Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: राज्य मंत्री मंडळाच्या दुष्काळ निवारण उपसमितीची आज बैठक

Marathi Breaking Live Headlines Updates : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा आज निकाल, मनोज जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बने खळबळ, ज्ञानेश कुमार निवडणूक आयोग, हवामानाचे अपडेट, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Priya More

राज्य मंत्री मंडळाच्या दुष्काळ निवारण उपसमितीची आज बैठक

राज्य मंत्री मंडळाच्या दुष्काळ निवारण उपसमितीची आज बैठक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राज्यातील 304 दुष्काळी तालुक्यांमधील उपाययोजनांचा घेणार आढावा

गोठ्यातील म्हैस दगावली ; सोलापुरातील हुच्चे कुटुंबियांनी अंत्ययात्रा काढली

सध्याच्या काळात माणूस आणि मुक्या प्राण्यातील ऋणानुबंध दुर्मिळ होत असताना,सोलापुरातील मराठा वस्तीत माणुसकीचे दर्शन पाहायला मिळाले आहे.

तब्बल 19 वर्षे कुटुंबाचा आधारवड ठरलेल्या 'बांगडी' नावाच्या म्हशीचा मृत्यू झाल्यानंतर,हुच्चे कुटुंबियांनी घरातील जेष्ठ व्यक्तीप्रमाणे ट्रॅक्टरमध्ये अंत्ययात्रा काढून म्हशीला शेवटचा निरोप दिला आहे.

मुंबईच्या दिंडोशी परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर

मुंबईच्या दिंडोशी परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर

गोरेगाव पूर्वेतील संकल्प गार्डनच्या मैदानात बिबट्या खुलेआम फिरताना दिसला

बिबट्याच्या दर्शनामुळे परिसरात भीतीचे वातावरण

दिंडोशी परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

मध्य रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वाहतुकीदरम्यान तीन जणांचा मृत्यू

मध्य रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वाहतुकीदरम्यान तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

मध्य रेल्वेच्या ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता

अनेक तास लोकल सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती

जळगाव जिल्हा बँक निवडणूक पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री

जळगाव जिल्हा बँक निवडणूक पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री

रक्षा खडसेंसह सावकारे, कोलते, सोनल पवारांनी घेतले अर्ज

आई राजा उदो उदो जयघोषात तुळजापुरात पाच लाखांवर भाविकांनी अश्विनी पौर्णिमेचा खेटा केला पूर्ण

आई राजा उदो उदो जयघोषात तुळजापुरात पाच लाखांवर भाविकांनी अश्विनी पौर्णिमेचा खेटा केला पूर्ण

महाराष्ट्रासह,आंध्र प्रदेश,कर्नाटक आणि तेलंगणातील भाविकांची गर्दी

सोलापुरातील मानाच्या काट्यांसह अश्विन पौर्णिमेची छबिना मिरवणूक पडली पार

येरवडा गोल्फ चौकात जीन्स पॅन्टच्या वादातून मारामारी

येरवडा गोल्फ चौकात जीन्स पॅन्टच्या वादातून मारामारी

येरवडा गोल्फ चौक परिसरात जीन्स पॅन्ट चोरीच्या संशयावरून भर सिग्नलवर मारामारी.

दुचाकीस्वाराने दुकानातून जीन्स पॅन्ट चोरल्याचा दुकानदाराचा आरोप.

गोल्फ क्लब परिसरात दुकानदाराने दुचाकीस्वाराला गाठून विचारला जाब.

Jalna : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात मसाले, फरसाण उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात मसाले, फरसाण उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

लसण चिवडा, मिक्स फरसाण आणि नमकीनचा एकूण 6 लाख 60 हजारांचा साठा जप्त

अस्वच्छ वातावरणात उत्पादन आणि कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून कारवाई.

Washim: देवाच्या आणि हिंदूंच्या नावाने मते मागून महायुतीने सत्ता मिळवली -  प्रकाश आंबेडकर

वाशिम - देवाच्या आणि हिंदूंच्या नावाने मते मागून सत्ता मिळवली

प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर आरोप

दिवाळीनंतर दुष्काळ भीषण होणार आहे

सरकारने जनतेच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी

सरकारने व्यवस्था केली नाही तर RSS, भाजप आणि बजरंग दलाच्या प्रमुखांच्या घरांसमोर जाणार

जनतेच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्याची त्यांना मागणी करणार

Yavatmal: यवतमाळ शहरातील नगर परिषदेच्या खुल्या जागेत लागली आग

यवतमाळ -

यवतमाळ शहरातील नगर परिषदेच्या खुल्या जागेत लागली आग

शहरातील अभ्यंकर कन्या शाळे समोर असलेल्या मिनी डंप ग्राउंडला लागली आग

शहरातील मध्यभागी आग लागल्याने नागरिकांमध्ये काही काळ पसरले होते भीतीचे वातावरण

अग्निशमन दलाच्या २ बंबानी विझवली आग

अग्निशमन पथकाने अथक प्रयत्नामुळे आग आटोक्यात आली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Historical Mystery Places : हजारो वर्षांचा इतिहास अन् अनेक रहस्यं! भारतातील 'ही' ७ प्राचीन ठिकाणं पाहिली आहेत का?

Sugar Price Hike : दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना फटका! साखर इतक्या रुपयांनी महागली; आजचे ताजे दर किती?

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: विधान परिषदेच्या पाचही मतदारसंघात मतमोजणीला सुरूवात

Maharashtra MLC Election Results 2026: विधानपरिषदेच्या ५ जागांचा फैसला आज, मतमोजणीला सुरूवात; काही तासांत चित्र होणार स्पष्ट

Weather Alert : ‘अर्णब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT