Maharashtra School Bag-Free Policy saam tv
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं कमी होणार, राज्यातील शाळांमध्ये दप्तरमुक्ती अभियान

School Bag Weight Reduced in Maharashtra; राज्यातील सर्व शाळांसाठी सरकारनं दप्तरमुक्ती अभियान लागू केलंय. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी होणार आहे. शाळांसाठी बंधनकारक असलेल्या दप्तरमुक्ती अभियानाचं स्वरुप नेमकं कसं आहे?... त्याचं उद्दिष्ट काय आहे?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

राज्यातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं कमी होणार आहे कारण राज्यसरकार राज्यातील सर्व शाळांसाठी दप्तरमुक्ती धोरण लागू केलं आहे. विद्यार्थ्यांना होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास टाळण्यासाठी शिक्षण संचालकांनी याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत. राज्य शासनाच्या दप्तरमुक्त योजनेची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत ते पाहूयात...

'दप्तरमुक्त' योजनेची वैशिष्ट्यं

वर्गानुसार दप्तराचं वजन, नोंद ठेवणं बंधनकारक

अनावश्यक पुस्तकं, वह्या शाळेत नेण्याची गरज राहणार नाही

पुस्तकं शाळेत कपाटात ठेवता येणार

दप्तराचं ओझं कमी झाल्यानं विद्यार्थ्यांचा त्रास कमी होणार

एव्हंढच नाही तर इयत्ता 6 वी ते 8 वीच्या वर्गासाठी वर्षातून 10 दिवस दप्तरमुक्त दिवस पाळणं बंधनकारक असणार आहे. या योजनेंतर्गत शासनाकडून दप्तराचं वजनही निश्चित करण्यात आलंय...

दप्तराचं निश्चित वजन काय?

( वजन - किलोमध्ये)

पूर्व प्राथमिक - दप्तर नाही

पहिली आणि दुसरी

1.6 ते 2.2

तिसरी ते पाचवी

1.7 ते 2.5

सहावी आणि सातवी

2 ते 3

आठवी ते दहावी

2.5 ते 4

अकरावी आणि बारावी

3.5 ते 5

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी याआधीही प्रयत्न झालेत. आता पुन्हा विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचं किती ओझं असावं, याबाबत शासन ठोस धोरण राबवतंय. आता प्रश्न आहे हा की याची कडक अंमलबजावणी होणार का ?.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निशूच्या वडिलांचा हल्लेखोर मोकाटच, गुन्ह्याची जाहीर कबुली, पोलिसांची लक्तरं वेशीला

नर्सेस बनल्या चिमुकल्यांसाठी 'देवदूत', रुग्णालयातील भीषण आगीतून 9 बालकं बचावली

राज्यात रिक्षा-टॅक्सींचा मीटर घोटाळा, इलेक्ट्रॉनिक चिपच्या मदतीनं प्रवाशांची लूट

CJP च्या आंदोलनानंतर काही तासांतच स्वतंत्र भारद्वाजला पकडले; त्या दिवशी काय घडलं होतं?

Crime: काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार, ७ जणांना बेड्या; विश्वास नांगरे पाटलांची कारवाई, ४६ गुन्हे दाखल असलेला निघाला मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT