HSC Results 2022, How to Check HSC 2022 Result online  Saam Tv
महाराष्ट्र

HSC Result 2022 : आज बारावीचा निकाल; दुपारी १ वाजता असा करा चेक

बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result 2022) आज बुधवारी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Board) मंगळवारी ही माहिती देण्यात आली आहे. दुपारी १ वाजता निकाल जाहीर होईल. त्यामुळे यंदाचा निकाल नेमका कसा लागणार? याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागून आहे. शालेय शिक्षणमंत्री यांनी ट्विट करुन १२वी च्या विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (HSC Result Latest Marathi Updates)

जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान बारावीचा निकाल उद्या म्हणजेच बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं. १२वीचा निकाल आज जाहीर होणार असला तरी १० वीचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात लावणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील. या परीक्षेस १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,१७,१८८ मुलं असून मुलींची संख्या ६,६८,००३ एवढी आहे. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा, अस ट्विट मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. (How to Check HSC 2022 Result online)

असा पाहता येईल बारावीचा निकाल

- बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर भेट द्यावी लागेल.

- त्यानंतर होमपेजवरील निकाल या पर्यायावर क्लिक करावे लागेल

- क्लिक केल्यास एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल

- त्यानंतर महाराष्ट्र बारावीचा निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा

- इथे लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा

- सर्व प्रकिया पूर्ण केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

- तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

- आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Crime: मेहुण्याच्या प्रेमात झाली वेडी, जगात येण्यापूर्वीच बाळाला संपवलं अन् कचऱ्यात फेकलं

SCROLL FOR NEXT