदी घातली असून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवरती हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे त्याचबरोबर निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळेस पोलिसांचा मोठा फौज फाटा असणार आहे यामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि 400 हून अधिक अंमलदार असणार आहेत. आरसीपी, एस आर पी एफ निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवार किंवा पडलेल्या उमेदवारांनी कुठलाही वाद वाद करू नये शांतता राखावी प्रत्येकाने संयमाने आणि जबाबदारीने वागले पाहिजे नसता पोलीस कार्यवाही करतील अशा सक्त सूचना बीड पोलीस यांनी दिल्या आहेत.

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणी आज होणार

- जिल्ह्यातील अकरा नगराध्यक्ष आणि 269 नगरसेवक सदस्य आज होणार निश्चित.

- पंढरपूर, मैंदर्गी, दुधनी, अक्कलकोट, बार्शी, कुर्डूवाडी करमाळा, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ नगरपरिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष.

- जिल्ह्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.

- भाजपची जिल्ह्यात मित्र पक्षासह विरोधकांसोबत असणार थेट लढत.

- जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा असणार चोख बंदोबस्त

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update वसमत मध्ये मतमोजणी तयारी पूर्ण,15 टेबलवर होणार मतमोजणी

हिंगोलीच्या वसमत नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता मतमोजणीची तयारी देखील पूर्ण करण्यात आली आहे, वसमत शहराच्या जवळ असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्ट्रॉंग रूम उभारण्यात आली असून सकाळी दहा वाजता पंधरा टेबलवर मतमोजणी पार पडणार आहे दरम्यान याचा आढावा घेत निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांच्याशी बातचीत केली आहे

dharashiv Election Result News : धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांसाठी आज मतमोजणी

परंडा येथे शिवसेनेकडून जाकीर सौदागर हे मैदानात आहेत तर त्यांच्या विरोधात स्थानिक आघाडीचे विश्वजीत पाटील हे रिंगणात आहेत, भूम येथे दोन्ही स्थानिक विकास आघाड्यांमध्ये लढत होत आहे. या दोन्ही ठिकाणी राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मोठी ताकद लावली होती, तर त्यांच्या विरोधात अजित पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे, सुजित सिंह ठाकुर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांनी एकत्रित येऊन लढा दिल्याने दोन्ही ठिकाणच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या होत्या.

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update यवतमाळ पालिकेच्या आखाड्यात कोण ठरणार धुरंधर

यवतमाळ नगरपालिकेची मोजणी सकाळी दहा वाजल्यापासून धामणगाव रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सुरू होणार आहे.मतमोजणीच्या 29 फेऱ्या होणार असून या दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update विजयी मिरवणुकीला पोलीसांची परवानगी नाही

यवतमाळ जिल्ह्यातील दहा पालिका आणि एका नगरपंचायत साठी काही वेळात मतमोजणीला सुरूवात होणार आहे.या दरम्यान यवतमाळ,पुसद,दारव्हा,उमरखेड येथे अनुचित प्रकार टाळण्याच्या दृष्टीने पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून विजयी उमेदवारांना मिरवणूकीसाठी पोलीसांकडून परवानगी नाकारण्यात येणार आहे.

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update रायगडात दहा नगर पालिकांच्या निवडणुकीची आज मतमोजणी

रायगड जिल्ह्यातील दहा नगर पालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.नगराध्यक्ष पदाच्या 10 जागांसाठी 34 उमेदवार रिंगणात आहेत तर नगरसेवक पदाच्या 209 जागांसाठी 575 उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. तर पेणमध्ये सहा, अलिबाग आणि रोह्यात प्रत्येकी एक अशा आठ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी महायुती मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक महत्वाची आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update : पालिकेवर सत्ता कुणाची? वाचा लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीचा निवडणूक निकाल आज जाहीर होणार आहे. २८८ नगराध्यक्षांची नावं आज निश्चित होणार आहे. महायुती अन् मविआ यांच्यात कोण सरसी मारणार? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात कोण गुलाल उधळणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. राज्यातील क्रमांक एकचा पक्ष नेमका कोणता याचाही फैसला होणार आहे.

राज्यातील २८८ नगरपालिकांसाठी २ टप्प्यात मतदान झालं. २ डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात तर २० डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले होतं. आज २८८ ठिकाणाचा निकाल जाहीर होणार आहे. आज नगराध्यक्ष कोण होणार? कोणत्या पालिकेवर कुणाची सत्ता येणार? हे स्प्ष्ट होणार आहे.सकाळी १० वाजता राज्यात मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मतदारांचा घराणेशाहीला सुरुंग; एका घरातले 6 उमेदवार, सहाही पडले

शिंदेसेनेच्या मंडलिकांना मोठा धक्का; दोन्ही राष्ट्रवादीनं राखला कागलचा गड, VIDEO

ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळला; कोकणात चालली शिंदेंची जादू, निकाल बदलणार कोकणाचं गणित?

कणकवलीत मंत्री राणेंचा पराभव; भावांच्या भांडणात संदेश पारकर नगराध्यक्ष

Nagar Palika Nagar Parishad Election: स्वबळावर लढले, जागा वाढल्या; उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं यश पाचपट

SCROLL FOR NEXT