Maharashtra Assembly Clears Land Revenue Amendment for Gaairan Land Use saam tv
महाराष्ट्र

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Land Revenue Code Amendment : महाराष्ट्र विधानसभेत जमीन वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जमीन महसूल संहितेत सुधारणा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे महानगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रातील हजारो हेक्टर गायरान जमीन सार्वजनिक कामांसाठी वापरता येईल.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्र विधानसभेत जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक मंजूर.

  • मनपा आणि नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील काही आरक्षण हटवण्याचा निर्णय.

  • हजारो हेक्टर जमीन सार्वजनिक आणि जनहिताच्या कामांसाठी वापरता येणार.

महाराष्ट्र विधानसभेत जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक मंजूर करण्यात आलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक विधानसभेत मांडलं होतं, ते एकमताने मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील हजारो हेक्टर गायरान जमीन सार्वजनिक कामांसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या विधेयकामुळे महापालिका आणि नगरपालिका हद्दीतील गायरान जमिनींच्या वापराबाबत मोठा बदल होणार आहे. हजारो हेक्टर गायरान जमीन सार्वजनिक जनहिताच्या कामांसाठी वापरता येणार आहे. नव्या निर्णयानुसार राज्यातील मनपा आणि नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील काही आरक्षण हटवलं जाईल.

यात - महापालिका क्षेत्रातील सुमारे 7700 हेक्टर जमीन

नगरपालिका क्षेत्रातील सुमारे 4000 हेक्टर जमीन

नगर परिषद क्षेत्रातील सुमारे 3000 हेक्टर जमीन

अशी एकूण हजारो हेक्टर जमीन सार्वजनिक कामांसाठी उपलब्ध होईल.

दरम्यान, या जमिनी शासनाच्या नावावरच राहतील. पण शासनाच्या परवानगीने महापालिका किंवा नगरपालिका या जमिनींचा वापर सार्वजनिक हिताच्या कामांसाठी करू शकतील. सरकारच्या या निर्णयामुळे महापालिका आणि नगरपालिका यांना विकासकामांसाठी मोठा फायदा होणार आहे, असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

व्यावसायिक वापरासाठी या जमिनींचा उपयोग करता येणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केलंय. गायरान जमीन जिल्हाधिकारी जमिनी म्हणून नोंदवली जाणार. या जमिनींचा कोणताही वापर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. जमिनीची मोजणी करून तिची नोंद केली जाईल. अतिक्रमण हटवून ती शासनाच्या ताब्यात घेतली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

नागपूरनंतर सोलापुरात बनावट नोटांचा सुळसुळाट; पोलिसांकडून विक्री करणारी टोळी जेरबंद, अशी अडकली जाळ्यात

SCROLL FOR NEXT