Eknath Shinde, Devendra Fadnvis Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Government : शिंदे-फडणवीस सरकारचं ठरलं; 'या' दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार

महाराष्ट्र सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडत नव्हता, पण...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा जूनच्या अखेरीस राजभवनात पार पडला. त्यानंतर महिना उलटला तरीही राज्य सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडत नव्हता. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. परंतु, आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. ५ ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार सायंकाळी ६ वाजता राजभवन येथे होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. राजभवन नव्या मंत्र्यांचा शपशविधी होणार असल्याचंही समजते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यात मंत्र्यांच्या नावाची यादी मंजूर झाली आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : कुणबी प्रमाणपत्र समितीची बैठक, मनोज जरांगेंना निमंत्रण, तोडगा निघणार का?

Maharashtra Live News Update : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कोकणात भाजपची मोर्चेबांधणी

Success Story: इंजिनियरिंग केलं; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; २५व्या वर्षी IAS झालेले प्रतिक जैन आहेत तरी कोण?

Thursday Horoscope: गुरुचा आशीर्वाद लाभणार; ५ राशींना होणार धन लाभ, अडचणी होतील दूर; कसा असणार गुरुवारचा दिवस जाणून घ्या

Grahan In Pitru Paksha: पितृ पक्षात चंद्र-सूर्य ग्रहणाचा होणार अद्भुत संयोग; 4 राशींना मिळणार मनाजोग्या गोष्टी

SCROLL FOR NEXT