Maharashtra Live News Update:  Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : भोंदू अशोक खरातला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: महाराष्ट्रात आंबेडकर जयंतीचा उत्साह, विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, गॅस सिलिंडरचा तुटवड्याचे संकट, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Pune: पुण्यात चक्क चोरट्याने आंबे पळवले

पुण्यात चक्क चोरट्याने आंबे पळवले

कोंढवा बुद्रुक येवलेवाडी येथील प्रकार

11 मार्चला रात्री २ ते सकाळी ६ च्या दरम्यान घडला आंबे चोरीचा प्रकार..

येवलेवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

विक्री करण्यासाठी आणलेले आंबे मोकळ्या जागेत कापडी मंडप मधून चोरी गेल्याचा प्रकार घडला आहे. कात्रज कोंढवा रोडवर ही घटना घडली. जवळपास १ लाख ८ हजार रुपये किमतीचे आंबे चोरीला..

अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

येवलेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Nandurbar: नंदुरबारमध्ये भीम जयंती निमित्ताने भीम अनुयायांकडून पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत सामूहिक बुद्ध वंदना...

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त नंदुरबार शहरात भीम अनुयायांनी मोठ्या उत्साहात अभिवादन कार्यक्रम आयोजित केला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत सामूहिक बुद्ध वंदना करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील भीम अनुयायी एकत्र येत बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करत भीम जयंती साजरी करत आहेत. सकाळी पुतळ्याला अभिवादन करून बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

भोंदू अशोक खरातला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

चौथ्या गुन्ह्यात अशोक खरातला ५ दिवसांची पोलीस कोठडी

आज नाशिक कोर्टात होती सुनावणी

Pandharpur: डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने पंढरपुरात मोटारसायकल रॅली

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक संघटना आणि भिम सैनिकांनी एकत्रित येत आज सकाळी पंढरपूर शहरातून मोटारसायकल रॅली काढून अभिवादन केले.

शहरातील प्रमुख मार्गावरून डाॅ बंड आबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत जल्लोष ही साजरा केला. यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सांगलीत मोठ्या दिमाखात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडत आहे.. जयंतीच्या पूर्व संध्येला सांगलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नूतन भव्य 14 फुटी पुतळ्याचं लोकार्पण रात्री पार पडले.. शहरातल्या एसटी स्टँड जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नव्याने उभारण्यात आला आहे.. जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील अनेकांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

Jalna: जालन्यातील गुंज येथील गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरूच

जालन्यातील गुंज येथील गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरूच आहे. अद्याप आंदोलक शेतकऱ्यांची प्रशासनाने कोणताही संवाद साधला नसल्याची माहिती आहे.जालन्यात 2025 मधील अतिवृष्टी आणि ढगफुटीच्या काळात चुकीचे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा या मागणीसाठी जालन्यातील गुंज येथील गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन सुरू आह.जालना जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी मुळे अनेक घरांची पडझड झाली होती तर शेतीचे देखील प्रचंड नुकसान झाल होत मात्र अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे चुकीचे पंचनामे केल्याने गरजू अद्यापही पासून वंचित राहिल्याचा आरोप करत युवा शेतकरी संघर्ष समितीने केला आहे.

Pune: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्ताने भव्य दहा हजार किलोची एकता मिसळ....

गेल्या चार वर्षांपासून महापुरुष अभिवादन कृती समितीच्या वतीने महापुरूषांच्या जयंतीच्या निमित्ताने एकतेचा संदेश म्हणून एकता मिसळ तयार केली जाते.आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्ताने तब्बल दहा हजार किलोची भव्य एकता मिसळ तयार करण्यात आली आहे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर अनुयायी सकाळपासून या मिसळच आस्वाद घेताना पाहायला मिळत आहे.यंदा या उपक्रमाचे ४ थे वर्ष आहे.

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार

भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार

थोड्याच वेळात अशोक खरातला व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून कोर्टात हजर करणार

खरात विरोधात महिला अत्याचार प्रकरणी दाखल चौथ्या गुन्ह्यात आज पुन्हा SIT कडून खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार

Latur: उदगीरच्या सोमला काशीराम तांड्यावर भीषण पाणीटंचाई

लातूरच्या उदगीर तालुक्यातील सोमला काशीराम तांड्यावर भीषण पाणीटंचाईच वास्तव समोर आलय, तासनतास हातपंपावर बसूनही, पाणी मिळत नाही. पाण्यासाठी महिला ,वृद्ध आणि लहान मुलांना देखील वणवण करावी लागत आहे. दरम्यान तांड्या वस्तीवर पाणीपुरवठा योजनेसाठी दोन कोटी साठ लाख रुपये खर्चूनही पाणी मिळत नसल्याने नागरिक मोठ्या समस्येला तोंड देत आहेत. प्रशासनाने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी अशी देखील मागणी आता , या ठिकाणचे रहिवासी नागरिक करत आहेत.

मुंबईनंतर टाटा कंपनीची वीज मिळवणारं बदलापूर दुसरं शहर ठरणार

बदलापूर शहराला लवकरच टाटा पॉवरचा वीजपुरवठा होणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत बदलापुरातल्या कात्रप क्रीडा संकुलाची चार एकर जागा टाटा पॉवर वीज कंपनीला देण्यास मान्यता देण्यात आलीय. त्यामुळे बदलापूरकरांची वाढलेली विजेची मागणी टाटा पॉवर कंपनी पूर्ण करणार असून यामुळे बदलापूरकरांना यापुढील काळात वीज संकटाचा कोणताही सामना करावा लागणार नाही. राज्य मंत्रिमंडळाानं घेतलेल्या या निर्णयाबद्दल आमदार किसन कथोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बदलापूरकरांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत. टाटा पॉवरच्या स्विचिंग स्टेशनसाठी कुळगांव-बदलापूर नगर परिषदेची कात्रप येथील मोहपाड्याजवळील चार एकर जागा हस्तांतरित करण्यात यावी यासाठी आमदार किसन कथोरे हे गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नशील होते.

यवतमाळमध्ये आंबेडकर जयंतीचा उत्साह

यवतमाळच्या संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यासमोर अनुयायांनी मोठी गर्दी केली असून जल्लोषात अभिवादन केले. यावेळी अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा झळकावून व पुतळ्यासमोर पुष्पार्पण करून १३५ वी जयंती साजरी केली. याप्रसंगी 'जय भीम'चा घोष घोषणांनी परिसर दणाणून सोडलाय. यवतमाळच्या कानाकोपऱ्यातून युवक युवतींसह नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. संविधान चौकात सर्वत्र बाबासाहेबांच्या प्रतिमा झळकावून अनुयायांनी जल्लोष केला.

महाराष्ट्रातून गुजरातमध्ये वन्य प्राणांची तस्करी....

पुष्पा स्टाईल तस्करीचा भांडाफोड, भाजीच्या कॅरेटमध्ये वन्य प्राणांची तस्करी नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई.

आयशरमधून कोल्हे, तितर आणि पोपटांची तस्करी उघड 25 लाखांचा मुद्देमाल जप्त.

नवापूरच्या विसरवाडी जवळ वन्यजीव तस्करीचा पर्दाफाश, 3 जणांवर गुन्हा दाखल

नागपुरात मध्यरात्री भीम जयंतीचा उत्साह आणि जल्लोष

- बाराचा ठोका पडताच आसमंत 'जय भीम'च्या जय घोषाने निनादला

- नागपूरच्या संविधान चौक, इंदोरा चौक,त्रिशरण चौकसह ठिकठिकाणी हजारो भीमसैनिक एकवटले

- फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात भीम जयंती मध्यरात्री साजरी करण्यात आली

- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी दीक्षाभूमीच्या या पावन नगरीत उत्साहाचा महापूर आल्याचे चित्र आहे

बुलढाण्यात तापमानाचा पारा चढला; 41.5°, खामगाव 42.3° – उष्णतेने नागरिक हैराण

बुलढाणा जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानात मोठी वाढ नोंदवली जात आहे. बुलढाण्यात तापमान 41.5 अंश सेल्सियस तर खामगाव येथे 42.3 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. एकेकाळी थंड हवेसाठी ओळख असलेल्या बुलढाण्याची ओळख आता हळूहळू पुसली जात असल्याचे चित्र दिसत आहे.

nashik-yeola-ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा मृत्यू

नाशिकच्या येवला तालुक्यातील भिंगारे येथे मजुरांना घेण्यासाठी जात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा बोराडे वस्तीवर असलेल्या पुलावर नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली सह रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यामध्ये गेला यावेळी ट्रॅक्टर चालक असलेला अभिषेक गणपत जेजीर अचानक ट्रॉली खाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून या प्रकरणाचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत

वाळुशिल्पातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाळुशिल्प साकारण्यात आले आहे. वेंगुर्ला आरवली सोनसुरे येथे हे वाळू शिल्प साकारण्यात आले आहे. प्रसिद्ध चित्रकार रविराज चीपकर यांनी हे सुंदर असे वाळू शिल्प बनविले आहे. तीन तासाच्या प्रयत्नानंतर हे वाळू शिल्प बनविण्यात आले आहे. वाळु आणि रांगोळीचा वापर करून चिपकर यांनी हे वाळुशिल्प साकारून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे.

सलग 18 तास नाचून नाहीतर वाचून, युगपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती पिंपरी चिंचवड शहरात विद्यार्थी जरा अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली आहे. डीजेच्या तालावर नाचून नाही तर सलग अठरा तास वाचून विद्यार्थी युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केला आहे.

- नाशिकमधील नामांकित IT कंपनीतील धर्मांतरण प्रकरण

- टीसीएसमधील संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटीकडून तपासणी

- २०२२ पासून आरोपींनी कट्टरतेचे जाळे विणल्याचा संशय

- महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रयत्न प्रकरणाच्या तपासाला गती

- संशयितांना देशा बाहेरील व्यक्ती अथवा संघटनांकडून फंडिंग होते का? एसआयटीकडून तपास सुरू

- टीएसएस मधील माजी कर्मचाऱ्याचा धक्कादायक खुलासा, विशिष्ट समुदायावर लक्ष असल्याचा आरोप

सांगलीत मोठ्या दिमाखात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 फुटी पुतळयाचं लोकार्पण

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज पार पडत आहे.. जयंतीच्या पूर्व संध्येला सांगलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नूतन पुतळ्याचं लोकार्पण रात्री पार पडले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंतराव आबेडकर याच्या शुभ हस्ते आणि उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांच्यासह हजारो आंबेडकर अनुयायींच्या उपस्थितीमध्ये मोठया दिमाखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य 14 फुटी पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. शहरातल्या एसटी स्टँड जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 फुटी पुतळा नव्याने उभारण्यात आला आहे..जयंतीच्या पूर्वसंध्येला या नव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं जल्लोषात व जयघोषात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत लोकपर्ण संपन्न झाले.

कोरची तालुक्यात प्रसूतीदरम्यान आईसह नवजात बाळाचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात प्रसूतीदरम्यान आईसह नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोरची तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात ही दुर्दैवी घटना घडली. रमुला महेश काटेंगे, वय 24 वर्ष, या नऊ महिन्यांच्या गर्भवती होत्या.

मुंबईतील नागरी समस्यांवर आता ‘झेन झी’ची नजर

मुंबईतील खड्डे, स्वच्छता आणि सार्वजनिक सेवांवरील त्रुटींवर लक्ष ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कडून नवा पथदर्शी प्रकल्प राबवला जाणार

या प्रकल्पांतर्गत १८ ते २५ वयोगटातील ५० तरुणांची ‘सिव्हिक फेलोज’ म्हणून नियुक्ती केली जाणार

हे तरुण शहरातील खड्डे, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता तसेच सार्वजनिक वाहतुकीतील समस्या यावर रिअल-टाइम मॉनिटरिंग करणार

समस्यांची तत्काळ नोंद व निराकरण

नागरिक आणि प्रशासन यांच्यात दुवा निर्माण करणे

तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक प्रभावी कामकाज

हा प्रस्ताव भाजप नगरसेवक तेजिंदरसिंह तिवाना यांनी मांडला असून नागरी समस्यांवर नाविन्यपूर्ण पद्धतीने लक्ष ठेवण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.

कुत्राच्या नसबंदीवर पालिका २३ कोटी रुपये खर्च करणार

पुढील तीन वर्षांत १.३५ लाख श्वानांच्या निर्बीजीकरणाचे उद्दिष्ट

गेल्या काही वर्षापासून नागरिकांना चावा घेण्याचे प्रमाण वाढल्यामुळे नसबंदी निर्णय

मुंबईत २०१७ ते ऑगस्ट २०२५ या आठ वर्षांत सुमारे दीड लाखाहून अधिक भटक्या श्वानांची नसबंदी करण्यात यश

येत्या वर्षभरात ४५ हजार, तर पुढील तीन वर्षांत १ लाख ३५ हजार श्वानांचे निर्बीजीकरण करण्याचे उद्दिष्ट

या मोहिमेसाठी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय सह नऊ संस्थांची नियुक्ती

अशोक खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठ घबाड

- सोमवारी केलेल्या छापेमारीत कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे मिळाले.

- पुण्यातील प्रकाश पोफळेच्या घरातून ४२ लाखांची रोख रक्कम जप्त.

- ईडीने अशोक खरातची २ कोटी ५० लाखांची बँकेतील रक्कम गोठवली.

- ईडीकडून अशोक खरातची एक मर्सिडीज बेंझ गाडीही जप्त करण्यात आलीय

जेईई मेन्स’ सत्र-२ निकाल २० एप्रिलपर्यंत

‘जेईई मेन्स’ सत्र-२ परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची जाहीर झाली असून निकाल २० एप्रिलपर्यंत लागणार आहे. राष्ट्रीय परीक्षण संस्थाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उत्तरसूची उपलब्ध आहे. उमेदवारांना १३ एप्रिल रात्री ११.५० पर्यंत आक्षेप नोंदवण्याची मुदत देण्यात आली आहे. प्रत्येक प्रश्नासाठी २०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. २ ते ८ एप्रिलदरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. अर्ज क्रमांक व पासवर्ड वापरून विद्यार्थी उत्तरसूची डाउनलोड करू शकतात.

तिकीट दरवाढीचा उलट परिणाम; पीएमपीच्या उत्पन्नात सातत्याने घट

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या जून २०२५ पासूनच्या तिकीट दरवाढीचा अपेक्षित महसूलवाढीऐवजी उलट परिणाम दिसत आहे. सुरुवातीला उत्पन्न ६८ कोटींपर्यंत वाढले; मात्र ऑगस्टनंतर सतत घट होत मार्च २०२६मध्ये ५९ कोटींवर आले. प्रवासी संख्येतही दरमहा ७० ते ८० हजारांनी घट होत आहे. सेवेत सुधारणा न झाल्याच्या तक्रारी, चुकीची स्टेज रचना व मेट्रोसारख्या पर्यायांमुळे पीएमपीला फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस! भारतीय हवामान खात्याने वर्तवला अंदाज

भारतीय हवामान खात्याच्या दीर्घाकालीन अंदाजानुसार यावर्षी देशातील नैऋत्य मान्सून ( जून ते सप्टेंबर ) पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे आहे

हवामान खात्याने दिलेल्या पहिल्या टप्यातील अंदाजानुसार यंदा देशात दीर्घकालीन सरासरी सुमारे 92% पाऊस पडण्याची शक्यता आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांबरगावजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला यात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झालेत. छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडकेनंतर कार तब्बल १०० फूट फरफटत गेली. अपघातानंतर घटनास्थळी अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले.

आंबेडकर जयंतीचा राज्यात उत्साह

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती (१४ एप्रिल २०२६) महाराष्ट्रभरात अत्यंत उत्साहात आणि भीमामय वातावरणात साजरी होत आहे. राज्यभरात अभिवादन सभा, मिरवणुका, रक्तदान शिबिरे आणि 'नाचून नाही, वाचून' अशा सामाजिक उपक्रमांनी 'भीम उत्सव' साजरा केला जात आहे

बँकेत चोरी झालेली रक्कमे सह पोलिस पथकाने परराज्यातून दोघांना घेतले ताब्यात

नाशिकच्या येवल्यातील बँक ऑफ इंडियातून दोन महिन्यापुर्वी एका व्यापा-ची ५ लाख १० हजाराची रक्कम दोघा परप्रांतिय चोरट्यांनी अल्पवयीन मुलाच्या माध्यमातून चोरुन नेल्याची घटना घडली होतीयही चोरी बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाली होती.धान्याचे व्यापारी अशोक तुकाराम पवार हे बँकेत पैसे काढण्यासाठी आले असता पैशे ठेवलेली कापडी पिशवी घेऊन अल्पवयीन मुलगा फरार झाला,याची येवला पोलिसात नोंद झाल्या नंतर जिल्हा पोलिस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहर पोलिसांच्या पथकाने मध्यप्रदेशातून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून संपुर्ण पाच लाख दहा हजार रुपयाची रक्कम हस्तगत करण्यात यश आले असून या प्रकरणी येवला पोलिस अधिक तपास करीत आहे.

नंदुरबारच्या विद्यार्थ्यांनी पेनावर साकारली डॉ. बाबासाहेबांची हुबेहूब प्रतिकृती...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधून नंदुरबार येथील कलाशिक्षक गौरव माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपली आगळीवेगळी आदरांजली वाहिली आहे. विद्यार्थ्यांनी चक्क एका पेनावर बाबासाहेबांची अत्यंत सूक्ष्म आणि बोलकी प्रतिकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. केवळ एका तासात ॲक्रॅलिक रंगांचा वापर करून ही कलाकृती पूर्ण करण्यात आली. गौरव माळी यांनी मागील वर्षी भाकरीवर बाबासाहेबांचे चित्र रेखाटले होते,त्यांच्या याच कलेतून प्रेरणा घेत यंदा विद्यार्थ्यांनी पेनासारख्या छोट्या वस्तूवर हे शिवधनुष्य पेलले. विद्यार्थ्यांच्या या अचाट कौशल्याचे आणि कल्पकतेचे संपूर्ण शहरात भरभरून कौतुक होत आहे. ही कलाकृती बाबासाहेबांप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक मानली जात आहे.

उल्हासनगरमध्ये मोठ्या उत्साहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव

उल्हासनगरमध्ये मोठ्या उत्साहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली.रात्री 12 वाजल्यापासून उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयाबाहेर असणार्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. याशिवाय येथील सुभाष टेकडी ,चोपडा कोर्ट भागात असणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यास प्रचंड गर्दी झाली होती.यावेळी शहरातील विविध पक्षाचे नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यास आवर्जून उपस्थित होते .या जयंती निमित आज दिवसभर उल्हासनगरातील काही भागात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला नवी खरेदी करताय? या गोष्टी चुकूनही विकत घेऊ नका

Actress Titeeksha Tawde Photos: निळ्या साडीत खुललं तितिक्षा तावडेचं सौंदर्य! फोटो पाहून चाहते झाले घायाळ, केला लाईक्सचा वर्षाव

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोनं का खरेदी करतात? काय आहे परंपरेमागचं कारण

Akola : अकोल्यात खळबळ! जिल्हाधिकाऱ्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

१०-१२ वर्षे राहिल्यावर भाडेकरू घराचा मालक होतो का? काय सांगतो कायदा?

SCROLL FOR NEXT