coronavirus  
महाराष्ट्र

काेराेनाने मृत झालेल्या वारसांना ५० हजारांची मदत; इथं करा अर्ज

सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या अर्जदाराच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येईल असे सरकारकडून नमूद करण्यात आले आहे.

साम न्यूज नेटवर्क

सातारा covid19relief fund news : काेविड-१९ मुळे आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकांना पन्नास हजार रुपयांचे सानुग्रह सहाय्य अनुदानासाठी राज्य शासनाने संकेतस्थळ (website) विकसित केले आहे. त्यासाठी संबंधित अर्जदाराने mahacovid19relief.in या संकेस्थळावर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.

संबंधित अर्जदाराने त्याच्या आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल.

केंद्र शासनाकडे ज्यांच्या काेविड-१९ मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी काेविड -१९ मृत्यूचे कारण दाखविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दाखविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर काेविड-१९ मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास जिल्हास्तरीय, महापालिका स्तरीय तक्रार निवारणासाठी स्थापित केलेल्या तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज सात दिवसांकरिता संकेतस्थळावर सार्वजनिकरित्या खूले ठेवण्यात येतील. ज्यामुळे मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे. तसेच एखाद्या गाेष्टीसाठी अपिल करण्याची संधी मिळू शकेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येईल असे सरकारकडून नमूद करण्यात आले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT