Maharashtra Kesari २०२३ Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Kesari 2023: कुस्त्यांचा थरार रंगणार! 'महाराष्ट्र केसरी'ची तारीख ठरली; महिंद्रा थार, ट्रॅक्टरसह बक्षिसांची लयलूट

66th Maharashtra Kesari Spardha: पुणे जिल्ह्यातील वाघोली लोणीकंद जवळ फुलगाव येथे होणार आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी

Maharashtra Kesari 2023:

राज्यभरातील कुस्तीपटू आणि कुस्ती शौकिनांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणाऱ्या ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तारीख आणि ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. ७ ते १० नोव्हेंबर या काळात पुणे जिल्ह्यातील वाघोली लोणीकंद जवळ फुलगाव येथे या कुस्त्यांचा थरार रंगणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणारी ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यातील वाघोली लोणीकंद जवळ फुलगाव येथे होणार आहे. ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. ३६ जिल्हे आणि ६ महानगरपालिका असे मिळून ४२ संघ या कुस्तीस्पर्धेत सहभागी होणार आहेत.

माती तसेच गादी गटात कुस्ती खेळवली जाईल. या स्पर्धेत सुमारे ८४० कुस्तीगीर सहभागी होतील, असेही सांगण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होईल.

महिंद्रा थार, ट्रॅक्टरसह मोठ्या बक्षिसांचा वर्षाव..

या स्पर्धेतील विजेत्या मल्लांवर महिंद्रा थार, ट्रक्टरसह विविध बक्षिसांची लयलूट होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा बक्षीस वितरण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडेल.

यंदा २ महाराष्ट्र केसरी स्पर्धा....

दरम्यान, कुस्तीगिर संघटनेच्या वादामुळे यावर्षी दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहेत. धाराशिवला आणि पुण्याजवळील फुलगावमध्ये अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी कुस्ती स्पर्धा पार पडतील. कुस्तीपटू दोन्ही ठिकाणी खेळू शकणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

SCROLL FOR NEXT