Prithviraj Patil Saam TV
महाराष्ट्र

Saam Impact: महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला भाजपकडून 5 लाखांचे बक्षीस

मला केवळ मानाची गदा पारिताेषिक देण्यात आले असून संयाेजकांनी राेख रक्कम दिली नसल्याची खंत पैलवान पृथ्वीराज पाटील यांने साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली होती.

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापीर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र केसरीचा किताब पटकाविणाऱ्या पैलवान पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) याला भाजपकडून ५ लाख रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलं.

दरम्यान, मला केवळ मानाची गदा पारिताेषिक देण्यात आले असून संयाेजकांनी राेख रक्कम दिली नसल्याची खंत पैलवान पृथ्वीराज पाटील याने साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली होती. ही बातमी साम टीव्हीने (Saam TV) लावून धरल्यानंतर अखेर राजकीय पक्षांकडून आता पृथ्वीराज याला मदत करण्यास सुरुवात केली आहे.

हे देखील पहा

महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesari) गदेसाठी कोल्हापूरचा वय वर्ष २० असणाऱ्या पृथ्वीराज पाटील याने मुंबई पूर्वच्या विशाल बनकर याला चीतपट करुन २०२२ ची महाराष्ट्र केसरीची गदेचा मान कोल्हापूरच्या नावावर केला. या निकालानंतर त्याचं सगळीकडे कौतूक झालं मीडियावर बातम्या देखील दाखवल्या गेल्या. मात्र, पृथ्वीराजला केवळ गदा देण्यात आली संयोजकांनी जे बक्षीस घोषीत केलं होतं ते आपणाला मिळालेच नसल्याचं त्यांने साम टीव्हीशी बोलतना सांगितलं होतं.

दरम्यान, आज कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या (Kolhapur North By-Election) पार्श्वभूमिवर कोल्हापूरात आलेल्या फडणवीसांनी पत्रकार परिषदेत बोलत असताना भारतीय जनता पक्षाकडून आम्ही पृथ्वीराजला ५ लाख रुपयांचं बक्षीस देत असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात वेतन रखडल्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

ITR Filing 2026 : पगार १२.७५ लाखांपर्यंत असला तरीही भरावे लागेल टॅक्स, काय त्यामागचं नेमकं कारण?

Wi-Fi Tips : Wi-Fi चा स्पीड वाढवायचा आहे? ८ सोप्या ट्रिक्सने इंटरनेट होईल सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT