Aditi Tatkare on Ladki Bahin Scheme Saam Tv News
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojna : लाडकीला वाढीव हफ्ता मिळणार की नाही? अधिवेशनात आदिती तटकरेंना सवाल, म्हणाल्या...

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojna : यंदा लाडकीला २१०० रुपये नाहीच आणि या अधिवेशनात त्याची घोषणा केली जाणार नाही.

Prashant Patil

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पहात होत्या. कारण या अधिवेशनात १५०० चे २१०० होतील अशी आशा त्यांना होती. मात्र नक्की काय घडलं अधिवेशनात आणि लाडक्यांना 2100 रुपये मिळणार की नाही? पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. लाडक्या बहिणींना आम्ही २१०० रुपये देणार असं आश्वासन निवडणूकांपूर्वी देण्यात आलं. प्रचारसभांतून याचा पुनरुच्चारही झाला. अजित पवारांनी तर लाडकी बहिण योजनेवरून पिंक कॅम्पेनच चालवलं.

निवडणूकीत मतांच्या रुपाने भरभरून प्रेम लाडकींनी महायुतीला दिलं. मात्र १५०० ते २१०० काही झाले नाहीत. नवीन आर्थिक वर्षात नक्कीच आपला हफ्ता वाढेल अशा आशेवर लाडक्या बहीणी होत्या. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनातला हाच प्रश्न विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसचे सतेज पाटील यांनी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना विचारले असता. अदिती तटकरेंनी काय उत्तर दिल ते पाहूयात.

लाडकींना २१०० कधी देणार? असा सवाल काँग्रेसचे सतेज पाटील यांनी आदिती तटकरे यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, यंदा लाडकीला २१०० रुपये नाहीच आणि या अधिवेशनात त्याची घोषणा केली जाणार नाही, असं उत्तर त्यांनी दिलं.

दरम्यान, थेट अदिती तटकरे यांनी सभागृहातच असं वक्तव्य केल्यानं लाडकींची मात्र घोर निराशाच झालीय. सरकार आल्याआल्या आपल्याला २१०० रुपये मिळणार या आशेवर असलेल्या लाडक्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरही वाढीव हफ्ता मिळणार नसल्याचचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आता यापुढील काळात तरी सरकार दिलेला शब्द पूर्ण करणार की लाडकींच्या तोंडाला पानं पुसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरण, संतोष चव्हाणचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

IAS Officer Transfer: मोठी बातमी! १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे झाली नियुक्ती?

Heavy Rain Alert : देशातील २२ राज्यांवर अस्मानी संकट, हवामान खात्याचा अलर्ट काय? VIDEO

जरांगेंच्या आंदोलनादरम्यान सरकारचा मोठा निर्णय; 3 जातींचा ओबीसींमध्ये समावेश

Accident: थरारक अपघात! भरधाव बसची २ दुचाकींना धडक, चाकाखाली चिरडून ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT