Konkan Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदे गटाचा ठाकरे गटाला दणका! कोकणात आणखी मोठा धक्का, ५ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Konkan Politics: कोकणात ठाकरे गटाला अजून एक जबर धक्का बसणार आहे. दापोलीत ५ नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी अनेक ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रवेश करणार आहेत.

Bharat Jadhav

अमोल कलये साम टीव्ही रत्नागिरी

कोकणात उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला असून दापोलीतील पाच नगरसेवक ठाकरेंची साथ सोडणार आहेत. स्वायत्त संस्थेच्या निवडणुकांपूर्वी शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झालीय. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून 'ऑपरेशन टायगर' राबवलं जात आहे. राजन साळवी हेही या ऑपरेशनचे भाग असल्याचं म्हटलं जात आहे.

सावळी यांच्या पक्ष प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का देणार आहेत. दापोलीमधील ५ नगरसेवकांना आपल्या पक्षातप्रवेश करून घेत एकनाथ शिंदेंनी कोकणातील ठाकरेंच्या गडाला खिंडार पाडलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात शिंदे कोकणातील ठाकरे गटाच्या गडाला खिंडार पाडणार आहेत. एका जाहीर सभेच्या कार्यक्रमात ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी हातावर बांधलेलं शिवबंधन तोडत शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेणार आहेत.

ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग होत आहे. ठाकरे गटाला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून 'ऑपरेशन टायगर' मोहीम राबवली जात आहे. कोकणात ऑपरेशन टायगर मोठ्या प्रमाणात राबवलं जात आहे. ठाकरे गटातील नेत्यांचा प्रवेश करून घेत एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के देत आहेत. दापोलीतील ५ नगरसेवक वेगळा गट स्थापन करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणआर आहेत.

उद्या शनिवारी एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. येथील एका कार्यक्रमात जाहीर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.या कार्यक्रमात किरण सामंत उदय सामंत आणि राजन साळवी हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. या कार्यक्रमात माजी आमदार सुभाष बने, गणपत कदम हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यासोबत जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बनेदेखील ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार आहेत.

नांदेडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का

शिवसेना उबाठा गटाचे नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकाटे यांनी आपला पदाचा राजीनामा दिलाय. संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण राजीनामा दिल्याचं कोकाटे यांनी सांगितलंय. कोकाटे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज नांदेडमध्ये प्रवेश करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा कुटुंबातील सदस्याचे नवीन नाव? जाणून घ्या प्रोसेस

Wardha Accident : वर्ध्यात भीषण अपघाताचा थरार; बस आणि ट्रेलरची धडक, वाहनांचा चक्काचूर

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोगद्यामध्ये ७-८ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3: 'सैयारा'मुळे मराठी चित्रपटाला शोच मिळेना; मनसे नेत्यानं दिला कडक इशारा

SCROLL FOR NEXT