Maharashtra ISIS Module Case Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra ISIS Module Case: लग्नाचा मुहूर्त साधून NIA ने टाकली धाड; लग्नाला आलेल्या पाहुण्यांची उडाली धांदल

Maharashtra ISIS Module Case: सगळे संशयित बेसावध असताना एनआयएने ही धाड टाकली. पडघ्याशेजारी असणाऱ्या बोरीवली गावात लग्न सुरू होतं. लग्नाची तयारी ऐन रंगात असताना आणि सर्व नातेवाईक लग्नसोहळ्यासाठी एकत्र आले.

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाड

Mumbai News:

आयसीस महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणी एनआयएकडून धाड सत्र सुरूच आहे. अशात या प्रकरणी आज पुन्हा एकदा पोलिसांनी पडघ्यातील बोरीवली गावात कारवाई केलीये. लग्नाचा (Wedding) मुहूर्त साधून एनआयएने नाचन कुटुंबातील नातेवाईकाच्या लग्नसमारंभा आधीच धाड टाकलीये. लग्नानिमित्त सगळे संशयित एकाच ठिकाणी असल्याचा फायदा उचलत एनआयएने ही कारवाई केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सगळे संशयित बेसावध असताना एनआयएने ही धाड टाकली. पडघ्याशेजारी असणाऱ्या बोरीवली गावात लग्न होतं. लग्नाची तयारी ऐन रंगात असताना आणि सर्व नातेवाईक लग्नसोहळ्यासाठी एकत्र आले असतानाच एनआयएने छापेमारी केली. त्यामुळे साऱ्यांचीच धांदल उडाली. नाचन कुटुंबातील काही आरोपी या लग्नाला जाणार होते मात्र त्याआधीच त्यांच्यावर छापेमारी आणि अटकेची कारवाई झाली आहे.

एनआयएच्या (NIA) कारवाईमुळे गावात खळबळ उडाल्याने अटक केलेल्या कुटूंबातील सदस्य या लग्नाला गेले नाहीत. शिवाय पोलिसांची नजर असल्याने बाहेरूनही काही लोकांनी येणं टाळलं, अशी माहिती मिळालीये.

शानिवारी झालेल्या कारवाईत एनआयएने या प्रकरणी साकिब नाचनसह एकूण १५ जणांना अटक केली. साकिब नाचन 2002-2003 हा रेल्वे बॉम्ब ब्लास्टमध्येही आरोपी म्हणून अटक झाली होती. यात त्याची निर्दोष सुटका झाली. साकिबचा मुलगा शामिललाही पुणे आयसीस प्रकरणी अटक झाली होती. आरोपींना एनआयएने दिल्लीच्या पटियाला कोर्टात हजर केले. आयसीस महाराष्ट्र मॉड्युल या प्रकरणी आणखी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी थेट लग्नसमारंभात धाड टकत कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

पुण्यात अवघ्या १३ लाखांत हक्काचं घर, म्हाडाचा ४४६२ फ्लॅटचा धमाका, लोकेशनची नावं समोर, वाचा A टू Z माहिती

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

Chocolate Milkshake Recipe: घरच्या घरी बनवा थंडगार टेस्टी चॉकलेट मिल्कशेक; वाचा सोपी रेसिपी

Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

SCROLL FOR NEXT