maharashtra government suspends former tashildar vaishali waghmare ,khed news , saam tv
महाराष्ट्र

Pune News : खेडचे तत्कालीन तहसीलदार निलंबित, १७ कोटी ५६ लाख रुपयांच्या महसुलाच्या नुकसानीचा ठपका

Former Tashildar Vaishali Waghmare News : या निर्णयाचे शेतक-याने स्वागत केले.

रोहिदास गाडगे

Khed News : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तत्कालीन तहसिलदार वैशाली वाघमारे (vaishali waghmare) यांना राज्य सरकाराने नुकतेच निलंबित केले आहे. अनेक प्रकरणात अनियमितता आढळल्याने वाघमारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Maharashtra News)

वाघमारे यांच्या विराेधात माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच काही शेतकऱ्यांनी वाघमारे यांच्या विराेधात मुंबईत आंदोलन छेडले हाेते. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.

दरम्यान त्यांच्यावर झालेल्या कारवाईची माहिती कळताच एका शेतकरी कुटुंबाने तहसीलदार कार्यालयाच्या आवारात पेढे वाटून आनंद व्यक्त केला. तसेच वाघमारे यांच्या विराेधात घाेषणा दिल्या.

दरम्यान खेडच्या तहसीलदारांनी खेड उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने वाघमारे यांच्यावर पाच दोषारोप ठेवले आहेत. त्यांनी १७ कोटी ५६ लाख रुपयांचे शासकीय महसुलाचे नुकसान केल्याचा ठपका देखील त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

SCROLL FOR NEXT