नागपूर - शासकीय डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसवरील बंदीच्या अंमलबजावणीला मॅटची स्थगिती
- सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई न करण्याचे निर्देश
- महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या नागपूर खंडपीठाचा ५ नोव्हेंबरला महत्त्वपूर्ण आदेश
- राज्य शासनाने २०१२ मध्ये शासकीय डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करण्यास मनाई करणारा शासन निर्णय काढला होता
- या निर्णयाविरोधात डॉक्टरांनी न्यायालयात धाव घेतली होती; सर्वोच्च न्यायालयाने २०१२ च्या शासन निर्णयाला स्थगिती दिली होती
ठाणे - कळव्यातील खारेगाव परिसरात भीषण आग
६० फूट रोडवर असलेल्या एका मंडप डेकोरेटरच्या गोडाऊनला मध्यरात्री लागली आग
घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने धाव घेत आग पूर्णपणे विझवली
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आग लागण्याचे कारण अस्पष्ट आहे
दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला संजीवनी आणि यवतमाळ जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढवली जाणार आहे.
त्यासाठी व्हीबीजीरामजी योजनेमधून शेतकऱ्यांना एक लाख 21 हजार 815 रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे. यामुळे चारा लागवड करताना शेतकऱ्यांना आर्थिक भार कमी होणार आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून यामध्ये जनावरांना हिरवा चाऱ्याची उपलब्ध करून देण्यास ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी चारा लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.