रेणापूर पंचायत समितीत भाजप-मनसे युतीची सत्ता स्थापन.
सभापतीपद मनसेच्या वाट्याला आले.
लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच पंचायत समितीवर मनसेचा झेंडा.
लातूर जिल्ह्यात मनसेला गुडन्यूज मिळाली आहे, मनसेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर रेणापूर पंचायत समितीत मनसेने राजकीय ताकद दाखवून दिली. रेणापूर पंचयात समितीमध्ये मनसे-भाजप युतीच्या माध्यमातून पंचायत समितीवर सत्ता स्थापन केली. येते मनसेच्या वाट्याला सभापतीपद आले आहे. त्यामुळे, किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या मनसेनं थेट सत्ता स्थापन केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय.
मनसेच्या वर्धापन दिनी मनसेनं ग्रामीण भागात, पंचायत समितीच्या सत्तेत सहभागी होत आपले राजकीय वजन सिद्ध केलं.लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच पंचायत समितीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. रेणापूरमध्ये मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांना भाजपसोबत आणण्यात भाजप आमदार रमेश कराड यांना यश आले. येथे मनसे आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली.
भाजपने सभापतीपद मनसेला देत राजकीय लवचिकता दाखवली आणि पंचायत समितीवर सत्ता स्थापन केली. या सत्तेमुळे पहिल्यांदाच मनसेचा झेंडा पंचायत समितीवर फडकला आहे. दरम्यान लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणारे माजी आमदार धीरज देशमुख आणि आमदार अमित देशमुख यांना राजकीय शह देण्यात भाजप आमदार रमेश कराड यांची रणनीती यशस्वी ठरली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
रेणापूर पंचायत समितीच्या एकूण आठ जागांपैकी काँग्रेसने तीन, भाजपने तीन तर मनसेने दोन जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे सत्तास्थापनेत मनसेची भूमिका निर्णायक ठरेल हे स्पष्ट होते. त्यात पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले. त्यानुसार आज पंचायत समिती सभापती निवड प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये मनसेच्या मोनिका सूर्यवंशी यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर भाजपचे शरद दरेकर यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.