प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी ठाण्यात होणाऱ्या ठाणे पोलिसांनी सर्वपक्षीय आंदोलनाची परवानगी नाकारली
ठाण्यातील चिंतामणी चौकात मनसे शिवसेना UBT काँग्रेस राष्ट्रवादी SP पक्ष करणार होते आंदोलन
आंदोलनात आदित्य ठाकरे राज ठाकरे अनिल परब जितेंद्र आव्हाड केदार दिघे राजन विचारे राहणार होते उपस्थित..
मित्रपक्षाची साथ सुटली, महायुतीला फटका; भाजपचा शिवसेनेवर ठपका!
शिवसेनेच्या भूमिकेने महायुतीच्या गणिताला सुरुंग; भाजपचा मित्रपक्षावर आरोप!
पुण्यात पाठिंबा दुसऱ्याला, संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार; भाजपचा शिवसेनेला सवाल!
एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान; भाजपने शिवसेनेच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
टायगर श्रॉफवरील गोळीबारासाठी वापरलेली झिगाना पिस्तूल 2.5 लाखांची
पिस्तूल अमृतसरमधूनच खरेदी केल्याची सूत्रांची माहिती
झिगाना पिस्तूल आणि 20 काडतुसे खरेदी करण्यासाठी 2.50 लाख रुपये दिल्याचे तपासात उघड
मुंबई-ठाण्यात ४६८ झाडांची कत्तल होणार
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील ८ प्रकल्पांना मंजुरी
महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचा निर्णय; ४६८ झाडे तोडली जाणार
कोळशेवाडीत संतापजनक घटना
महिलेच्या कुटुंबीयांनी तरुणाला पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं
छऱ्याची बंदूक पोलिसांनी जप्त करत आरोपी भरत जाधवला घेतलं ताब्यात
कोथरूडमधून तांब्याची तार चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोघांना अटक
कोथरूड परिसरातील एका इमारतीमधून तांब्याची तार चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन चोरट्यांना अटक करण्यात आली आहे
कोथरूड पोलिसांनी २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावत सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे 88 सहकारी संस्थांच्या निवडणुकींना पुढील आदेशापर्यंत ब्रेक लागला आहे
या संदर्भाचे शासनाचे आदेश यवतमाळ जिल्हा उपनिबंधक कार्यालयात धडकले आहे सध्या तरी सहकारी संस्था बिनधास्त झाल्या आहेत.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अर्णब चक्री वादळाचा परिणाम यवतमाळ जिल्ह्यात दिसून येत असून गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण निर्माण झाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
आधीच कापूस सोयाबीन हाताशी गेल्यानंतर आता तूर उत्पादक शेतकऱ्यांसमोर चिंतेच ढग निर्माण झाले आहेत
चवड येथील कुणाल मार्केट इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.
या आगीत 17 दुचाकी आणि 4 चारचाकी वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.
या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे शहर भाजपाच्या वतीने नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांचा सत्कार.
कौस्तुभ गावडे यांनी पुणे विभाग शिक्षक मतदार संघात मिळवला विजय..
महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि शिवसेना पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार होते रिंगणात
कौस्तुभ गावडे यांचा पुणे शहर कार्यालयात शहराध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी आमदारपदी निवड झाल्यानंतर केला सत्कार..
भाजपने शिक्षक आमदार जागा आणली खेचून
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.