Corona Update Saam Tv
महाराष्ट्र

Corona Update: चिंता वाढली! राज्यात ४०,९२५ नव्या रुग्णांची नोंद

गेल्या २४ तासात राज्यात ४०,९२५ नव्या कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची नोंद झाली आहे. तर २० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या २४ तासात १४,२५६ रुग्ण बरे झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासात राज्यात ४०,९२५ नव्या कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची नोंद झाली आहे. तर २० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.०७ टक्के एवढा आहे. (Latest Corona Update)

हे देखील पहा -

तसेच गेल्या २४ तासात १४,२५६ रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ६५,४७,४१० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यातील राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.८ टक्के आहे. राज्यात ७,४२,६८४ व्यक्ती होम क्वारांटाईन असून १४६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. दुसरीकडे एक दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासात राज्यात एकही नवीन ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळलेला नाही. आजपर्यंत राज्यात एकूण ८७६ ओमिक्रॉन बाधित रुग्ण सापडले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kachya Kelichi Bhaji Recipe : हिरव्यागार कच्च्या केळीची चटपटीत भाजी, मुलं पुन्हा पुन्हा मागून खातील

Unseasonal Rain : साताऱ्यात बळीराजा संकटात, गारांच्या पावसाने जावळीला झोडपलं, गहू, ज्वारी पाण्यात

Suraj Chavan Video : "माझं इतकं मन दुखलंय ना..."; सूरज चव्हाणनं व्यक्त केली नाराजी, 'ती' एक गोष्ट गुलीगत किंगच्या जीवाला लागली

Eyelash Growth: पापण्या कमी असल्यामुळे डोळ्यांचा लूक फिका वाटतो? या सोप्या टिप्सने डोळे दिसतील रेखीव

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

SCROLL FOR NEXT