इळेगावच्या गोदावरी पात्रात कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करत दगडफेक केली.पोलीस उपाधीक्षक श्याम पानेगावकर यांच्यासह चार पोलिस कर्मचारी जखमी झालेत.
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत सुरू असलेल्या घडामोडींवर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली आहे.अनेक मागण्यांवर सरकार सकारात्मक असून काही मागण्या कायदेशीर चौकटीत आणि न्यायव्यवस्था किंवा वकिलांच्या माध्यमातून सोडवाव्या लागतात,असे सामंत यांनी स्पष्ट केले.
उद्या सायंकाळपर्यंत माधुरी हत्ती कोल्हापुरात होणार दाखल
28 जुलै 2025 रोजी नांदणी मठातून माधुरी हत्तीनीला गुजरात इथल्या वनतारा इथं न्यायालयाच्या आदेशाने पाठवण्यात आले होते.
मराठवाड्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, शिंदे समिती स्थापनेपासून ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्राप्त ३ लाख १७ हजार ५६९ अर्जांपैकी ३ लाख १६ हजार ९७७ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. प्राप्त अर्जांपैकी सुमारे ९९.८ टक्के अर्जांवर कार्यवाही पूर्ण झाली आहे.
बीडच्या पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथील एका चिमुकलीवर वयोवृद्ध नराधमाने अत्याचार केला आहे या घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे मात्र या प्रकरणातील नराधम अद्यापही फरार असून पोलीस त्याला पाठीशी घालत आहे असा आरोप नातेवाईकांनी केला आहे आरोपीच्या अटकेसाठी उद्या पाटोद्यामध्ये जन आक्रोश मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आला आहे.
वळसंग गावामध्ये वीस ते पंचवीस जमावामध्ये काठ्या, कोयते, लोखंडी रॉड घेऊन हाणामारी
जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याने बराच काळ तणावाचे वातावरण झाले आहे.
-दगडफेक आणि तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.
मूळचे छत्तीसगड आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या विकास ताराचंद चोपकर या भाविकाने साई चरणी 90 ग्रॅमहून अधिक वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण केलाय.. आकर्षक नक्षीकाम असलेल्या या मुकुटाची किंमत जवळपास 13 लाख रुपये इतकी आहे.. साई संस्थानच्या वतीने दानशूर साईभक्त आणि परिवाराचा सत्कार करण्यात आलाय.
उद्या सायंकाळपर्यंत माधुरी हत्ती कोल्हापुरात होणार दाखल
28 जुलै 2025 रोजी नांदणी मठातून माधुरी हत्तीनीला गुजरात इथल्या वनतारा इथं न्यायालयाच्या आदेशाने पाठवण्यात आले होते
एक वर्षाच्या लढ्यानंतर अखेर माधुरी हत्तीन पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने रवाना
उद्या सकाळी होणाऱ्या मारबत उत्सव होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज पोलिस भवनच्या लॉनवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या टीमने डीजेच्या ध्वनी पातळीची कॅलिब्रेशन टेस्ट केली.
नागपुरातील डीजे समर्थक आणि विरोधकांसह डीजे व्यावसायिक आणि माजी आमदार संदीप जोशी यांची यावेळी उपस्थिती होती.
डीजे व्यावसायिकांनी मर्यादित आवाजात डीजे वाजवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.
यावेळी प्रत्यक्ष डीजे वाजवून ध्वनी पातळी तपासण्यात आली असता डेसिबल मीटरवर आवाजाची पातळी 100 ते 110 पर्यंत गेल्याचं दिसून आलं.
गणेशोत्सवा दरम्यान वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध
० आज मध्यरात्रीपासून अवजड आणि लांब गाड्यांना मुंबई गोवा महामार्गावर बंदी
० आजमध्यरात्री 12 वाजल्यापासून 15 सप्टेंबरच्या रात्री 11 वाजे पर्यंत, 18, 19 आणि 20 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 11, 25 सप्टेंबरला सकाळी 8 ते 26 सप्टेंबर रात्री 8 अवजड वाहनांना मुंबई गोवा महामार्गावर बंदी राहणार
० दुग्धजन्य पदार्थ, अत्यावश्यक सेवा, भाजी आदी वाहनांना या बंदी मध्ये सुट देण्यात आली आहे.
बैलपोळा सणाच्या दिवशी शिर्डीत भक्ती आणि श्रद्धेचं अनोखं दर्शन घडलंय.. आंध्र प्रदेशातील एलुरु येथील देणगीदार साईभक्त एम. श्रीनिवास राव यांनी साईचरणी 629 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट देणगी स्वरूपात साईबाबांना अर्पण केलाय.. आकर्षक नक्षीकाम असलेल्या या मुकुटाची किंमत तब्बल 82 लाख 39 हजार रुपये इतकी आहे.. साईबाबांवरील अढळ श्रद्धेतून अर्पण केलेली ही सुवर्णभेट भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक ठरलीय.. यावेळी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईभक्त एम. श्रीनिवास राव यांचा सत्कार केला.. पोळ्याच्या पवित्र पर्वावर साईचरणी अर्पण झालेल्या या सुवर्ण मुकुटाने शिर्डीत भक्तीची श्रीमंती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे...
पुनर्तपासणी करून पुन्हा निकाल लावणार
2025 च्या मुलाखतीस तात्काळ स्थगितीस मान्यता
* नागपुरात काल युवक काँग्रेसचेचे आंदोलन।झाले.. यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली..
- नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत गंभीर झाले आहे.
- या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, शहर अध्यक्ष प्रफुल गुडधे यांनी पोलिसांची भेट घेऊन या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
- या संदर्भात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली..
* - आंदोलन करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करणाऱ्या नागरिकांवर हल्ले होत असतील, तर हा लोकशाहीसाठी गंभीर इशारा आहे.
- याप्रकरणी निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने केली.
निवेदनातून मागणी...
1. शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची तातडीने निष्पक्ष आणि सखोलचौकशी करण्यात यावी.
2. हल्ल्यात सहभागी संबंधित व्यक्ती/व्यक्तींविरुद्ध लागू कायद्यांनुसार तातडीने FIR नोंदवून, पुराव्यांच्या आधारे अटक करण्यात यावी.
3. सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ, छायाचित्रे, मोबाईल रेकॉर्डिंग व इतरइलेक्ट्रॉनिक पुरावे तातडीने जतन करून तपासात समाविष्ट करण्यात यावेत.
4. प्रत्यक्षदर्शी व संबंधित व्यक्तींचे जबाब कायदेशीर प्रक्रियेनुसार नोंदविण्यात यावेत.
5. घटनेत इतर व्यक्तींचा सहभाग, चिथावणी किंवा पूर्वनियोजन आढळल्यासत्यांच्यावरही कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी.
6. तपासाची प्रगती व करण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईबाबत तक्रारदार/संबंधित पक्षाला नियमानुसार माहिती देण्यात यावी.
7. राज्यातील शांततापूर्ण आंदोलने व राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागीहोणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात.
पोळा सण व पिठोरी अमावस्येनिमित्त सैलानी येथील श्री हजरत सैलानी बाबा दर्ग्यावर महाराष्ट्रासह परराज्यांतून लाखो भाविक दाखल झाले. पहाटेपासूनच भाविकांची गर्दी वाढत गेल्याने सैलानी नगरीला यात्रेचे स्वरूप आले असून, दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत्... नवसपूर्ती व धार्मिक विधींसाठी दिवसभर भाविकांची लगबग सुरू होती. आकर्षक रंगरंगोटी व विविधरंगी सजावटीने दर्गा परिसर उजळून निघाला असून, भाविकांच्या गर्दीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने १० सप्टेंबर सकाळी ६ वाजेपासून ११ सप्टेंबर रात्री ११ वाजेपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे. भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक नियंत्रणासाठी दर्गा परिसरासह प्रमुख मार्गांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांना पुणे पोलिसांची नोटिसा
पुन्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरण्याचा दिला होता इशारा
आंदोलनाआधीच विद्यार्थ्यांना पुणे पोलिसांच्या.नोटिसा
तीन दिवसांचा दिला होता विद्यार्थ्यांनी राज्य सरकारला वेळ
10 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर जिल्ह्यात शिबिर घेण्यात येत आहे...
सातपुड्याच्या दुर्गम भागात पोळा सणाचा उत्सव....
सातपुड्यातील मनवानी गावात पोळ्याचा उत्साह हजारो वर्षांची परंपरा आजही कायम...
ड्रोन च्या माध्यमातून बघुया सातपुड्याचा पोळा....
डोंबिवलीत अन्न व औषध प्रशासन अर्थात FDAकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सांगलीहून डोंबिवलीत आणलेले तब्बल ५०० लिटर सुटे दूध भेसळयुक्त असल्याचे आढळून आल्याने हे दूध जप्त करत नष्ट करण्यात आले. कल्याण अन्न व औषध विभागाच्या पथकाने ही कारवाई करत दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
गणेश उत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल असं दिलं होतं आश्वासन
मात्र मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच
महामार्ग पूर्ण होण्याचा आश्वासन दरवर्षी दिला जातो मात्र आश्वासन पूर्ण केले जात नाही
दिलेला आश्वासन कधी पूर्ण करतील हे गणरायालाच माहीत
अद्यापही खड्ड्यातूनच काही ठिकाणी प्रवास करावा लागतो
मुंब्रा- दिवा वळणावर धावत्या लोकलमधून महिला पडली
नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा
उच्चस्तरीय समितीच्या सुनावणीमध्ये माधुरीच्या घर वापसीवर शिक्कामोर्तब
माधुरी हत्तीनीबाबत उच्चस्तरीय समितीचा सकारात्मक अहवाल
तांत्रिक बाबीची पूर्तता होताच माधुरी हत्तीन नांदणी मठाकडे येणार
दुचाकीवरून घरी जाणाऱ्या १९ वर्षीय युवतीवर सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथे बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे.
त्यामुळे सातार्डा परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
सातार्डा भटवाडी परिसरात रस्त्याच्या बाजूला बिबट्याचा मुक्तसंचार असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे.
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वाटेगाव येथे मराठा आरक्षणासाठी एक आंदोलक पाण्याच्या टाकीवर चढून बसला. गावातील अंबादास कदम हे पाण्याच्या टाकीवर जाऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे.नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी ठीक ठिकाणी मराठा आंदोलकांची आंदोलन सुरूच आहेत.
गणेशमूर्तींचे माहेरघर असणाऱ्या रायगडच्या पेणमधून या वर्षी 70 लाखाहून अधिक गणेश मूर्तींची विक्री झाली आहे. यामध्ये सुमारे 20 लाख मूर्ती परदेशात रवाना झाल्या असल्याची माहिती आहे. पुर परिस्थिती रंग आणि कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे मूर्तींच्या किंमतीत यंदा 15 ते 20 टक्के वाढ झाली असली तरी गणेशभक्त आणि ग्राहकांनी पेणमधील मूर्तींना विशेष पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
नाशिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत बैठक सुरू
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे - मीटिंग असल्याचा निमंत्रण पालिका प्रशासनाने दिले नसल्याने मंडळाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित नाही
खड्ड्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात
एमएससीबी मीटर साठी एनओसी साठी पैसे मागितले जातात
जर मीटर लवकर उपलब्ध झाले नाही तर आम्ही मीटर घेणार नाही, आम्ही बहिष्कार टाकू मग पालिका प्रशासनाला काय करायचे ते करा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडन दौऱ्यावर
हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये लाडकीचा उल्लेख
लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या - एकनाथ शिंदे
- यशोधरा नगर परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय...
- सामाजिक सुरक्षा पथक आणि AHTU पथकाने केलेल्या या कारवाईत तब्बल 5 लाख 40 हजार रुपयांचा 180 नग नायलॉन मांजा जप्त करण्यात आलाय...
- यासोबतच ई-रिक्षा, मोपेड आणि मोबाईल असा एकूण 7 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय...
- मो. शाहिद मो. सईद अन्सारी, वय 27 वर्ष, असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे
MPSC आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी परीक्षा आता ३ जानेवारी २०२७ रोजी होणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. यापूर्वीही या परीक्षेची तारीख तीन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असून, आयोग जाणूनबुजून परीक्षा पुढे ढकलत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. आमच्या मुख्य मागण्या दाबण्यासाठीच परीक्षा पुढे ढकलल्या जात असल्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
- पालिका आयुक्त, महापौरांच्या तसेच आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका प्रशासन आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
- गणेशोत्सव काळातील मंडळांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित
- गणेश आगमनासाठी खड्डे बुजवण्याचे आमदार फरांदे यांचे प्रशासनाला आवाहन
लातूरच्या निलंगा तालुक्यातील मसलगा येथे काही मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी लातूर मध्ये काही तरुण पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहेत, मागच्या 2 तपासून हे तरुण टाकीवर चढून आंदोलन करत आहेत, जरांगे पाटील यांच्या उपोषणाची सरकारने तात्काळ दखल द्यावी, तसेच मराठा समाजाच्या मागण्या मान्य करावे अशी मागणी हे आंदोलक करत आहेत.
हिंगोलीच्या वसमत शहरात पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयातून २२ वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाटील नगर परिसरात राहणारा गणेश दिगंबर गुंडाळे हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात ऋषिकेश कंठाळे, अनिकेत देवकर आणि अर्जुन बोचकरी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यावर झालेल्या अपघाताच्या मुद्द्यावरून पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. चिमुकलीचा बळी गेला, त्याला जबाबदार कोण? असा सवाल करत नगरसेवकांनी अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली. महापौरांसमोर नगरसेवकांनी आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहातच आंदोलन सुरू असल्याने काही काळ वातावरण चांगलेच तापले.
एमपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या धाराशिवच्या परंडा तालुक्यातील खासापुरी येथील तरुणाने पुण्यात केली आत्महत्या
परंडा तालुक्यातील खासापुरी येथील प्रथमेश दिलीप देशमुख यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
आर्थीक अडचणीतून,दुष्काळी परिस्थितीच्या नैराश्यातून प्रथमेश ने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप
संग्रामपूर, जळगाव (जामोद) तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी केली आहे. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. खरीप २०२६ साठी कोरडा दुष्काळ जाहीर करावा, प्रलंबित पीक व फळपीक विम्याची भरपाई द्यावी, पात्र शेतकऱ्यांचा कर्जमाफी योजनेत समावेश करावा, अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, तसेच पीक विम्याची ट्रिगर पद्धत पूर्ववत करावी, नाफेडची खरेदी केंद्रे काढणी सुरू होताच सुरू करावीत, अशा एकूण १७ मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडतील, असा इशारा प्रकाश भिसे यांनी दिला आहे.
पेपरफुटीच्या निषेधार्थ जळगावात विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला आहे. MPSC अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांना तातडीने पदावरून हटविण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी MPSCच्या विद्यार्थ्यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढला.
दिवसरात्र मेहनत करून, अभ्यास करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पेपरफुटीमुळे मोठा धक्का बसत असल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला आहे. पेपरफुटीसारख्या घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत, विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे.
नंदुरबारमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक....
पर्जन्यमान,पीक परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि आगामी गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आज महत्त्वाची बैठक
- महापौरांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका प्रशासन आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
- गणेशोत्सव काळातील मंडळांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या जाणार
- वर्धा शहराचा विकास, प्रलंबित विषय व अपेक्षित बाबींवर चर्चा करण्यासाठी बैठक
- पालकमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक
पावसाने दडी मारल्याने लातूर जिल्ह्यातील खरीप पिकांवर संकट निर्माण झाले असून, आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
पावसाअभावी शेतातील हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा,सत्ताधारी आमदार माजी मंत्री तानाजी सावंत यांची शासनाकडे मागणी
धनंजय मुंडे यांच्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या दुसऱ्या आमदाराने देखील केली सरकारकडे मागणी
बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते सर्जा-राजाची खांदमळणी व पूजन..
कष्टकरी शेतकऱ्यांचा रुमाल-टोपी देऊन सन्मान; शेतशिवारात समृद्धी नांदण्यासाठी वरुणराजाला साकडे..
ST महामंडळाच्या ऑडिटवरून भाजप शिंदेसेना संघर्ष पेटणार
अर्थ खात्यानं ST महामंडळाच्या आर्थिक व्यवहाराबाबत कठोर भूमिका घेत लिहिलं पत्र
वित्त खात्याने ST महामंडळाला दिलेल्या २०० कोटींच्या बिनव्याजी कर्जाचा मागितला हिशोब
मावळात 70 ते 80 कोटी खर्च करून होणार क्रीडा संकुलन.
राज्य सरकारकडून क्रीडा संकुलनास दिली मंजुरी
मात्र क्रीडा संकुलनाच्या जागेचा प्रश्न न्यायालयात
केंद्राच्या योजनांची कामे गतीने पूर्ण करा; पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ द्या — प्रतापराव जाधव
‘दिशा’ समितीच्या बैठकीत पाणीटंचाई, मनरेगा, घरकुल, पीक नुकसान आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आढावा
विष प्राशन करून शेतकरी महिलेचा मृत्यू
हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गोजेगाव येथील घटना
कमलबाई सोपान कांदे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव
सततची नापिकी कर्जाचा डोंगर आणि कोरड्या दुष्काळामुळे शेतात दहाक वास्तव पाहून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती
- नागपुरातील कळमना येथे अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटवर भरारी पथकाचा छापा
- १४.२ किलो. १९.२ किलो.५किलो आणि २ किलो क्षमतेचे घरगुती तसेच व्यावसायिक वापराचे ४०० हून अधिक सिलिंडर जप्त..
- एका सिलिंडर मधून दुसऱ्या सिलिंडर मध्ये गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे अनधिकृत इलेक्ट्रिक पंप पाईप्स आणि साधनेही आढळली.
कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीतील कुख्यात फरार आरोपी बाब्या पवारला पोलिसांनी बेड्या ठोकल्या
दिड वर्षापासून अनेक गंभीर गुन्ह्यांत श्रीकांत उर्फ बाब्या पवार हा फरार होता
गुन्हे शाखा युनिट तीन च्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला घरातून केली अटक
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ३ पथकाने ही कारवाई केली आहे.
सरकारची योजना बनली शेतकऱ्याच्या शेती विक्रीचे कारण
हिंगोलीत शेतकरी दांपत्याने काढली जमीन विक्रीला
सरकारी योजनेतून पाच लाखांची विहीर बांधली मात्र वर्षभरापासून एक छदमही मिळाला नसल्याने महिन्याला 12 हजार रुपये व्याज भरावे लागत असल्याने वावर विक्री करत असल्याचे सांगितले
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सात सप्टेंबर पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली.
तिसऱ्या दिवशी 63 जणांनी 99 अर्ज सहकार विभागाकडे भरले आत्तापर्यंत एकूण 160 अर्ज आले आहेत
11 सप्टेंबर शेवटची तारीख असल्याने आकडे अधिक वाढण्याची शक्यता आहे
नाशिकच्या वणी गडावरील स्प्तश्रृंगीदेवी मंदीर आज पासून २६ सप्टेंबर पर्यंत दर्शनासाठी भाविकांना बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
घाट रस्त्याचे काम सुरु असल्याने हा बंद ठेवण्यात येणार होता.
मात्र प्रशासनाने यात बदल केला असून,भाविकांना दर्शनला जाता यावे यासाठी शनिवार व रविवारी दर्शाना साठी जाता येणार असल्याच जाहीर करण्यात आले आहे.
विधानमंडळ अंदाज समितीचा दौरा वादाच्या भोवऱ्यात
आज पासून तीन दिवस यवतमाळ जिल्ह्यात 27 आमदार दौऱ्यावर
गेल्या 35 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर संकट
वैद्यकीय पथकाकडून मनोज जरांगे पाटलांची तपासणी.
गेल्या बारा दिवसांपासून जरांगे पाटलांचे अंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे.
डिहायड्रेशन झाले आहे मात्र आज सलाईन आणि पाणी घेतले असून प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.