Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धारावीत

Marathi Breaking Live Headlines Updates : मुंबईत सीजेपीचे आंदोलन, अभिजीत दिपके, ज्ञानेश कुमार, दुष्काळग्रस्त भागांचा पंचनामा, निवडणूक आयोग, ऑक्टोबर हिट, राज्यात पाऊस, देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धारावीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धारावीत

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी करणार

धारावीच्या एक्सपिरियन्स सेंटरला भेट देत जुनी धारावी आणि पुनर्विकासानंतरची धारावी या मॉडेल्सची मुख्यमंत्री पाहणी करणार

दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदीत संताप; विनर्स अकॅडमीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

दिवेआगर दुर्घटनेत आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर आळंदी आणि पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

विनर्स अकॅडमीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नगराध्यक्ष प्रशांत कु-हाडे यांनी केलीय

सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं , सत्यमेव जयते- सौरव बजरंग सोनवणे यांची पोस्ट

- विलास घुले खून प्रकरणात सौरव सोनवणेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली जात होती.

- मात्र दोषारोप पत्रात कुठेही सौरव सोनवणेंचे नाव नाही तसेच तपासात देखील त्यांचा कुठेही सहभाग आढळलेला नाही अशी सुत्रांची माहिती आहे.

विनर्स ॲकॅडमीवर नगरपरिषदेची कारवाई होणार

विनर्स ॲकॅडमीवर नगरपरिषदेची कारवाई होणार

पोलिसांच्या मदतीने क्लास सील करणार

Ahilyanagar: पाथर्डीत दिवसाढवळ्या 9 लाखांची लूट, प्लॉट विक्रीचे पैसे घेऊन जाताना तरुणावर हल्ला करत लुटलं

अहिल्यानगर -

पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट

प्लॉट विक्रीचे पैसे घेऊन जाताना दुचाकीस्वारांचा दीपक येळाई यांच्यावर हल्ला करून नऊ लाख रुपये नेले लुटून

दिवसाढवळ्या पाथर्डी शहरातील पेठ परिसरात भर बाजारात घडली घटना

या झटापटीत येळाई जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले

Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये पाण्याची नासाडी कराल तर गुन्हा दाखल होऊ शकतो

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची नासाडी कराल तर गुन्हा दाखल होऊ शकतो

दुष्काळी परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्याचा योग्य वापर व्हावा, यासाठी महापालिकेनेही आता कंबर कसली आहे.

यापुढे छत्रपती संभाजीनगरात पाण्याची नासाडी कराल तर महापालिका आर्थिक दंड लावणार आहे, गरज पडली तर गुन्हेही दाखल केली जाणार आहेत.

शहरात आता पहिल्यांदा पाण्याची नासाडी करताना आढळल्यास पाच रुपये दंड, दुसऱ्या वेळेस वीस हजार तर तिसऱ्या वेळेस पंचवीस आजाराचा दंड लावला जाणार आहे.

शेवटी चौथा वेळेस थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिका आयुक्ताने दिलाय. त्यामुळे छत्रपती संभाजी नगरकर पाण्याची नासाडी करत असाल तर सावधान कारण महापालिकेचं तुमच्यावर लक्ष असणार आहे.

Wardha: समृद्धी महामार्ग अपघात प्रकरण , गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी घेतली जखमीची भेट

वर्धा -

- समृद्धी महामार्ग अपघात प्रकरण

- गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी घेतली जखमीची भेट

- सावंगी रुग्णालयात जखमीची भेट घेत केली विचारपूस

- जखमीची विचारपूस करत डॉक्टरांना दिले निर्देश

- पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासह माजी खासदार रामदास तडस उपस्थित

Latur: लातूर जिल्ह्यातील नदी-नाले कोरडे, अनेक गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट

लातूर जिल्ह्यातील नदी-नाले कोरडे, घरणी नदीपात्राने गाठला तळ

अनेक गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट

लातूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने नदी-नाले कोरडे पडले आहेत.

चाकूर तालुक्यातून वाहणाऱ्या घरणी नदीपात्रातही पाण्याचा थेंब नसल्याच चित्र पाहायला मिळत आहे.

नदीकाठच्या अनेक गावांमध्ये आगामी काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

Thane: शिवसेना नेते प्रदिप पुर्णेकर हत्या प्रकरण, ⁠दोन आरोपींना अटक

ठाणे-

- प्रदिप पुर्णेकर हत्या प्रकरण

- ⁠दोन आरोपींना अटक

- ⁠नितेश पवार आणि निखिल यादव यांना अटक

- ⁠ठाणे क्राईम ब्रांचने केली अटक...

Maharashtra : राज्यातील धरणात जलतुटवडा, राज्यातील धरणात ७५ टक्केच जलसाठा

राज्यातील धरणात जलतुटवडा

राज्यातील धरणात ७५ टक्केच जलसाठा

मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई

मराठवाड्यातील मध्यम, लहान प्रकल्पही कोरडे

मराठवाड्यातील सर्व प्रकारच्या धरणात ४४.९२ टक्के पाणीसाठा

मागील वर्षीच्या तुलनेत ३७.८३ टक्के कमी पाणीसाठा

Buldhana:  बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

बुलडाणा -

जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

2 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन

Nagpur: नागपूर रेल्वे स्थानकावर सव्वा किलो अमली पदार्थ जप्त

नागपूर -

- नागपूर रेल्वे स्थानकावर सव्वा किलो अमली पदार्थ जप्त, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर प्रादेशिक पथकाची मोठी कारवाई

- डीआरआयच्या पथकांकडून तीन ठिकाणी छापे टाकत....अॅम्फेटामाईनसह बिबट्याची कातडी मिळून आली...

- डीआरआयकडून तीन दिवस अत्यंत गोपनीय पद्धतीने छापेमारी....मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने डीआरआयची कारवाई

- हजरत निजामुद्दीन-केएसआर बंगळुरू राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेची झडती

- महिलेच्या सुटकेसच्या चोर कप्प्यात अमली पदार्थ लपवल्याचे आढळले

Baramati: शरद पवार आज दुष्काळी तालुक्याचा दौरा करणार, पुरंदरमधील शेतकऱ्यांना भेटणार

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार याआज दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून शरद पवारांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

सकाळी साडेदहा वाजता पुरंदर तालुक्यातील परिंचे गावात शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधतील त्यानंतर वीर येथील पाहणी करून लपतळवाडी पाझर तलावाची ते पाहणी करतील.

साडेअकराच्या सुमारास मांडकी येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील त्यानंतर वाल्हे,वाघदळवाडी, बाळाजीचीवाडी, राख,गुळूंचे आणि निरा कॉर्नर या ठिकाणी ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

Pune: साखर उद्योगासाठी नवे आर्थिक मॉडेल तयार होणार, महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश

पुणे -

राज्यातील साखर कारखाने कमी दिवस चालत असल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर साखर उद्योगासाठी नवे आर्थिक मॉडेल तयार करण्यात येणार आहे. साखर आयुक्त, सहकार विभाग आणि राज्य सहकारी बँकेला महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच जैवइंधन व जैवऊर्जा धोरण, गूळ उद्योगासाठी कायदा आणि इथेनॉलच्या दरवाढीबाबतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Pune: बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक अनास्कर यांच्या 'बँकांविषयी सर्वकाही' पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे -

बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक अनास्कर यांच्या 'बँकांविषयी सर्वकाही' पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक तथा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी लिहिलेल्या 'बँकांविषयी सर्वकाही' या पुस्तकाच्या तीन भागांचे प्रकाशन मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनास्कर यांच्या गेल्या ३८ वर्षांच्या बँकिंग साक्षरतेच्या अविरत कार्याचा गौरव केला

मुंबई: शिवाजी पार्क येथे कॉक्रोज जनता पार्टीचे आज आंदोलन

मुंबई -

चहाच्या बहाण्याने अभिजीत दिपके यांना ताब्यात घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न?

आज दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन होणार.

आंदोलनापूर्वी अभिजीत दिपके मुंबईत दाखल.

पत्रकार परिषदेनंतर अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईत फेरफटका मारला.

सायंकाळी उशिरा मरीन ड्राइव्ह परिसरात फेरफटका मारत असताना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलीस ठाण्यात नेले.

डिटेन करणार असाल तर तस अधिकृत सांगा,- अभिजित दीपके यांचा पोलिसांना सवाल

मात्र चहा पिण्यासाठी तुम्हाला बोलावत असल्याचे पोलिसांचे म्हणणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP Protest : जंतर-मंतरवरील CJP च्या आंदोलनादरम्यान गोंधळ, पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात; ११ मेट्रा स्थानके बंद

Breaking News: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पहिली योजना बंद

Latest Mangalsutra For Woman: नव्या नवरीसाठी फॅन्सी मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; खरेदी करण्याआधी वाचा 18K, 22K आणि 24K च्या किंमती

Weight Loss: सकाळ की संध्याकाळ? वजन कमी करण्यासाठी व्यायामाची योग्य वेळ कोणती? ५ आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT