Hotel owners warn of shutdown as LPG cylinder shortage disrupts restaurant operations in Mumbai and other Maharashtra cities. Saam Tv
महाराष्ट्र

राज्यातील हॉटेल्स बंद होणार? हॉटेल व्यवसाय 'गॅस'वर?

Iran War Impact:राज्यातील सर्व हॉटेल्स लवकरच बंद होणार आहेत... होय आखातीत देशांत युद्धाचा भडका उडालेला असताना राज्यासह देशात गॅस तुटवडा निर्माण झाल्यानं हॉटेल व्यावसायिक हवालदिल झालेत. हॉटेल व्यवसायावर नेमका काय परिणाम झालाय ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

मुंबईकरांची सकाळ ज्या इराणी चहाने होते... तो इराणी चहा आता दोन दिवसांनी मिळण बंद होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय..आम्ही असं का म्हणतोय.. दादरच्या या इराणी हॉटेल्स मालकाच म्हणणं एेका.. फक्त इराणी चहाच नव्हे तर मुंबईतील सगळ्या हॉटेल्सवर येत्या दोन दिवसात शटर डाऊन करण्याची वेळ येणार आहे.

गॅस सिलेंडर्सची टंचाई निर्माण झाल्यानं मुंबईतील हॉटेल चालक चांगलेच हवालदिल झालेत..पुढचे दोन दिवस तग धरू शकतील एवढाच गॅस असून सिलिडर्स मिळणंही मुश्किल झालंय..त्यामुळे सरकारनं याचा गांभीर्यान विचार करावा अशी मागणी हॉटेल व्यावसायिक करत आहेत. हे संकट फक्त मुंबईपुरतं मर्यादित नाही तर पुण्यातही हॉटेल मालकांपुढे गॅस सिलेंडरच्या तुडवड्याचा प्रश्न आ वासून उभा राहिलाय...पुणे हॉटेल असोसिएशनच्या अध्यक्षांनी हॉटेल व्यवसाय 'व्हेंटिलेटरवर' असल्याचं सांगत.. 2 दिवसांत इंधन पुरवठ्यावर तोडगा निघाला नाही, तर लाखो कामगार बेरोजगार होतील दावा केलाय...

एकीकडे हॉटेल व्यवसायिकांना गॅस मिळत नसताना दुसरीकडे गॅसचा काळाबाजार वाढल्याचाही आरोप करण्यात येतोय... हॉटेल चालकांना दलालांकडून ब्लॅकमध्ये गॅस खरेदी करण्यासाठी विचारणा होतेय... दरम्यान नागपूर, छत्रपती संभाजीनगरमध्येही व्यावसायिकांना हॉटेल बंद ठेवण्याची नामुष्की ओढावलीय.. संभाजीनगरमधल्या हॉटेल असोसिएशननं तर केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र पाठवून या प्रश्नावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केलीय...

एकूण इराण-अमेरिका युद्धाचे चटके देशातल्या सामान्य माणसाच्या खिशाला बसू लागलेत..दोन दिवसात गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर मुंबईसह राज्यातील हॉटेल्स बंद होतील अशी स्थिती आहे. सरकारनं यावर लवकरच तोडगा काढला नाही तर ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Pulao vs Biryani: पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक असतो?

Moringa Leaves Benefits: शरीराची शक्ती वाढवतात 'ही' औषधी पाने, दररोज अशाप्रकारे खाल्ल्यास होईल फायदा

18th Newsmakers Achievers Awards 2026: मुंबईत विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचा गौरव

SCROLL FOR NEXT