बार बंद करण्याची वेळ झाल्याने बिल भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने ग्राहकाने मित्रांना बोलावून बार मॅनेजरवर चौघांनी मिळून हल्ला केल्याची घटना यवतमाळच्या वणी येथील वरोरा रोडवरील लॉर्ड्स बारमध्ये घडली. मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.मॅनेजर आनंदराव उईके यांच्या तक्रारीनुसार,शेख ताबीज शेख रानु हा बारमध्ये मद्यप्राशन करीत होता. बार बंद करण्याची वेळ झाल्याने वेटरला बिल घेण्यास सांगितल्यानंतर ताबीजने वाद घातला.
मुंबई आंदोलनाची परवानगी आझाद मैदान पोलिसांनी नाकारल्यानंतर मनोज जारंगे पाटील काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सतरावा दिवस असून मनोज जरांगे पाटील उद्या दुपारी काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाला आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर उद्या पुन्हा एकदा परवानगीसाठी आझाद मैदान पोलिसांकडे अर्ज करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनोज जरांगे यांनी मुबंई मध्ये जाऊन आंदोलनाचा इशारा दिल्या नंतर नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी सक्रिय झाले आहे,अंतरवली सराठी येथून परत आल्या नंतर नाशिकच्या लासलगाव येथे जिल्ह्यातील पदाधिकारी यांची बैठक होऊन पुढील रणनीती ठरवण्यात आले,अनेक कार्यकर्ते रेल्वे तसेच गाड्यां मधून निघणार आहे,तर जाताना मराठा बांधवां साठी शिधा तसेच जेवणाचे साहित्य घेऊन निघणार असल्याचे या बैठकीत ठरले.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना महाराष्ट्र सरकारने दिलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा तात्काळ काढून घ्यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी केली आहे. 15 दिवसांच्या आत सुरक्षा न काढल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा ही डोंगरे यांनी दिला आहे. डोंगरे यांच्या मागणी नंतर पुन्हा मराठा - ओबीसी वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षणावर खलबतं
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे विरुळ रिंगरोडवर कारचा भीषण अपघात..
चारचाकी कार थेट कॅनल मध्ये कोसळली..
सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे..
नागरिकांच्या मदतीने कार मधील जखमी नागरिकांना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले आहे..
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल.. अपघात कसा झाला तपासाला सुरुवात.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघत आहेत
पाटोदा येथे मुंबई दौऱ्यातील पहिला मुक्काम होणार असून, येथील पार्किंग ठिकाणासह इतर सर्व सोयी-सुविधांबाबत जय्यत तयारी सुरू आहे.
पाटोदा शहरातील व तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पाटोदा येथील पहिल्या मुक्कामाची तयारी केली असून सभास्थळासाठी आणि पार्किंगसाठी जेसीबीच्या साह्याने जागेची साफसफाई करण्यास सुरुवात आहे.
कोकणात ज्यादा बस सेवा पाठवल्याने एसटी सेवा कोलमडली
मुंबई- गोवा महामार्गावर वाहातूक कोंडी
MEA तर्फे मराठा बिझनेस एक्सपोच आयोजन
शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन
कार्यक्रमाला रोहित पवार यांची देखील उपस्थिती
2027 चा MEA EXPO लाँच आज शरद पवार यांच्या हस्ते होणार
पुण्यातील सारथी सभागृह कार्यक्रमाचे आयोजन
PM मोदींनी 15 वर्ष काम केले-CM फडणवीस
मुंबईत सेवा संकल्प अभियान
मोदींच्या काळात भारताने प्रगती केली
17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत अभियान
देशभरात हे अभियान राबवणार- अमित शाह
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त अभियान
-कल्याण रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कसारा दिशेकडील डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. अचानक झालेल्या या बिघाडामुळे लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांना काही काळ खोळंबा सहन करावा लागला.
: छत्रपती संभाजी नगरच्या खुलताबाद तालुक्यातील तालुक्यातील खंडी पिंपळगाव परिसरात विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या पथकाने सुखरूप सुटका केली. विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ वनविभागाला कळविले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विहीर खोल असल्याने बिबट्याला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान होते. बिबट्याला कोणतीही इजा होऊ नये आणि नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ नये, यासाठी वनविभागाने नियोजनबद्ध पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविले.
यावर्षी पावसाळा संपत आला तरी सोलापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी जळून चालली असून शेतकरी राजा हतबल झाला आहे. अशातच परतीचा पाऊस तरी पडावा, या आशेने माढा तालुक्यातील मोडनिंब येथील शेतकऱ्यांनी आज अनोखा उपाय केला.
अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यातील अकोली जहांगीर परिसरात आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली.
नाशिकच्या येवला शहरातील फत्तेबुरज नाक्यावर भीषण अपघात झाला. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरखाली दुचाकी आल्याने दोन जणांचा मृत्यू. अपघातातील दोन्ही तरुण कोपरगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती. घटनेनंतर नागरिकांची घटनास्थळी गर्दी; दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गणेशोत्सवासाठी मुंबईवरून कोकणात येणाऱ्या मुंबईकर कोकणवासीयांना महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा आणि त्यामुळे झालेल्या ट्राफीकचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मनोज जरांगे पाटील यांना आज पुन्हा अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. रॅलीमध्ये काही लोक घुसून गोंधळ घालत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “मला शूट करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा दावा जरांगे पाटील यांनी केला. या आरोपांमुळे रॅलीतील सुरक्षेचा आणि व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
माणगावमध्ये वाहतुक कोंडी होत असताना अर्धवट तयार झालेल्या बायपासमुळे पुण्याकडून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे, कर्जत - खोपोली या भागातून कोकणात जाणारे कोकणवासीय पुर्वी माणगावमधुन पुढे कोकणात जायचे मात्र या भागातील बायपासचे काम पूर्ण झाल्याने पुण्या कडून येणारी वाहतूक माणगाव बायपास वरून कोकणाकडे वळवली आहे. यामुळे पुण्याकडून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात फुला फळांनी बाजारपेठा सजल्या आहेत. कुडाळमध्ये गणपती सजावटीसाठी व माटवीला बांधण्यासाठी लागणारी जंगलातील फुले व फळे दाखल झाली आहेत. याच्या खरेदीसाठी नागरीकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे. माटवीसाठी विविध प्रकारची फुले, फळे, तोरणे, सजावटीचे साहित्य पारंपरिक साहित्याची खरेदीसाठी ही गर्दी झाली आहे. कुडाळ बाजारपेठेतून आढावा घेतला आहे.
गणेश चतुर्थीत मुंबईवरून कोकणात रेल्वेने येणाऱ्या गणेशभक्तांना मोठ्या त्रासाला सहन कराव लागतय. कोकण रेल्वेचे वेळापत्रक अक्षरशः कोलमडल आहे त्यामुळे जबलपूर एक्सप्रेस ही रेल्वे तब्बल 11 ते 12 तास लेट दाखल झाली आहे तर काही ट्रेन या 2 ते 3 तास उशीराने दाखल होत आहेत याचा मोठा मनस्ताप गावी येणाऱ्या गणेशभक्ताना सहन करावा लागतोय. कुडाळ रेल्वेस्थानकातून आढावा घेतला आहे
परळी पोलीस ठाण्याच्या दारातच दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
काही वाद झाल्याने दोन्ही गट परळी पोलीस ठाण्यात आले होते मात्र वाद वाढल्याने पोलीस ठाण्याच्या अगदी दारातच दोन गट भिडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा धाक नेमका कुठे आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. व्हायरल व्हिडिओतील व्यक्तींवर पोलिसांकडून काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना बदलापुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन करून शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या बाप्पाच्या मूर्ती मंडपात आणल्या. बदलापूर पूर्वेकडील आंबवणे बंधू यांचं सर्वात मोठं गणेश मूर्ती कला केंद्र आहे. या कला केंद्रातून विविध सार्वजनिक मंडळानी बाप्पाच्या मूर्तीची मिरवणूक काढत आपल्या लाडक्या गणरायाचं जल्लोषात स्वागत केलं. बदलापूर पूर्वेकडील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ पाटील पाडा या शहरातील सर्वात जुन्या गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात निघाली. या मिरवणुकीत शेकडा गणेशभक्त सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात, पारंपारिक वाद्यासह बाप्पाच्या आगमनाच्या जोरदार स्वागत करण्यात आलं. आज रविवारचा दिवस असल्यामुळे दिवसभरातही बदलापूर शहरात अशाच मिरवणुका पाहायला मिळणार आहेत.
रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पनवेलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला आहे. उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत असल्याने भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी अपेक्षित होती. मात्र मुसळधार पावसामुळे ग्राहकांनी बाजार समितीकडे पाठ फिरवल्याने बाजारात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी केली मुंबईला जाण्याची घोषणा.
जरांगे पाटील यांच्या घोषणेनंतर नांदेडमधून मराठा बांधवांनी मुंबईकडे जाण्याची तयारी केली सुरू ल.
नांदेडच्या माहूर येथील मराठा बांधव मुंबईला जाण्यासाठी सज्ज.
माहूर येथे जोरदार घोषणाबाजी करत मराठा बांधवांनी जरांगे पाटील यांना दिले समर्थन.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला.
गायमुख घाटातून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या टाटा हायवा डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बाजूने जाणाऱ्या मारुती सुझुकी ईको कारला डंपरने धडक दिली.
कुडाळ रेल्वे स्थानकात रोटरी क्लबतर्फे २ हजार कापडी पिशव्यांचे वाटप
प्लास्टिकमुक्तीसाठी मुंबईकर कोकणवासीयांना आवाहन
विंचूरमध्ये गॅस सिलिंडर स्फोट; तीन घरे झाली आगीत भस्मसात
सुदैवाने जीवितहानी नाही; संसारोपयोगी साहित्य जळाले, तीन कुटुंबे उघड्यावर
पुण्यात हजारो महिलांच्या उपस्थित पार पडणार सामूहिक अथर्वशीर्ष पठण
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळातर्फे १५ सप्टेंबर रोजी पहाटे ५.४५ वाजता पार पडणार कार्यक्रम
ऋषीपंचमी निमित्त दरवर्षी हजारो महिलांच्या उपस्थित अथर्वशीर्ष पठण च्या कार्यक्रमाचे आयोजन
सकाळी ६ वाजता अथर्वशीर्ष म्हणायला होणार सुरुवात
- नागपुरात DJ विरोधात आज ‘मूक मार्च’काढण्यात येणार
- “उत्सवाला विरोध नाही, गोंगाटाला विरोध!” या ब्रिदवाक्याचे फलक हातात घेऊन नागरिक सहभागी.
- डीजे विरोधातील मोर्चात भाजप नेते संदीप जोशी सहभागी होणार
संजय राऊतांचा वार , अशोक चव्हाण यांचा पलटवार
अशोक चव्हाण भाजपात गेले ना , मग जा आता मोदीकडे मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लावा - संजय राऊत
खरी शिवसेना शिंदेची , त्यामुळे शेवटची तडफड सुरू आहे - अशोक चव्हाण
पुण्यातील जांभूळवाडी येथील पुलावर भीषण अपघात
अपघात चारचाकीचा चक्काचूर झाला असून ट्रक पलटी झाला आहे
जांभुळवाडी दरी पुलावर मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात
मुंबई गोवा महामार्गावर वाहनाला आग
मुंबई वरून कोकणात जाणाऱ्या मार्गिकेवर एर्टिगा कार जळून खाक
महामार्गावरील वडखळ जवळच्या जिते गावाजवळ आग लागल्याची घटना
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात
मुंबई, ठाणे, पालघर, पुण्यात गणेशोत्सवापूर्वी पावसाचा जोर वाढला
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.